जादू
जादू
अभयला आज परदेशात येऊन साधारणतः वीस वर्ष झाली असतील . एका मोठ्या कंपनीमध्ये शिवो म्हणून काम करीत होता .जेंव्हा परदेशात एका कॉन्फरन्स साठी विशिष्ट प्रकारचे प्रेझेंटेशन देत असतांना त्याच्यां सहकारी मित्रांपैकी काही पण .मूली होत्या त्यापैकी एक मुलगी तिचं नाव होत 'दिव्या ' बरोबर काम करीत होती . मी भारतीय संस्कृती वाढलेलो आणि परदेशात गेल्यानंतर तेथील संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी मला बराच कालावधी गेला . हळूहळू तेथील भाषा आणि तेथील पद्धती शिकलो . कंपनीने दिलेल्या गेस्ट हाऊस वर सुरुवातीला काही दिवस काढले नंतर कंपनीने एक फ्लॅट दिला . गाडी दिली . आर्थिक सुबत्ता चांगली असल्या कारणाने एक पदाधिकारी म्हणून जबाबदारी दिल्यामुळे व त्या कंपनीचा पूर्ण कारभार ,मार्केटिंग , प्रोडक्शन आणि पूर्ण मॅनेजमेंट या सर्वाचीं जबाबदारी माझ्यावर दिली होती . महिन्याला कामाचा रेफरन्स घेतला जात होता . त्यामध्ये मी सक्सेस होत असल्या कारणाने माझी इज्जत , माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन , सर्व मॅनेजमेंट मध्ये चांगला होता . हळूहळू दिव्या कामाच्या संबंधी व कंपनीच्या कॉन्फरन्स ला सिटी मध्ये जावे लागे तेव्हां प्रवासा मध्ये. कॉनफरन्स घेत असताना आमचे एकमेकांचे विचार जुळले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले . परदेशात असल्याने येथील संस्कृती प्रमाणे आम्ही कोर्ट मॅरेज केलं . तिकडे भारतामध्ये आई-वडिलांना नंतर कळवण्यात आल साधारणतः पाच सहा वर्ष झाली असतील तरीही आम्ही भारतामध्ये येऊ शकलो नाही . कामाचा व्याप वाढत गेला .व आणि दिव्या येथील असल्या कारणाने आम्ही तेथेच स्थाईक होण्याचा निर्णय घेतला . तिकडे आई वडील वार्धक्यामूळे आजार वाढले .आमच्या चिंतेने व आजाराने त्यांना घेरलं आणि अचानक एक दिवस वडिलांच निधन झालं . निरोप मिळाला . पण ? आमची मोठी कॉन्फरन्स असल्यामूळे मी पोहोचू शकत नव्हतो . त्यांचे शेवटचे अंत्यदर्शनही मला घेता आलं नाही . त्यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर कामाच्या व्याप ; पैशाचा हव्यास , स्वार्थापोटी नातेही पारखी झाली होती . त्यामुळे काही दिवसात साधारणता दोन वर्षानंतर आईचं पण अशाच आजारपणात निधन झालं . मी एकुलता एक मुलगा असल्या कारणाने शेवटी अंतिम समयी तेव्हां ही पोहोचू शकलो नाही . तिकडे दिव्या खूप हट्टी होती . अनेक अडचणी ,संस्कृती , प्रेम ,माया. ममता यांची संस्कृती नसल्यामुळे दिव्याचे विचार ! आता तू तिकडे जाऊन काय करणार ? तू जेव्हां तीन दिवसांनी पोचशील तेव्हां अंत्यविधी झालेला असेल .आणि तिकडे उरलंच काय ? ते राहात असलेले फ्लॅट त्यांची प्रॉपर्टी ? आहे तशीच असेल त्यामुळे तू जाऊ नको असा हट्ट धरला .इकडे माझी मूले लहान असल्याकारणाने मी जाण्याचे टाळले . तिकडे हळू हळू माझी स्वतःची फॅक्टरी सुरू केली कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत होता . काही वर्षाने थोडा निवांत झाल्या कारणाने व दिव्याला भारत देशाकडे आपल्या भूमीकडे जाण्याची ओढ लागली . साधारणता एक वर्षाचा सुटीचा कालावधी काढून नियोजन केले . विमानाने एक दिवस आमी भारतात पोचलो . साधारणतः वीस वर्षाच्या कालावधीनंतर पोहोचल्यामुळे आम्ही राहत असलेली जागा .व तेथील संपूर्ण शहर बदललेले होत . तर काही अनोळखी: फोनवरून मी एक हॉटेल बुक केली होती . एक गाडी बुक केली . आम्ही हॉटेलमध्ये उतरलो दुसऱ्या दिवशी आमच्या घराचा शोध घेण्यासाठी निघालो . मात्र तेथे एका बिल्डरने अवाढव्य कॉम्प्लेक्स उभ केल होत व सारी कागदपत्र खोटे बनवून पूर्ण कॉम्प्लेक्स स्वतःच्या नावाने करून घेतल्या कारणाने मला धक्काच बसला . मला परत मिळविण्यासाठी आता कायद्याचा आधार घ्यावा लागेल. त्या बिल्डिंगमध्ये बिल्डरने इतर अनोळखी व्यक्ती किंवा बाहेरील व्यक्ती येवू नये यासाठी आखलेला प्लॅन होता .व तो कोणालाही कळत नव्हता . आम्ही फ्लॅट घेण्यासाठी त्या बिल्डरकडे पोहोचलो तेंव्हा त्यांनी काही शिल्लक असलेले फ्लॅट कुणी घेत नाही . बघितल्यास तेथे राहू शकत नाही . विशिष्ट प्रकारचे भीती दाखवून आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला . पण माझा इतर गोष्टींवर विश्वास नसल्याने मी कोणत्याही गोष्टीला तयार होतो . आम्हाला दोन फ्लॅट पाहिजे मी विनंती केली . व दुप्पट किंमत देऊन मी खरेदी केला . इकडे कायद्याचा आधार घेऊन माझी स्वतःच्या वडिलांची जागा असल्याने मी फ्लॅट दुप्पट किंमत देऊन खरेदी केला . आम्ही रहाण्यासाठी येणार आजूबाजूचे लोकांनी सांगितले कि फ्लॅटमध्ये आजपर्यंत कुणीही टिकत नाही . तुम्ही येवू नये अशी माझी अपेक्षा .मात्र मला तो मुद्दाम भीती दाखवतो असे वाटले .आम्ही ठरवले प्रथम सर्व फ्लॅटची पाहणी केली .तेव्हां एका रूम मध्ये विशिष्ट प्रकारचे कागद .वस्तू दिसल्या आम्ही नोकरा कडून साफसफाई केली . मात्र तेथे अनेक विचित्र गोष्टी घडतात ;अचानक काहीतरी 'जादू ' घडतो . आणि जादूने त्यावस्तू येऊन पडतात . आजुबाजुच्या ग्राहकांनी भिती दाखवली . आम्ही दोन-तीन दिवसांनी परत फ्लॅटची पाहणी करण्यास गेलो असता प्रत्येक दरवाजा मध्ये वेगळ्या प्रकारच्या अशा चित्र विचित्र वस्तू आणि कोरे कागद मी बघितले .. ते कोरे कागद मी प्रकाशाच्या दिशेने धरले असता त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे सांकेतिक चिन्ह लिहिली होती . तो कागद पांढरा शुभ्र दिसला पण कोणालाही तो वाचता येत नव्हता . मी विज्ञानाचा अभ्यास केल्या असल्याने मला काही गोष्टींची कल्पना होती . म्हणून मी उष्णते जवळ तो कागद धरला तेंव्हा अक्षर स्पष्ट दिसत व त्यात संदेश दिलेला होता . असले जादू करणारा हा मानवच असला पाहिजे . कारण लिहिणे . वाचणे व भाषा हे इतर प्राणी करू शकत नाही तेव्हांच शंका आली . शोध घेण्याचा प्रयत्न करू लागलो . फ्लॅटचे सर्व दरवाजे लॉक केल्यानंतर गेटवर सीसी टीव्ही कॅमेरे बसण्यास सांगितले . मी रोज टीव्ही चे फुटेज बघू लागलो एकही व्यक्ती येताना किंवा जाताना दिसत नव्हती . मात्र फ्लॅटमध्ये वस्तू येतात कशा ? शोधू लागलो . तपास लागत नव्हता . आम्ही प्रत्यक्ष फ्लॅटमध्ये राहायला गेल्या नंतरच कळेल कि रात्री अपरात्री कोणी तरी येतो .म्हणून आम्ही रात्री निवांत आमच्या रूममध्ये झोपलो अचानक दोनदा ! लाईट गेली .परत आलो . पाहतो तर फक्त आमच्या फ्लॅटची लाईट बंद झालेली दिसली . बाहेर मात्र कोणाचाही लाईट बंद नव्हती . म्हणून दारावर आणि स्विच कडे कॅमेरे बसून घेतली . माझ्या रूम मध्ये सीसीटीव्हीचे फुटेज बघत . अचानक खिडकीच्या काचेवर मानवी आकृती ची सावलीन पडताना दिसली सर्व अतिशय घाबरले .
दिव्या ने रात्री नळ चालु केला तेंव्हा अचानक लाल रक्ताचे पाणी पडतांना बघुन घाबरली .मी खात्री केली तेव्हां खरेच मलाही कळत नाही . लाल रंगाचे पाणी दिसले ;रात्रीचे दोन अडीच वाजले होते पाच मजली बिल्डिंग वरून टाक्या चेक करू शकत नव्हतो . म्हणून मी दुर्लक्ष केले व झोपलो असताना परत खिडकीच्या काचांवर टप टप केल्याचा आवाज व मानवी आकृती सारख्या सावल्या दिसल्या ! सर्व लाईट ऑन केले . बघतो तर तेथे कोणत्याही प्रकारचा आवाज आला नाही .म्हणून मी परत दीड दोन तास बघत राहिलो . प्रत्येक वेळेस होणारी घटना नव नवीन घडत . असल्याकारणाने आता पुढची घटना काय घडेल किंवा पुढची जादू काय होईल ?हे माहिती नसायच मात्र उद्देश एकच फ्लॅटमध्ये असणारे निवांतपणे व आनंदाने राहू शकणार नाही व हा फ्लॅट सोडून नक्की जाणार !याच उद्देशाने हे सर्व काही चालले होते . असे प्रकार दोन दिवस झाले दोन दिवसात पाच ते सहा प्रकारचे जादू घडून आले दुसऱ्या दिवशी मात्र रात्री आमच्या हॉल मध्ये एका पिशवीमध्ये दोन-तीन वस्तू आढळून आल्या जेव्हां त्या वस्तूंच मी निरीक्षण केले त्या वस्तूंमध्ये जे भानामती ,अंध श्रद्धा किंवा डोंबारी लोक ज्या प्रकारचे साहित्य वापरतात त्या भरलेल्या होत्या . आमच्या हॉल मध्ये आता मात्र मी विचार करू लागलो सीसीटीव्ही कॅमेरे असतानासुद्धा ! वरून कोणी आलं नाही किंवा शेजारीपाजारी कोणतेही फ्लॅटमधून येताना किंवा जातांना दिसले नाही . मग हे घडले कसे . म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशन मध्ये विशिष्ट प्रकारच्या घटना घडून आमचे स्वास्थ्य खराब करण्याचे प्रयत्न कोणी करत आहे . कृपया त्याची चौकशी व्हावी . अशी तक्रार केली . पोलिसही त्यांच्याप्रमाणे बिल्डींगच्या बाहेर विशिष्ट पद्धतीने खबऱ्यांची नेमणूक करून सुरुवात केली . मात्र आमच्या दोन्ही फ्लॅटमध्ये जादूचे प्रयोग मात्र वाढत होते . ते कमी होत नव्हते मनामध्ये एक भीती निर्माण झाली एवढी आपण सुसक्षित असतानासुद्धा ? एकदा मनामध्ये भिती निर्माण झाली कि स्वतःची सावली सुद्धा आपल्याला घाबरवते त्यामुळे दिव्या आणि आजूबाजूचे लोकानीं सांगितले की स्वास्थ खराब होण्यापेक्षा तिथे राहू नका . कुणाचे तरी आत्मे तेथे आहेत ते प्रयोग घडून आणतात आणि ते फ्लॅटमध्ये कोणालाही राहू देत नाही . मात्र मला वाटले ही जागा ज्यांची ते माझे आई-वडील असतील तर त्यांचा नक्कीच विरोध नसेल .उलट त्यांचा सपोर्ट असेल कारण कोणते आई-वडिलांना वाटेल की त्यांच्या मुलांनी आपल्या जागेत रहावे त्यामुळे जरी त्यांची आत्मे असली ती आमच्यासाठी हे नक्की चांगले वागतील .त्यामुळे भूत . प्रेत याविषयी मनात त्या प्रकारची भीती वाटत नव्हती . व प्रत्यक्ष पुरावा म्हणून कोणतीही गोष्ट सापडत नव्हती . एके दिवशी तर अचानक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एका प्राण्याच्या पायांची बोटे ;हाडांचे तुकडे. पडलेली आढळली . माझा पारा चढला . पोलिसांकडे जाऊन तक्रार केली की आज पर्यंत दोन आठवडे होत आले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा सुगावा लागू नये ? वर पर्यंत वस्तू येवून पडतात त्यामुळे नक्कीच मानवी हस्तक्षेप असला पाहिजे .त्याशिवाय या घटना घडणार नाही . म्हणून पोलिस जागी झाली व बिल्डिंगच्या सभोवती एक ते दोन पोलिस ठेवले मात्र त्यांना काही आढळून येत नव्हते . दिव्या व मी मुलांना घेऊन समोरच्या फ्लॅटमध्ये त्यांना विनंती केली आणि तेथून निरीक्षण करण्याचे ठरवले . तेव्हां मात्र रात्रभर टेलिस्कोप घेऊन मी बघत होतो . ज्या बाजूने वस्तू टाकल्या जातात त्या नक्कीच खडकीच्या बाजूने टाकल्या जात होत्या .व आम्ही दहाव्या मजल्यावर असल्याने दोराच्या सहाय्याने एवढ्या उंचीवर कोणी येऊ शकणार नाही . आणि आले तर येण्यासाठी त्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटाचा कालावधी तरी लागेल आणि तो सहज दिसून येईल. म्हणून मी निरीक्षण करत बसलो असता अचानक एक वस्तू अंधारामध्ये येताना दिसली . आणि आमच्या फ्लॅटच्या जवळ मागेपुढे होताना दिसली . माझ्या टेलिस्कोप मधून एक मानवी आकृती काळी गडद छाया दिसत होती . दहा मिनिटात परत ती आकृती लांब तरंगत जाताना दिसली . मात्र जात असताना ती वस्तू खोटी असेल माझी खात्री झाली . काहीतरी तंत्रज्ञान किंवा रोपवे सारखा प्रकार असेल .म्हणून मी सकाळी पतंगाची दोरी .तार वगैरे अशा काही गोष्टी अडकवल्या का बघितल्या . तशा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट दिसला नाही . मग मात्र मी स्वतः खिडकीच्या बाजूने अंधारात दिसू नये म्हणून पूर्ण काळा ड्रेस परिधान केला व ज्या ठिकाणी ती काळी आकृती स्थिरावली होती तेथून दोन चार फुटावर एका कोपऱ्यामध्ये दडून बसलो . दोन-अडीच वाजेनंतर त्याच वेळेत ती आकृती मला येताना दिसली . कोणतीही हालचाल न करता हळूहळू खिडकीजवळ आली तेव्हा मी डायरेक्ट पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या तयारीत होतो . येताक्षणी मी आकृती पकडली तेव्हां विशिष्ट प्रकारचा आवाज येत होता . आणि पकडल्यानंतर ती वस्तू मी खाली खेचली तेंव्हा लक्षात आले ते एक द्रोण होतं आणि त्या ड्रोनच्या चारी बाजूला काळया रंगाच्या मानवी आकृतीच्या कागदाच्या प्रतिकृती चिकटवल्या होत्या . व खाली विशिष्ट प्रकारच्या वस्तू अडकून त्या वस्तू द्रोण च्या साह्याने टाकल्या जात होत्या .ते द्रोण रिमोटच्या सहाय्याने दूरच्या एका बिल्डींग वरून येत होतं . पकडल्यानंतर मी त्वरित ती वस्तू प्रकाशात नेली तेंव्हा विशिष्ट प्रकारचे सेन्सर लावले होते .त्या सेंन्सरद्वारे इतर माणसांनी स्पर्श केला कि चित्रविचित्र अशी आवाज काढणारी यंत्रणा बसवलेली होती . व असंख्य माणसांचे आवाज आपल्यामागे येत आहेत असे रेकॉर्डिंग आवाज होते . माझा स्वतःवर पूर्ण विश्वास असल्याकारणाने जगामध्ये या जादू वर विश्वास नसल्याने वस्तू म्हणजे ड्रोन व उजेडात आणल्यानंतर सर्वांना खुलासा झाला . भितीकमी झाली . जवळची सुमारे शंभर-दोनशे व्यक्ती धमा झाल्या जादू कसा दाखवला जातो . किंवा जादू कसे करतात याचा पुरावा दाखवला ते द्रोण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकेशन द्वारे कंट्रोल करणाऱ्या इमारतीपर्यंत व जादू घडवून आणणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले तेंव्हा खुलासा झाला की ही सगळी यंत्रणा व जादूचे प्रयोग हे कॉम्प्लेक्स मध्ये मूळ मालकापर्यंत पोचू नये व त्याचा तपास लागू नये यासाठी निर्माण केलेली यंत्रणा होती . जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी संपत आला तेंव्हा मी कायद्याचा आधार घेऊन प्रकरण संपवले व त्या कॉम्प्लेक्स चा ताबा अधिकृतरित्या मिळवला . आज फ्लॅटमध्ये आम्ही आनंदाने निवांतपणे मुक्काम करू शकलो .तेव्हा कळाले आजही भारतामध्ये अंधश्रद्धा .रूढी , या कशा पद्धतीने पाळल्या जातात व त्यांना खतपाणी घातले जाते . उद्देश कोणता असतो व लोकांना कशा प्रकारे बळी पाडले जाते याचे चित्रण प्रसारमाध्यमांद्वारे माहिती दिली . तेव्हां पासून भारतामध्ये जादूचे प्रयोग करणारे त्याचा उपयोग करणारे यांचा शोध घेऊन समाजामध्ये वाईट कृत्य करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी जादू निर्मूलन सारख्या संघटनांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले . आपल्यासारखे इतर लोकांचा बळी जाऊ नये यासाठी मी माझ्या वडिलांच्या नावाने त्या संघटनांना मदत देवू लागलो . जेथे जेथे अशा घटना घडत असतील तेथे अशा प्रकारची मदत करून जादू हा फक्त हातचलाखी . विज्ञानाचा दुरुपयोग . करून केवळ समाज घातक अशा प्रवृत्ती असणारे व्यक्तीच करतात . त्यांचा बिमोड करण्यासाठी मी शेवट प्रर्यंत प्रयत्न करत राहील . दोन चार मुक्कामानंतर परत परदेशात व्यवसायाच्या व्यापामुळे परत जाण्याचे ठरविले व जादू हा शब्द कायमस्वरूपी लोकांच्या मनामधून भीती घालवण्याचे ठरवले .
