The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

DrSujata Kute

Tragedy Others

2  

DrSujata Kute

Tragedy Others

हा खेळ.... नशिबाचा

हा खेळ.... नशिबाचा

4 mins
732


शीतल अभ्यासात एकदम हुशार. सगळ्यांना खात्री होती की शीतल आईवडिलांचं नाव काढणार. शीतल आता बारावीत होती.नीट ची तयारी करत होती. दहावीतही ती मेरीटमध्ये आली होती. 


आणी तो दिवस उजाडला. शीतल ला अपेक्षेप्रमाणे नीट मध्ये चांगले गुण मिळाले होते. सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता.सोसायटी मध्ये तिचं सगळीकडे कौतुक होते. ती सुद्धा अगदी खूप खूष होती.तीचा मुंबईतील के.ई.एम.मेडिकल कॉलेज मध्ये नंबर लागला.पूढे शिकायचं आहे म्हणून यशाने हुरळून न जाता पुन्हा अभ्यास करायला लागली.ती खूप शांत होती.कुणाशी पण ती वाद घालत नव्हती.सिनीयरने सांगितलेले काम अगदी निमूटपणे करायची.म्हणून लवकरच ती सगळ्यांची लाडकी झाली. मग काय सगळेच तीच्या मदतीसाठी तत्पर असायचे. असे करत तीचे एम.बी.बी.एस पूर्ण झाले.अगदी प्रथम श्रेणीत.आणी तिची ईंन्टरशीप चालू झाली.ईकडे तिच्या आई वडिलांना आता तिच्या लग्नाची काळजी वाटत होती.


वर संशोधन चालू असताना तिच्या वडिलांना असे कळाले की आपला मित्रच त्याच्या मुलासाठी वधू संशोधन करत आहेत. त्याचे नाव अजय, ईंजिनीयर ,अमेरिकेत भलेलठ्ठ पगाराची नोकरी होती. भारतात महिन्याभरासाठी तो आला होता. त्यातच तो लग्न करून पुन्हा अमेरिकेत जाणार होता.शीतलच्या वडिलांनी लागलीच आपल्या मित्राला मागणी घातली. सगळे एकमेकांना परिचित असल्या कारणाने आणी अजय च्या वडिलांनाही शीतल आवडत असल्या कारणाने काहीही आढे वेढे न घेता त्यांनी होकार दिला. शीतलने आईवडील करतील ते योग्य असे वाटून लग्नाला लागलीच होकार दिला. लग्न अगदी पंधरा दिवसांनी ठरले. इकडे त्यांची पासपोर्ट आणी विजा काढण्याची तयारी सुरु झाली.तसेच लग्न अगदीच साध्या नोंदणी पद्धतीने करण्याचे ठरले. 


आणी तो दिवस उजाडला.सगळे सोपस्कार उरकून नोंदणी पद्धतीने विवाह उरकला गेला. काही दिवस इकडे तिकडे देव दर्शन करण्यात गेले.दोघे सोबतच अमेरिकेला गेले.


अमेरिकेत गेल्यावर दोन दिवस तीला जेट लॅग ने काहीच सुधारले नाही. तिसऱ्या दिवशी तिच्या असे लक्षात आले की अजय आपल्याला वेळच देत नाहीये. तीने त्याला फोन लावला पण आता तर तो फोन ही उचलत नव्हता. तिला तर त्याचे ऑफिस वगैरे काहीच माहिती नव्हते. ती राहत होती तिथे एक मैड होती. तीच सगळे शीतल चे खाणे पिणे बघायची. तिने मैड ला अजय बद्दल विचारले तेव्हा ती मैड म्हणाली की तो त्याच्या गर्ल friend कडे राहायला गेला आहे. 


 शीतल ला एकदम शॉक बसला. तिच्या पाया खालची जमीन सरकली. तिला आता समजले की आपली पुरती फसवणूक झाली आहे. तीने लागलीच आईला फोन लावला. पण आई फोन उचलेपर्यंत तीने काहीतरी विचार केला व फोन ठेऊन दिला. तिला वाटले एकदा अजय शी बोलू. पण आता त्याने तिचा फोनही ब्लॉक केलेला होता. आता मात्र तिला काहीच सुचत नव्हतं काय करावं ते. दुसऱ्या देशात होती ती. तिला एकदम आठवले की ती असलेल्या शहरात तिची एक सक्खी मैत्रीण आनंदी राहत आहे. तिने तिला फोन करून सर्व हकीकत सांगितली. आनंदी ने तिला घरी बोलावून घेतले.शीतलच्या आई वडिलांनी तिला खर्च करण्यासाठी म्हणून बराच पैसा सोबत दिला होता (डॉलर स्वरूपात ).आनंदी ने शीतल ला तिच्या जवळ राहायला सांगितले. "आता कसली काळजी करू नको, तू USMLE(अमेरिकेत डॉक्टर चे पोस्ट ग्रॅज्युएशन )परिक्षेची तयारी कर." आता मात्र शीतल ला आपण इथे राहून काहीतरी करू शकू. असा विश्वास तिला वाटायला लागला. तिने इतक्या जिद्दीने अभ्यास केला. की पहिल्या प्रयत्नात ती पहिली लेवल चांगल्या मार्काने पास झाली. 


इकडे तिने अजय विरुद्ध काडीमोड घेण्यासाठी कोर्टात केस दाखल केली . शीतल च्या घरी आता याची कुणकुण लागली होती. परीक्षा पास झाल्याने तिचा आत्मविश्वास बराच निर्ढावला होता. तिने तिच्या आईवडिलांना काय घडले सगळं खरं सांगितले. आणि तुम्ही माझी काळजी करू नका असेही सांगितले. शीतलचे नातेवाईक मात्र "असं कोणी करतं का बाई सहा महिन्यातच काडीमोड "हिच दोषी असेल, फार कौतुक होतं तिचं !आता काय झालं? अमेरिकेत पाठवले म्हणे. पण शीतल कशालाही डगमगली नाही. 


इकडे अमेरिकेत आता शीतलने एका मागे एक तिन्ही परीक्षा पास केल्या. मैत्रिणीवर काही ओझे नको म्हणून अर्धवेळ रिसेप्शनीस्ट ची नौकरी केली. आणी आता तर काय तीला चांगल्या मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले, राहण्याची सोय झाली आणी सोबत पगार सुद्धा. 


पुन्हा तीचे पुढचं शिक्षण सुरु झाले. आणी ती तिथेही सगळ्यांची लाडकी झाली. अश्यातच तिची ओळख जॉन शी झाली. अमेरिकन होता तो पण तो तीला सतत मार्गदर्शन करायचा. मॉरल सपोर्ट द्यायचा. आनंदी नंतर आता तिच्या विश्वात जॉन ने पदार्पण केले होते. तिने तिच्या आईवडिलांना जॉन बद्दल सांगितले. आईवडिलांनी पण तिला लग्नासाठी संमत्ती दिली. पहिल्यांदाच शीतल आईवडिलांकडे काही मागत होती. नाही कसे म्हणणार 


लग्न करून दोघेही शीतलच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी भारतात आले. भारतात आल्यावर त्या दोघांनी ठरवून चक्क शीतल चे गावच शिक्षणासाठी दत्तक घेतले. ही बातमी जागोजागी पसरली. पेपरमध्ये, दूरदर्शन, मीडिया सगळीकडे तीचे कौतुक होत होते. आणि तीचे तेच (बदनामी करणारे ) नातेवाईक आता शीतल आमची जवळची नातेवाईक आहे असे सगळ्यांना सांगत होते.

 


Rate this content
Log in

More marathi story from DrSujata Kute

Similar marathi story from Tragedy