रंग प्रेमाचे
रंग प्रेमाचे


निसर्गनिर्मित कितीतरी विविध रंग सृष्टीत भरलेले आहेत.. त्यांची विविध नावे आणि त्याला साजेशी रुपेही आहेत.. ही नैसर्गिक रंगाची उधळणच एक प्रेमाचे प्रतीक आहे.. मन खुलवुन टाकणारे.. फुलांचे रंग, पानांचे रंग, हिरव्या हिरवाईच्याही निरनिराळ्या छटा, आकाशाचा रंग, खगांचा रंग, प्राण्यांचे रंग... या रंगातूनच मानवाने तयार केले मानवनिर्मित विविध रंग.. निळा रंग आकाशाचा.. मनाला गवसणी घालणारा.. लाल रंग तप्त तेजोमय सुर्याचा विश्व प्रकाशित करणारा.. हिरव रंग हिरवाईचा अलगद मनाला स्पर्शणारा.. विविध रंग फुलांचे कुणी प्रेमाचे कुणी देवाचे.. तर कुणी सुंदर सुबक सजावटीचे.. पांढरा रंग मात्र शांततेचे प्रतीक.. म्हणूनच तर आपला प्रितीत वसणारा चंद्र पांढरा आणि त्याला आवडणाऱ्या चांदण्या पांढऱ्या.. किती विलोभनीय दिसते आकाश या रंगाने..
प्रियकर प्रेयसी धुंद होऊनी जाती या नैसर्गिक अविष्काराने.. विविध छटा विविध संबोधने.. उजळून निघती या रंगीन निसर्गाने.. पण जरी हे सगळे रंग सुंदर विलोभनीय असतील.. अगदी नैसर्गिक नाही कृत्रिम असतील.. पण ते तुम्हाला आनंदच देत असतील.. रंगबेरंगी कपडे घातल्यावर तुम्ही खुलून दिसता.. तेव्हा तुम्ही स्वत:च्याच प्रेमात पडता.. विविध रंगांची रंगावली तीही तुम्हाला प्रेमात टाकल्याविण नच राही.. असे हे विविध रंग बसलेत चपखल आपापल्या जागेवर.. कुणालाही न फसवता.. कुणालाही न दुखावता.. पण यात खूप महत्वाचे आहेत ते माणसांचे रंग.. बाहेरुन असतील काळे, सावळे, गोरे, निमगोरे.. ज्यामुळे फक्त तुमचे सौंदर्य खुलते हो.. पण तुमच्या अंतर्मनातील रंग त्यांचे काय?
खरेतर प्रत्येकाच्या शरीरात एकच रंग सळसळतो आहे.. तो आहे लाल रंग.. पण तरीही जात, धर्म हे भेदभाव आपण करीत असतो.. आणि एकमेकांचे मैत्रेय.. आप्तीय होण्यापेक्षा.. एकमेकांचे वैरी होत जातो.. या सगळ्यात खरा रंग प्रेमाचा.. निश्चितच कुठेतरी हरवला आहे.. याचा शोध कोण घेणार कोण कोणाला निस्वार्थी प्रिती देणार.. ज्यात रंग असावेत फक्त प्रेमाचे आणि माणुसकीचे.. चला तर मग या होळीला हेच प्रेमाचे रंग उधळुयात.. द्वेष, मत्सर, अहंपणा होळीत दहन करुयात आणि सर्वजण प्रेमाने..