जादू
जादू
आपल्या आजूबाजू चालेल्या परिस्थिती आणि समस्या पाहता जादू ने सुधारणा करण्यासाठी निवडणूक लडवण्याचे ठरवले आता जादू भारतीय नागरिक हि झाला आहे आधार कार्ड हि त्याच्याजवळ आहे जेव्हा पासून त्यांनी अपक्ष लढवण्याची ललकारी दिली अनेक पक्ष त्याच्या दारी फिरू लागले जादू ची प्रसिद्धी आपल्या कशी कामी येईल हे सगळेच पाहू लागले पण जादू हि आता पुरता इथे मुरला त्यामुळे त्यांनी सगळ्यांना बाहेरचा रास्ता दाखवला आपण अपक्षच लढेन ते हि लोकांच्या भल्या साठी'हे ठणकावून सांगितले
जादू ने आपल्या कार्यकर्त्या बरोबर घरोघरी जाऊन प्रचार सुरु केला लोकांना आपण काहीतरी नवीन करणार हे पटून देऊ लागला पण हा जर अपक्ष निवडून आला तर आपले काही खरे नाही म्हूणन इतर पक्षांनी त्याला डावलण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु केले त्यांनी त्याच्याविरोधात प्रचार सुरु केला "हा पर ग्रहवरचा तुमच्या समस्या काय सोडवणार आणि तो निवडून आला तर आपल्या लोकांनाच इथे स्थायिक करून घेणार मग तुम्ही माणसे जाणार कुठे "ह्या प्रचारानी काहींनी भीतीने जादू ची साथ सोडली पण काही माणसे जादू च्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली त्यांनी जोरात प्रचार सुरु केला
जसा जसा निवडणुकीचा काळ जवळ येत होता जादू ला निवडणुकीतून माघार घेण्यासाठी प्रयत्न चालू झाले पण जादू हि तेव्हडाच कणखर असल्याने तो घाबरला नाही एकदाचा तो दिवस उजडाला मतदारांनी आपली मते बंदिस्त केली आणि उमेदवारांच्या मनाला घोर लागला तो निकालाचा
दोन दिवसांनी निकालाची सकाळ उजाडली सगळे उमेदवार आपल्या कार्यकर्त्या सह उपस्तिथ होते एक एक करून निकाल जाहीर होत होता अखेर जादू ने बाजी मारली आणि त्याच्या समर्थकांनी एकच जलोष केला जादू ने आपल्या हातात माईक पकडत बोलण्यास सुरवात केली "धन्यवाद मला विजयी केल्या बद्दल मी माझा दिलेला शब्द नक्कीच पाळेल आणि हो माझ्या सह उमदेवार मित्रानो तुम्ही माझ्या परभावासाठी खूप प्रचार केला कि मी दुसऱ्या ग्रहवरचा मी काय समस्या सोडवणार वैगरे तर मी तुम्हला सांगू इच्छितो कि हि मी जर याना परकं असतो तर ते मला निवडून का दिले असते त्यांनी मला आपलं आणि मी त्याना माझी माणसं समजतो म्हणून तर मी विजयी झालो आणि हो मी परग्रहावरचा असून त्याची समस्या समजू शकलो पण तुम्ही त्याचेच असून का नाही समजू शकला आणी हो आमच्या ग्रहावर तर खड्डेच असतात पण तुमच्या रस्त्यात खड्डे कसे ते ही एवढे पैसे खर्च करून" हे ऐकून बाकी उमेदवार रागाच्या भरात निघुन गेले आणी सर्वांनी जादूचा जयजयकार केला.
