Akbar mhamdule

Action Others

4.1  

Akbar mhamdule

Action Others

गुरु चे महत्व

गुरु चे महत्व

2 mins
444



आषाढी पौर्णिमा ला गुरु पौर्णिमा साजरा करण्यात येते व्यास ऋषी यांची पूजा करण्यात येते व्यास ऋषी यांनी वेदाचे ज्ञान लोकांना दिले होते म्हणून गुरुपौर्णिमा ला व्यासपौर्णिमा ही असं म्हणतात गुरुपौर्णिमा ही देशभरात खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते.


 गुरु हा शब्द आपल्या जीवनामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जोडलेला असतो कारण आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जीवनाच्या वाटचालीला चांगल्या गोष्टीला घेऊन जाण्यासाठी चांगल्या गोष्टीचा उद्धार करण्यासाठी आणि वाईट गोष्टीचा नाश करण्यासाठी एक गुरु ची आवश्यकता असते.

 

 आपल्या भारतात मध्ये गुरु शिष्य ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली. प्राचीन काळी विद्यार्थी आश्रमात राहून गुरुजीची सेवा करून ज्ञान व अध्ययन करायचे आणि आपल्या गुरुजींना गुरुदक्षिणाही द्यायचे. हे ऐकल्यावर आपल्याला एकलव्य आणि द्रोणाचार्य यांचे गोष्ट लक्षात येते की पहिले काळीत शिष्य आपल्या गुरूंना जे दक्षिणा मागितली ती द्यायचे आणि गुरुचा नेहमी आदर करायचे.


 तर जीवनामध्ये पहिले गुरू म्हणजे ते आपल्या आई वडील असतात आई जन्म देऊनी संस्काराचे ज्ञान देते तर तर वडील आपल्याला या जगामध्ये जगण्याचा वागण्याचा मार्ग दाखवतो नंतर जीवनामध्ये पुढच्या वाटचालीसाठी आपण शाळेत कॉलेजमध्ये जातो शाळा कॉलेज मध्ये आपले शिक्षक शिक्षिका हे आपले गुरु असतात जे आपल्याला वाचन लेखन चांगलं शिक्षण देउन जीवनाला यशाच्या पायरीला चढायला मदत करतात.


जीवनाच्या या प्रवासामध्ये कधी आई-वडील किंवा शिक्षक आपल्याला ओरडतात मारतात हे आपल्याला सुधारण्यासाठी आपण चांगले मार्गाला जाऊ त्याच्यासाठी उदाहरणात जसं एका दगडाला मूर्तिकार चिनी हातोडीने मार देऊन आकार देतो तसाच आपल्याला ओरडून मारून एक चांगला मार्गाला देशा देण्यासाठी चांगल्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी शिक्षक आई-वडील टोचून बोलतात त्यांचा ध्येय असतो आमचा मुलगा आमचा विद्यार्थी एक चांगला व्यक्ती बनवावा चांगल्या मार्गावर कडे जावं म्हणून ते असं वागतात थोडफार गुरु शिवाय आपल्याला दुसरा कोणी नाही.


 गुरु हा एक मार्गदर्शक आहे जो वाईट गोष्टींनी दूर करून चांगल्या गोष्टीकडे घेऊन जातो जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा समजून घेण्यासाठी जीवनामध्ये एक गुरु लागतो.गुरु चा अर्थ: गु’ म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु' म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज म्हणजे गुरु होय. गुरु हा आपल्या जीवनामध्ये ईश्वर स्वरूपी आहे जो आपल्याला ईश्वराशी एक रुपी व्हायचं मार्ग दाखवतो म्हणून हा श्लोक म्हटले आहे. 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः

गुरुर्देवो महेश्वरः ।


गुरुःसाक्षात् परब्रह्म

तस्मै श्रीगुरवे नमः ॥


Rate this content
Log in

Similar marathi story from Action