STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

गुन्हा

गुन्हा

2 mins
383

समीर सुर्वे चे घर आज सजावटीने सजले होते कारण हि तसेच होते त्याच्या मुलीचा ५ वा वाढदिवस आज होता वाढदिवस निमित्त पाहुणे आले होते समीर आणि मीरा सुर्वेंची एकुलती मुलगी अवनी हि खुश होती सगळे जमल्यावर केक कापण्यात आला काही मनोरंजन कार्यक्रम झाले गिफ्ट्स आणि आशीर्वाद अवनीच्या पदरात पडले जेवण वैगरे करून सगळे पाहुणे आपल्या घरी गेले अवनी हि आपल्या छोट्या दोस्तांबरोबर खेळून दमली होती आणि ती झोपी गेली समीर आणि मीरा ने आवरावर करण्यास घेतली 

"मीरा मस्त झाला ना अवनीचा वाढदिवस काय खुश होती ना ती? "मीरा चे काहीच उत्तर न आलेले पाहून समीर ने दिला परत हाक दिली 

"अरे मीरा कुठे गेलीस अगं मी तुच्याशी बोलतो "

"काय"? 

"अगं मी असे म्हणत होतो कि आज आपली अवनी केवढी खुश होती ना "

मीरा ने समीर कडे पाहत म्हटले "हो ना खूप खुश होती आज ती ५ वर्षाची झाली ना पण तिला बिचारी ला कुठे माहित आहे कि तिच्या जन्मवेळी काय झालं ते "

समीर ने चेहरा गंभीर करत म्हटले "मीरा त्या गोष्टी परत नको ना "

"का तू विसरलास अशील पण मी नाही विसरू शकत कारण तो काळ मी कसा काढला हा माझा मला माहित आहे "

"हे बघ मीरा जे झालं ते झालं आणि मी केलेली चूक नाही तो मोठा गुन्हाच होता पण त्यासाठी मी तेव्हाच माफी मागितली आणि आता तर सगळं सुरळीत चालू आहे मग कशाला त्या गोष्टी उगाळत बसतेस "

"तुला बोलणं खूप सोपं आहे माझ्या जागेवर तू असतास तर कळ असत कि आपल्या जन्मलेल्या बाळाला तिचा बाप मुलगी म्हूणन नाकारता आहे तू महिना भर तिला घेतले सुद्धा नव्हते पहिले ते हि असेच ज्या दिवसात मला आणि अवनीला तुच्या सहवासाची गरज होती तेव्हा तू आमच्यकडे पाठ फिरवलीस मग काय तुला प्रमोशन मिळाला आणि तुला कोणीतरी सांगितलं तुच्या मुलीचा पायगुण चांगला आहे मग कुठे तुच्या मनात तिच्या विषयी प्रेम जागृत झाला ते हि स्वार्थापायी एव्हडं मी कसं सहन गेलं ते माझं मला माहित आणि तू म्हणतोस झालं ते गेलं "

"मीरा मान्य आहे माझ्याकडून तसा वागण्याचा गुन्हा घडला पण आता तर मी किती प्रेम करतो अवनी वर ती माझी सर्वस्व आहे आणि ह्या पुढेही राहणार मान्य आहे मला जे मी गेलं ते विसरण्यासारखं नाहीच पण त्याच त्याच आठवणीने आपल्या नात्यात दुरावा आणखी निर्माण होत आहे "

"ती कटू आठवण कधीच जाणार नाही विचार कर समीर जर पुढे अवनीला सगळं सत्य कळलं तर "

"नाही नाही मीरा प्लिज माझ्या अवनीला माझ्या पासून दूर नको करुस तिचा बाबा एव्हडा वाईट वागला हे तिला कळले तर तिला काय वाटेल नाही "

"हे बघ मी अवनी च मन कधीच दुखावणार नाही कारण त्या बिचारीने आपल्या जन्मननंतर चे भोगले ते खूप आहे आणि तुच्याबद्दल मला तिला सांगावस पण नाही वाटत कारण तिला जर हे कळलं तर ती तुटून जाईल तू तिच्या नजरेस हिरो असशील पण माझ्या नजरेस तोच गुन्हेगार राहणार "


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy