Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

SWATI WAKTE

Tragedy


2  

SWATI WAKTE

Tragedy


हुंडा

हुंडा

3 mins 27 3 mins 27

समाजातील रुढीपैकी एक रुढी अनघाला कायम सतावत होती. ती म्हणजे हुंडा पद्धती. अनघा खूप संस्कारी तसेच थोरामोठ्यांचा आदर करणारी होती. पण हुंडा पद्धतीमुळे ती कितीही प्रयत्न करून स्वतःच्या सासरच्या लोकांचा आदर करू शकत नव्हती..


अनघा ही एक साधी, सालस, विज्ञान पदवीधर मुलगी. थोडी घाबरट, भित्री, हल्लीच्या मुलींसारखी चुणचुणीत बिलकुल नाही. पण कुणावर अन्याय करायचा नाही, तो सहनही करायचा नाही. अशी ही अनघा जेव्हा लग्न करण्याचा विचार घरचे करतात, तेव्हा तिच्या घाबरट स्वभावामुळे नकार येतात. एक मुलगा जो तिच्या घरच्यांना आवडतो. त्याच्याकडूनही होकार येतो. मुलाला पगार कमी असतो पण मुलाच्या घरचे सुस्थितीत आहे. पण त्या मुलाच्या घरचे मुलीच्या वडिलांना अर्धे घर घ्यायला पैसे आणि अर्धे पैसे आम्ही देतो आणि लग्नाचा दोन्हीकडचा खर्च तुम्हीच करा ही अट घालून लग्न पक्कं करतात. असा हा हुंडा ठरवून अनघाच्या सुखासाठी तिचे वडील लग्न पक्के करतात.


लग्नासाठी तिचे वडील कर्ज घेण्याची जुळवा जुळव करतच असतात पण अनघाच्या होणाऱ्या सासूचा अनघाला सारखा फोन येतो. फक्त लग्न ठरवून ठेवले, बाकीच्या ज्या गोष्टी ठरविल्या त्याचे काय... त्यांना हुंडा हातात पाहिजे असतो. अनघाला आणि तिच्या आई-बाबांना आश्चर्य वाटते की हे सारखे पैशासाठी मागे का लागले. तेव्हा तिचे वडील चौकशी करतात तर त्यांना कळते मुलाचे आई-वडील जे सुस्थितीत म्हणून आपण लग्न ठरविले तसे काही नाही. मुलावाल्यांनी जो बायोडाटा बनविला तो खोटा आहे. मुलाला तर पगार नाहीच पण मुलाचे वडील असेच जेमतेम काम करून घर चालवत होते. हे माहित पडल्यावर काय करावे, हे त्यांना कळेनासे झाले. कारण लग्न मोडता येणार नव्हते. साखरपुडा झाला होता आणि आता लग्न मोडले तर समाजात बदनामी होईल आणि परत मुलीचे लग्न होणार नाही या भीतीपायी त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला आणि त्यातल्या सकारात्मक बाजू बघून जसे मुलगा हुशार आहे, त्यामुळे आयुष्यात धडपड करून चांगली नोकरी मिळवेल आणि मुलीला सुखी ठेवील आणि जे आपण अर्धे फ्लॅटचे पैसे दिले ते मुलीलाच मिळतील या सर्व गोष्टीचा विचार केला. आणि ठरल्या प्रमाणे लग्न झाले. अनघाच्या वडिलांनी दोन्हीकडचा खर्च केला आणि मुलाच्या वडिलांना हुंड्याची ठरलेली रक्कम दिली.


लग्न झाल्यावर मुलगा हुशार असल्यामुळे चांगली नोकरी त्याला मिळाली आणि जेव्हा फ्लॅट घ्यायची वेळ आली तेव्हा अनघाच्या सासरच्यांनी त्यांना पूर्ण रक्कम न देता वीस लाखातले पाचच लाख दिले. स्वतःजवळचे देणे तर दूर पण तिच्या वडिलांनी दिलेले पूर्ण पैसेही त्यांना दिले नाही. आणि घर घेईपर्यंत अनघाच्या बाबांनी दिलेल्या पैशाचे व्याजही स्वतःकडे ठेवले. या सर्व गोष्टी अनघाला खटकत होत्या. तिने या गोष्टीचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण तिला उत्तर मिळाले नाही. अनघा घाबरट असली तरी अन्याय सहन करणारी नव्हती. तिने प्रत्येक वेळी त्याचा जाब विचारला पण उत्तर आणि हिशोब मिळण्याची अपेक्षा नसल्याने तिला सासरच्या लोकांचा तिळमात्रही आदर वाटत नव्हता. कालांतराने तिने सासरच्या लोकांशी सर्व संबंध तोडले... ते घरी आले की ती त्यांच्याशी चांगले वागायची पण ती कधीही मनापासून त्यांचे काहीही करायची नाही. आणि ते जेव्हा गावी असतील तेव्हा कधी काहीही झाली तरी विचारपूसही करायची नाही. पण तिच्या सासरच्या लोकांना त्याचे काहीही वाटायचे नाही


कालांतराने त्यांच्यात कुठलाच संवाद, आपुलकी राहिली नाही. आणि नात्यात दुरावा निर्माण झाला. खरंच हुंड्यामुळे नाते तुटत असेल तर हुंडा घेणे कितपत योग्य आहे. परिस्थिती तुमची वाईट आहे म्हणून मुलीकडच्यांकडून पैसे घेणे कितपत योग्य आहे. मुलासाठी हुंडा घेतला तर तो त्याच्या आई-वडिलांनी स्वतःजवळ ठेवणे कितपत योग्य आहे, मुलीचे आई-वडीलही तिला शिकवतात, मोठे करतात आणि मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच घरासाठी आयुष्यभर राबते. तिच्या आई-बाबांची तिच्याकडून काहीही अपेक्षा नसते. असे सर्व विचार अनघाच्या मनात कायम घर करून असतात...


Rate this content
Log in

More marathi story from SWATI WAKTE

Similar marathi story from Tragedy