एक सैर जाहिरातीच्या दुनियेतली
एक सैर जाहिरातीच्या दुनियेतली


जुन्या जाहिराती जुने दिवस जुने ते सोने.. या जाहिराती आजही खूप सुखद आनंददायी वाटतात आणि बऱ्याच जाहिराती अगदी कायमस्वरूपी स्मरणात राहिल्या आहेत.. माझ्यातरी आता त्याची सैर तुम्हालाही घडवते बघा काही आठवतात का? तुमच्या आवडत्या आहेत का? दूरदर्शन आणि आकाशवाणी दोन्हीही माध्यमातून भरपूर जाहिराती कानावर पडत असत पाहायला मिळत असत त्याचंही एक औचित्य होतं त्यावेळी.. पण त्या जाहिरातींना लय ताल मनोरंजन सर्व अंगं होती आणि आतासारख्या भरमसाठ जाहिराती नसत..
सुटींग शर्टिंग, मसाले, साबण, चॉकलेट, पेस्ट, थंडा अशा विविध प्रकारच्या जाहिराती असत.. आणि त्यातून दिसत असत ॲक्टर्स आणि क्रिकेटर्स.. साबण म्हटलं की सर्वप्रथम समोर येते ती लक्सची.. परंपरा जी सुरु झाली ओल्ड इज गोल्ड जुनी अभिनेत्री लीना चिटणीस पासून.. मग काय निरुपा रॉय, वहिदा रेहमान, श्रीदेवी, जयाप्रदापासून ते दीपिका पादुकोणपर्यंत अनेक अभिनेत्रींनी या लक्सवर बाजी मारलेली.. असा हा सुरु झालेला जाहिरातींचा जलवा..
घोड्यासोबत समुद्रकिनाऱ्यावरुन धावत जाणारा विनोद खन्ना सिंथॉल बॉय म्हणून खूप प्रसिद्ध होता.. तसेच बाँबे डाईंगवरही सुनील गावसकर, रवी शास्त्री ते अगदी अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांनीच बाजी मारलेली.. आणि आपल्या लाडक्या गब्बरसिंगचा ग्लूकोज D ताकदवाला बिस्कुट नंतर तो झाला पारले जी.. बॅगपायपर शत्रुघ्न सिन्हा ते जॅकी श्रॉफ आणि सनी स्कुटीची सचिन तेंडुलकर स्माईल लाजवाब.. मग सुरु झालेला जाहिरातींचा सिलसिला..
वॉशिंग पावडर निरमा वॉशिंग पावडर निरमा दुधसी सफेदी निरमा से आए रंगीन कपडा भी खिल खिल जाए.. बडे नाजोंसे पाली हमारी बन्नो तुझे दुल्हन बनाए रे प्यारी बन्नो तुझको हलदी का उबटन लगाए सखिंया तेरी काया को चंचल बनाए सखिंया देखो कुंदनसी चंदनसी महके हमारी बन्नो.. विको टरमरीक आयुर्वेदीक क्रीम त्वचा की रक्षा करे आयुर्वेदीक क्रीम.. यात पाहिलेली मृणाल कुलकर्णी.. ये कोई आम कॅस्मेटिक क्रीम नही है समझे..
ये है मिस्टर राम मुरारी.. चल मेरी लुना सफलता की सवारी.. आप अपनी बीबीसे कितना प्यार करते है? अगर आपकी जानसे भी जादा है इनसे प्यार तो लीजिए १००% सुरक्षित प्रेस्टिज.. जो बीबीसे करते है प्यार वो प्रेस्ट्जसे कैसे करे इंकार.. रवी.. ललिताजी आप तो वो हमेशा महेंगीवाली.. अरे केवल आधा किलो सर्फ पुरे एक किलो अन्य डिटर्जंट के बराबर होता है.. सस्ती चिज खरीदने में और अच्छी चीज खरीदने में फर्क तो होता है.. इसीलिए सर्फ की खरीदारी में ही समझदारी है.. है ना.. मान गए ललिताजी..
नंतर दाग ढुंडते रह जाओगेवाला असावरी जोशी फेम सर्फ एक्स्ट्रा स्ट्राँग आला.. आणि मग सर्फकी खरीदारी उंचावतच राहिली.. दातों की करे हिफाजत मोती सा चमकाए डाबर लाल दंतमंजनसे मुखडा खिल खिल जाए.. ये जमी ये आसमाँ हमारा कल हमारा आज बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज.. हमारा बजाज.. जलेबी.. धारा धारा शुद्ध धारा.. कॉफी पापा को नही चाहिए.. चाय पापा को नही चाहिए.. अब मम्मी क्या करेगी? आय लव यु रसना..
मग आला जोर जोर.. जोर लगाकर हैशा जितेंगे हम हैशा खिचों सारे हैशा.. ये फेविकॉल का मजबूत जोड है भाई टुटेगा नही.. हा sssss ... नेस कॉफी टेस्ट टु बेस्ट यु स्टार्टेड.. दे झिंग थिंग हे sss गोल्ड स्पॉट.. पुरबसे सुर्य उगा फैला उजीयाला जागी हर दिशा दिशा जागा जग सारा.. राष्ट्रीय साक्षरता मिशन.. बाप रे सर फटा जा रहा है.. कुछ लेते क्युं नही सिर्फ एक सॅरिडॉन सरदर्दसे आराम.. गले में खिच खिच गलेमे व्हिक्स की गोली लो खिचखिच दुर करो.. महकती घडियां चहेकते पल ले आयी खुशियां बदलबदल.. गोदरेज गोदरेज..
आणि ही तर सगळ्यांना आवडणारी सगळ्यांच्या घरात बोलली जाणारी जाहिरात.. बघा हं आठवते का? क्या हुआ बच्ची रो रही थी.. वुडवर्ड्स दे देना वही तो मै देती थी जब तुम छोटी थी.. वुडवर्ड्स ग्राईप वॉटर.. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.. I am complan boy I am complan girl.. सर्दीसे आराम चुटकीसे करे काम कोल्डरीन.. जब मै छोटा बच्चा था बडी शरारत करता था मेरी चोरी पकडी जाती.. जब रोशनी देता बजाज.. पर हम आपको एक बात कहना तो भुलही गये.. घबराईयेगा नही हमे कुछ नही चाहिए.. बस आप बरातियोंका स्वागत पानपरागसे किजिये.. पानपराग पान मसाला पान पराग..
ओहो दीपिकाजी आईये आईये आपका सब सामान तैयार है.. मान गए आपकी ताजगी नजर और निरमा सुपर दिनोंको.. युं खिली खिली युं संवर संवर ओ जाने जिगर तुम चली कहाँ सौंदर्य साबुन निरमा सौंदर्य साबुन निरमा.. आया नया उजाला चार बुंदोंवाला.. महिने भरकी सफेदी लाओ कुछ खास है हम सभी में कुछ बात है हम सभी में बात है खास है स्वाद है.. कॅडबरी डेरीमिल्क.. कर्रम कुर्रम कुर्रम कर्रम.. किती मजेशीर या जाहिराती आणि किती सुंदर होती ही सैर..