Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

हरवलेली आजी

हरवलेली आजी

4 mins
355


सोनाली येणार आहे म्हणून स्मिता ताईंची अगदी जय्यत तयारी सुरू होती... लेक आली की काय करायचं? कुठे जायचं? सगळ अगदी ठरवून मोकळ्या झाल्या.. वसंतराव सांगत होते, "आग हो धीराने घे... " अमेरिकेहून येते आपली लेक अंतराळातल्या एखाद्या परग्रहाहून नाही..


असुदे हो पाच वर्षानी येते माझी लेक, माझा नातू एक वर्षाचा असताना गेलाय तो आता येतोय, सोबत माझी नात पण येते एवढूशी परी.. तिला तर मी पहिल्यांदा बघणार आहे.. दुसर बाळंतपण त्यांचा हक्क.. म्हणुन मला काही तिकडे जाता आले नाही आणि तुम्ही मला पाठवल नाही.. मनात किती स्वप्न बघितली होती अमेरीकेत जायला मिळेल पण काय सर्व तसेच राहिले.. स्मिता ताई टोकून बोलल्या...


अगं, आपली एवढी परिस्तिथी नाही.. तिकीटाचा खर्च केवढा आहे माहीती आहे का तूला? आणि तिच्या सासूबाई होत्या ना तिकडे.. त्याचं पण नातवंडच ना.. वसंतराव


असुदे हो.. जाऊदे माझ मेलीच नशीबच फुटकं.. स्मिता ताई


आता आली ना कि सर्व कसर भरून काढेन, एवढ्या वर्षाने येते त्यात आठ दिवसच.. स्मिता ताई एकदम हळव्या झाल्या..


चला, आई तयारी करायची आहेना... सून अंकिताने विषय बदलला..


त्यांना काय चालेलं काय नाही असे वाट्त होते अंकिताला.. तिने तिच्या पद्धतीने सर्व तयारी केली..


तो दिवस आला, सोनाली आली.. दोन्ही मुलांनी वाकून सर्वांना नमस्कार केला, मराठीत बोलत होते.. स्मिता ताई परत कौतुक करू लागल्या.. नातवंडाना असलेली शिस्त बघून त्या चाट पडल्या..


संध्याकाळ झाली की त्यांचे तें श्लोक पठण, सर्व स्तोत्र.. नातवाचे उच्चार तर एकदम स्पष्ट... पुस्तक वाचन, चित्रकला सगळे कसे टाइम टू टाइम...


आमच्या इथे बाई सगळाच उजेड..!! सारखा तो मोबाईल आणि टीव्ही.. मुलांना श्लोक येतं नाहीत की कविता.. गोष्ट सांगणं तर दूरच..!! स्मिता ताई माहेरी आलेल्या आपल्या लेकीला सांगत होत्या... सोनाली काहीच बोलली नाही.. अंकिता आपली सर्व ऐकत होती..


दोन- तीन दिवस सर्व निरीक्षण केल्यावर सोनालीने विषय काढला.. अगं आई, आजी म्हणून तू काय करतेस?


तीच्या या प्रश्नाने त्यांना आश्चर्य वाटले.. सोनाली, हा काय प्रश्न? याचा काय अर्थ?


अगं आई, परवा तूच तर म्हणालीस ना, आमच्या इथे उजेड आहे.. पण तूझा रोल काय यात? तू तुझी वेळ झालीस की टीव्ही लावुन बसतेस.. मोबाइल बघतेस.. बाबांचा वेळ बाहेरची काम करण्यात जातो, दादा ऑफिसला.. वहिनीला घरातले पुरते. मग मुलांना जरा तू श्लोक, कविता, गोष्ट शिकवलं तर काय होईल?.. मुलांना घडवण, योग्य शिस्त लावण, संस्कार करणे ही एकट्या आईची नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे...


सोनालीच्या तोंडातून तें शब्द ऐकून स्मिता ताई स्वभावाप्रमाणे आकांडतांडव करू लागल्या.. तूच राहिली होतीस बाई, सर्वानी मलाच बोला.. आयुष्यभर तुमचे केले, आता नातवांचे करा.. आमचे आयुष्य आम्ही कधी जगायचं..?


आई शांत हो.. चुकीचा अर्थ काढलास तू.  सोनाली म्हणाली.


अंकिताच्या मनात आले, जाऊन मध्ये बोलावं, सोनालीच्या बोलण्याचा अर्थ असा नाही.. पण माय - लेकींच्या मध्ये आपण उगाच नको असा विचार करून ती गप्प बसली. ऎकु लागली.


आई, माझ्या मुलांना हे सगळं येतं कारण आम्ही प्रत्येक जण त्यांना क्वालिटी टाइम देतो.. जसे की माझा दिवसातला एक-दोन तास तरी मी मुलांसाठी काढते.. आजी एक तास काढते, बाबा- आजोबा सर्वच एक- एक तास काढतात.. त्या एक तासात आम्ही नो मोबाइल नो टीव्ही.. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस मिळते आणि मूल नवीन नवीन गोष्टी शिकतात. माझे सासरे त्यांना बाजारात घेऊन जातात कधी त्यांच्या सोबत बैठे खेळ खेळतात. ह्यांना वेळ मिळाला की हे सुद्धा काही लॉजिकल गेम खेळतात. माझी डूटी हि त्यांचा अभ्यास असते, सुट्टी असली की इतर ऍक्टिव्हिटी.. शाळेतून आले की अभ्यास करून थोडा वेळ टीव्ही बघतात आणि मग् प्रत्येक जण त्यांना वेळ देतोच..


शिस्तीचे म्हणशील तर तू बसून सारख काही लागलं की वहिनीला हाक मारतेस.. दादा आला की तो पण तेच.. मूल जे बघतात ना तसेच वागतात..


स्मिता ताईंना आपली चूक समजली, त्यांनी आपल्या वागण्यात बदल करायचं ठरवलं.. अंकिताला खूप आनंद झाला. मनात म्हणाली खरच नणंद असावी तर अशी...!!!


सोनाली सोबतचे हे दिवस अगदी मस्त गेले, जाताना सोनालीला भरून येतं होते पण तिने शांत राहणे पसंत केले.. मुलांचा दंगा सुरु होता, अंकिताने सोनालीचे आभार मानले.


सोनाली म्हणाली, अगं वहिनी आभार कसली मानतेस? माझी आई अशी कधीच नव्हती. पण या सोशल मिडियाच्या जाळ्यात अडकली गेली होती, भरकटली होती.. मी आल्यावर हे सर्व बघितलं तर मलाच धक्का बसला.. म्हणुन मी आईला चार शब्द सुनावले आता रिज़ल्ट काय येतोय तें मला फोन लावुन सांग. आणि हो पुढच्या आठवड्यात आम्हाला सी ऑफ करायला सगळे या हं एअरपोर्टवर...!!!


आता हा आठवडा पूर्ण ह्यांच्या बहिणीकडे आहोत आम्ही..!!


अंकीता आणि सर्वानीच भरल्या डोळ्यांनी सोनालीला निरोप दिला..


स्मिता ताईंनी घरात सर्वांचीच माफी मागितली, आणि सोनाली आत्या येऊन गेल्या पासून बदललेली आजी पाहून मुले सुद्धा खूप खुश होती.. घरातले सर्व जणच मुलांना क्वालिटी टाइम देऊ लागले त्यामुळे मुलांना मोबाइल टीव्ही साऱ्याचा विसर पडू लागला.. घरातले वातावरण अगदी हसते-खेळते झाले होते.


सोनालीचा फोन आला, तशी मुले गोंधळ करू लागली.. तेव्हा अंकीताने समजावल, उद्यां आपण जायचं आहे आतूकडे.. आता शांत रहा..


उद्या आतू जाणार, म्हणून मुलांनी आपल्या आतुसाठी गिफ्ट घेतले.. सर्व जण त्यांना सी ऑफ करायला आले. सोनालीचा निरोप घेताना सगळ्यांचे डोळे पाणावले होते..


मुलांनी आतूला खूप खूप थँक्स म्हणत गिफ्ट दिले.. अंकीता आणि समीरला सुद्धा आई मधील हा बदल बघून खूप आनंद झाला होता. मुलांमध्ये सुद्धा खूप ऍक्टिव्हपणा आला होता.


सोशल मीडिया हे अस जाळ आहे की, यात लहान मुलांपासून अगदी अबालवॄद्धांपर्यत सर्वावर त्याने जादू केली आहे.. हेच या कथेतून सांगायच आहे, कोणत्याही गोष्टीच्या किती आहारी जायचे हे आपल्यावर आहे. हि कथा आजूबाजूला अगदी दिसून येणारी आहे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational