सुरेश पवार

Drama Romance

2  

सुरेश पवार

Drama Romance

गोष्ट यशस्वी प्रेमाची

गोष्ट यशस्वी प्रेमाची

3 mins
243


सकाळची वेळ होती, मला शाळेत जायचं होतं. मला आतुरता होती, पूजाला भेटायची. आई मला डबा दे ना, लवकर... मला शाळेला जायचं आहे ना... पण मनात पूजाबद्दलचे प्रेम पूजाला रोज बघितल्या शिवाय माझा दिवस चांगला जायचा नाही, रोज असे वाटायचे की तासनतास पूजाला बघत राहायचं. जेमतेम मी नववीला होतो पण हे सगळं असं चाललं होतं. पण अजून पूजाला कधीही प्रपोज केला नव्हता आणि पूजापण कधी माझ्याशी या बाबतीत बोलली नाही. आम्ही फक्त एकमेकांकडे बघायचो आणि ती पण माझ्याकडे बघायची व मी पण तिच्याकडे बघायचो.


शिवाजी सरांचा तास नव्हता. त्या दिवशी जाधव सरांनी जादा तास घेतला. मुले कंटाळली होती, सरांनी गाण्याच्या भेंड्या खेळायला सांगितले, एका बाजूला मुली व एका बाजूला मुले, मग काय विचारता गाण्याच्या भेंड्या खूपच रंगल्या मी प्रेमाची गाणे फक्त पूजाकरिता गात होतो.


पूजा पण मला मनातल्या मनात प्रेम करायला लागली होती, पूजाने गाण्याच्या भेंड्यामध्ये मनमुराद मजा केली. काय गाणी बोलायची, मी तर मंत्रमुग्ध झालो. आम्ही अजूनही एकमेकाशी बोललो नाही. हे सगळं चाललं होतं, एकमेकांना नजरेला नजर भिडवून... खरंच ना काय दिवस होते, ते आजही मला आठवतंय... वर्गातला तास कधी संपला हे कळालेच नाही.


पण असं धाडस होत नव्हतं की पूजावर प्रेम करतो असे तिला सांगायची... आम्ही पुढे मॅट्रिकला गेलो, मॅट्रिकचा अभ्यास कठीण आल्यामुळे आम्हाला एकमेकांची मदत घ्यावी लागायची... कधी मी तिच्याकडून पुस्तक आणायचो तर कधी पूजा माझ्याकडून गणिताचे प्रश्न सोडवलेली वही न्यायची, तिला काही कळत नसेल तर मी तिला समजून सांगायचो, आमच्यातले आकर्षण वाढत जात होते.


आम्ही दोघे पण मॅट्रिकची परीक्षा पास झालो. पुढे तालुक्याच्या ठिकाणी आमच्या दोघांना एकाच कॉलेजला ऍडमिशन मिळालं. आमच्या प्रेमाला खूपच बहार आली. जशी गुलमोहोरला फुले येतात तशी आमच्या प्रेमाला बहार येऊ लागला. आमच्या भेटी गाठी अगदी मनमोकळेपणाने होऊ लागल्या. रोज सोबत जेवण, आता तर आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हतो. मी ठाणले आज पूजाला आपल्या प्रेमाचं प्रपोज करायचंच आणि केलं. ती थोडी लाजली आणि मान हलवून होकार दिला. किती दिवसाचं चालू असलेलं प्रेम आज पूर्णत्वास आलं.


आम्ही दोघे फिरायला जाण्याचा प्लॅन केला. आम्ही बागेत बसलो. छान हिरवागार गवताचा गालिचा पसरला होता. त्यावर छोटे छोटे दवबिंदू पडलेले होते. तसे थंडीचे दिवस होते. मी बसलो. माझ्या मांडीवर तिने डोकं टेकलं होतं. मी पूजाच्या केसातून हात फिरवत होतो आणि प्रेमाची स्वप्न रंगवत होतो. कधी वेळ गेला माहीतच नाही. रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही खूप घाबरलो होतो.


मग काय धावत पळत धापा टाकीत टाकीत कसाबसा घरी पोहोचलो. बाप खूप संतापलेला होता, काय रे कुठे होतास एवढा वेळ. मी काही सांगणार तोच आईने माझी बाजू घेऊन प्रकरण थांबवलं नाहीतर माझी काशीच होणार होती.


तसेच पूजाचा मोठा भाऊ पूजाला ओरडला, काय गं कुठे होतीस एवढा वेळ... ही वेळ आहे का तुझी घरी यायची... तेवढ्यात आजीने पूजाची बाजू मांडून प्रसंगावधान सांभाळले. खरंच खूप भीती वाटत होती आम्हाला.


हा सर्व झालेला प्रकार काॅलेजमध्ये आल्यावर आम्ही एकमेकांबरोबर शेअर केला. आम्ही तर एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो आणि असं चोरून किती दिवस आम्ही भेटत राहाणार. आम्ही ठरवलं आपल्या आपल्या आई-वडिलांना घरी सांगावे व आपल्या प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावे. म्हणून मग काय तो दिवस उजाडला. मन घट्ट करून आम्ही आमच्या लग्नाचा प्रस्ताव घरी मांडला. सुरुवातीला दोन्ही पक्षाने साफ नाकारलं, असं होणार नाही... कारण दोघांचे कुटुंब वेगवेगळ्या जातीचे होते आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपराने ग्रासले होते. आम्ही दोघांनी आपापल्या घरी समजूत काढण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आणि सांगितले की आम्ही जर पळून जाऊन लग्न केलं असतं तर समाजामध्ये तुमची इज्जत गेली असती. आम्ही ते ही करू शकत होतो पण आम्ही तसं काही केलं नाही. तुमची मान खाली होऊ नाही म्हणून आम्ही तसं पाऊल उचलले नाही.


दोघांच्या कुटुंबाने लग्नाला होकार दिला आणि दोघांचे प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. आता दोघे अगदी चांगलं संसार करायला लागले. अलीकडेच राजुला मुंबईला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि पूजाला पण चांगला जॉब मिळाला. आता ते दोघेही आपला संसार सुखाने करू लागले. असे करता करता दोन वर्ष उलटली. दोन वर्षाने त्यांना एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झाली. दोन्हीकडचे कुटुंब आता एकमेकांच्या घरी येऊ लागले आणि सगळीकडे कन्यारत्न आल्यामुळे आनंदी आनंद झालं. याप्रमाणे यामुळे दोन वेगळ्या समाजाची माणसे या प्रेमामुळे एकत्र आले. प्रेमात किती ताकद आहे हे सिद्ध झाले, याप्रमाणे गोष्ट यशस्वी प्रेमाची कहाणी......!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama