*हृदयी वसंत फुलतांना*
*हृदयी वसंत फुलतांना*
वसंत ऋतूचे आगमन म्हणजेच कोकिळाचे सुमधुर कुंजन किती सुंदर कल्पक असे हा ऋतू वसंत .. नुतनवर्ष गुढीपाडव्याचे स्वागत करणारा हा ऋतू वसंत .. पानगळ सरुन कोवळ्या पानांनी बहरणारा .. कशी गंमत असते ह्या ऋतूची .. कधी बरसे पाऊस कधी झोंबतसे अंगी वारा .. आणि ह्यातच बहरून येणारी हृदयातील प्रित .. मार्च महिना संपताना .. बहरुन येणारा एक गंध आगळा .. ह्याचा बाई असे रंगची निराळा .. सरत्या हिवाळ्याच्या शिखरी .. स्वताचा तुरा खोवण्याची ह्याची कलाच न्यारी .. छानसे पडलेले ऊन आणि सर्वत्र पसरलेला पानाफुलांचा सडा .. निरनिराळ्या रंगांच्या फुलांची नैसर्गिक उधळण .. जणू काही निसर्ग स्वताच इतका खुलतो .. आणि जणूकाही मानवाला जगण्यासाठी जागे करीतो .. मानवा बघ मी तुझ्यासाठी खुलत आहे .. तुला भेटण्यासाठी तुला आनंद देण्यासाठी .. असे हे ऋतुचक्र त्याच्या भावना त्याच्या उधळणीतुन व्यक्त करते .. प्रत्येकाच्या हृदयातील वसंत फुलवण्यासाठी .. बहरुन जातो दारासमोरील गुलमोहर .. आणि आंब्याचा गंधीत मोहोर .. असा हा आनंदित करणारा .. तापमानातही गोडवा आणणारा .. ह्याच वसंतात होई वासंतिक हळदिकुंकवाची रेलचेल .. सौभाग्यवतींच्या मनाची घालमेल .. त्यांच्याही हृदयात नव्याने वसंत फुलवणारी .. प्रियकर प्रेयसीच्या मनालाही येई एक उधाण .. म्हणूनच गातसे कोकिळ कोकिळेसाठी सुमधुर गान .. सर्व ऋतूंचा राजा वसंत .. खुलुनी जाई धरणीसह आसमंत .. असा हा नैसर्गिक वसंतोत्सव .. जीवनातील तारुण्य .. फुलवी हृदयातील वसंत अग्रगण्य .. जीवनातील संगीत , सौंदर्य , स्नेह निर्मित करणारा ऋतू वसंत .. येई जीवनी तेंव्हाच लागे जीवन सार्थकी .. मन डोलु लागे नयन बोलु लागे हृदयातील वसंत पानोपानी जागे...