गोविंद ठोंबरे

Tragedy

3.3  

गोविंद ठोंबरे

Tragedy

हैवान

हैवान

4 mins
16.7K


पाठीवरून ओघळणार्या झऱ्यामध्ये हाथ धुवून घ्यावा तसा हाथ तीच्या पाठीवरून सोमा फिरवत होता.तीला आपल्या मिठीमध्ये विरघळत ठेवत तो तिच्यामध्ये सामावून जाण्यासाठी आतुर झाला होता.तीच्या केसांचा अंबाडा सोडवत तो तीच्या ओठांवर स्थिरावत तीच्या डोळ्यांमध्ये नहायला अधीर झाला होता.ती देखील सोमाच्या आलिंगणामध्ये या सर्व रास खेळाचा आनंद मोहकपणे लुटत होती.प्रियकराच्या धडधडत्या काळजाला घट्ट बिलगून ती त्याच्या अंतरंगाचे रंग तीच्या मोहनीने उडवत होती. दोघे भान हरवून एकमेकांच्या प्रेम बंधनाला साक्ष देत आपला गन्ध एकमेकांना देत होते. ती लाजरी,बावरी होऊन त्याच्या हाथामध्ये आपला हाथ देऊन अबोल वचने देत होती. तीच्या प्रत्येक निःशब्द भावनेचा अचूक अर्थ सोमा लावत होता आणि तीच्या मनाला ओलाव्याची फुंकर घालत तीला जग विसरायला लावणारं सुख वाहत होता.

सोमा... सोमनाथ! सगळे त्याला सोमा म्हणायचे.अंगाने मध्यम शरीरयष्टीचा सोमा सावळ्या रंगात देखणा दिसायचा! स्वभाव असा की सहज समोरच्या व्यक्तीला चोरून घेणारा आणि त्याला आपली भुरळ पाडणारा! अगदी नजर लागावी त्याला असा तो सोमा ! शेतात राबणारा,आपल्या आई बापाला जपणारा,गावकऱ्यात रमणारा! त्याचा गावात खूप जीव जडलेला आणि गावातल्या मेघनेवर पण तितकाच! मेघना त्याची प्रियसी! अंगणवाडी शिक्षिका! गावातल्या अंगणवाडीचा प्राण ती! मेघना गावातलीच गुणी मुलगी होती. सर्वांशी गोड जिभेने बोलणारी, आनंद वाटणारी,लाडकी लेक! अप्पा साहेबांची दुसऱ्या क्रमांकाची लेक म्हणजे मेघना! अप्पा साहेब म्हणजे ज्येष्ठ आणि सधन शेतकरी वर्गातले गावकरी माणूस. दोनच लेकी त्यांना पण जिवाच्या पलीकडच्या आणि बापाच्या लाडक्या! मोठी मुलगी गावाजवळच्याच पाटलाच्या घराण्यात दिलेली आणि धाकटी मेघना आवड म्हणून अंगणवाडीत बालगोपालांना शिकवणी देते. इकडे सोमाच्या घरची परिस्थिती पण तोलामोलाचीच! सोमाच्या वडिलांचा रुदबा पूर्ण गावात होता. ग्रामपंचायत निवडणुकीत सोमाचे वडील खरे राजकारणी ठरत! गावातल्या कृष्ण मंदिरासाठी त्यांनी आपली जमीन दान केलेली! दिलदार माणूस!

सोमा आणि मेघना तसे बालपणापासून एकमेकांना ओळखत. पण प्रेमाची तोफ डागली गेली ती गावाच्या निवडणुकी दरम्यान! सोमा आपल्या बापासोबत राजकारणाचे खलबते हलवत होता आणि पूर्ण गावामध्ये आपलं पॅनल निवडून यावं म्हणून शेतात गाळणारं घामाचं पाणी राजकारणाच्या मैदानात जिरवत होता. अंगणवाडीतल्या बाईचा म्हणजे मेघनेचा जीव त्याच दरम्यान त्यात गुंतला होता जेव्हा सोमा अंगणवाडीच्या दुरुस्तीची आश्वासनं द्यायला अंगणवाडीत यायचा.मेघनेला त्याचं सारं काही भुरळ पडणारं वाटू लागलं.काही न काही बहाण्याने ती सोमाशी संवाद साधायची आणि एक दिवस तीने आपल्या मनातलं गोड गुपीत सोमाच्या कानी ओतलं! सोमा जणू एखाद्या सुंदर दमयंतीने करणी करून त्याला आपल्या लावण्याने भारून टाकलं असावं तसं मेघणेच्या प्रेम सागरात चिंब होत गेला! त्यानेही कबुली दिली आणि दोघे एकमेकांच्या ओढीने एकमेकात अजूनच गुंफत गेले!

मिठीतून स्वतःला अलगद सोडवत मेघनेने सोमाच्या डोळ्यात पाहिलं,अन कसल्यातरी केविलवाण्या नजरेने विचारलं,"सोमनाथ! माझा कायमचा होशील ना रे तू?" सोमा तीला मिठीत परत ओढत हलक्या हसऱ्या तोंडाने म्हणाला,"मेघने! होशील का काय विचारतेस? मी आता माझा राहिलोय कुठे !माझं अस्तित्व मी तुझ्या नावे केव्हाच करून टाकलंय." तीने लाडाने त्याच्या छातीवर आपला हक्क दाखवत हलकासा हाथ मारला आणि विचारलं,"नियतीने आपली गाठ सोडली आणि तुला मला विसरायला लावलं तर?" सोमा थोडासा चिंतेत भ्रमित झाल्यागत मेघणेच्या तोंडावर हाथ ठेवत उद्गारला,"काहीही कसं बोलावं मेघणे..माझ्या जीवाचा विचार कर!" मी तुला सोडून आता आयुष्य जगू नाही शकत. तूझ्या प्रत्येक दिवसाचा साक्षिदार आणि रात्रीचा रखवालदार व्हायचं आहे मला!" मेघना लगेच हसून त्याचं वाक्य थांबवत म्हणाली,"वाहह रे रखवालदारा! असा रखवालदार आवडेल हं मला !"

अचानक वीज चमकते आणि वादळ वाट जणू त्यांच्याकडे वेगाने दौडत येत आहे अशी येते! थेंबाचा शिडकावा दोघांना भिजवून सावध करतो. "मेघने!अचानक हे वादळ वारं आणि पाऊस कुठून सुरू झाला?" सोमा मेघनेला कवेत सामावून आडोसा शोधत बोलला. "म्म्म,माहीत नाही पण आता रखवालदार साहेबांनी आपल्या राणीला या पासून वाचवायला हवं हं!" मेघना चिडवत सोमाशी बोलली. सोमा तीला आपल्यासोबत नेत एका झाडाखाली आडोश्याला थांबला. पावसानं चांगलाच जोर धरला होता आणि विजा आता चांगलाच नाद धरू लागल्या होत्या. मेघना थोडी घाबरत सोमाच्या मिठीत शिरते आणि म्हणते,"सोमू!हे वादळ भयान वाटतंय रे ! निघुया का भिजतच? तसंही झाडाचा आडोसा बरा नव्हे या वादळ पावसात." ह्म्म, तू ठीक म्हणत आहेस .चल भिजत गेलेलं बरं. घर जवळ करू!" तेवढ्यात मेघना सोमाच्या शर्टला घट्ट पकडून त्याला जवळ ओढते आणि त्याच्या डोळ्यात स्वतःची नजर भरते. अचानक वीज चमकते अन ढग गडगडून त्या दोघांना एकमेकांच्या बाहुपाशात ढकलतो! चिंब साडीत भिजलेल्या मेघनेला तीचा रखवालदार गर्द प्रेमात चिंब चिंब करून टाकतो! ती शहारते, अलबेल होते आणि सोमाच्या ओठांवर परत आपल्या प्रेमाचा ठसा उमटविन्यासाठी आपल्या टाचांचा किनारा उंचावून त्याच्या गळ्याशी आपल्या हातांची माया पांघरते! परत एक वीज सर्रर्रर्रर्र करत गडगडत खाली कोसळत प्रेम भ्रमरांकडे सरसावते! अचानक होत्याचं नव्हतं करते आणि रखवालदाराच्या बाहूकोशातल्या दमयंतीचे प्राण रखवाली सोबत ओढून नेते! पडत्या पावसात राख व्हावी तसं दोघांची काया जमिनीला जाऊन चिटकते! दोघे एकमेकांच्या आलिंगणात घट्ट विरघळून जात असताना अचानक करपून जातात! नजर त्या झाडाची लागली असणार जिथे ते विसावले होते किंबहुना त्या पापी औदसा विजांना देखवले नसेल!

अजूनही तो पाऊस दोन्ही घरच्या उंबऱ्यांना रडवतो!त्यांच्या आठवणीने पूर्ण गाव गहिवरून जातो. ती अजूनही आंगणवाडीच्या बाळ चिमण्यांच्या मुखातून गाणं गाते आणि तो अजूनही गावातल्या गाव गप्पांमध्ये आठवून जातो! कदाचित तो दिवस हैवान होऊन आला होता !


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy