जादूला भेटला पीके
जादूला भेटला पीके
डोंगराच्या पठारावर पीके एकटाच गळ्यात कॅमेरा अडकवून फिरत होता. एवढ्यात मोठा आवाज आला. जमिनीवरची धूळ उडू लागली. पीकेने वर पाहिले तर मोठे यान येऊन जमिनीवर धडकले. यानाचे दरवाजे उघडले. त्यातून एकटा जादू बाहेर पड़ला अणि यान निघून गेले. पीके डोळे वटारून पाहत होता.
"काय रे काय पाहतोस "?
"काही नाही "
"आणि एवढ्या रात्री इथे काय करतोस "?
"काही नाही "
"सगळ्या प्रश्नाला उत्तर एकच काही नाही कोण आहेस तू "?
"मी पीके"
"पीके "
'तुच्या गळ्यात हे काय आहे तू मला पकडायला आलास का '
"नाही नाही मी इथे फिरायला आलोय "
"एवढ्या रात्री तुच्या दिसण्यावरून तर तू मनुष्य नाही वाटत कुठून आलास "?
"माहित नाही "
"हा आमच्यातला वाटतो '
"बरं पिके तू कुठे राहतो "?
"मी इथे तिथे फिरतो कुठे हि राहतो "
"बरं पीके तुला माझ्यासारखा कोणी दिसला काय "?
"नाही"
"कशाला"?
"मी माझ्या हरवलेल्या भावाला शोधतोय त्यासाठी मी परग्रहवरुन इथे आलोय "
"भाऊ"
"हो किती वर्ष झाली मी त्याला शोधतो पण काही मिळत नाही माझे आई बाबा त्याचे वाट पाहून थकले "
"पीके हे तुझ्या कानात काय टोचलंय "
"कानात माहित नाही जेव्हापासून पहिले तेव्हापासून आहे "
"खरंच "
"अरे अशी बाळी माझ्या कानात पण आहे आणि आईने मला सांगितलेले की लहान असताना आमच्या एलियन सोनाराने आपल्या कानात टोचले होते. "म्हणजे पीके तू माझा हरवेलला भाऊ आहेस "
"काय "?
"हो पीके"
'आता तू इथे तिथे नाही भटकायचं चल घरी "
जादूने यानाला परत बोलवले आणि त्यात बसून पीके आणि जादू निघाले
