कोरोना आणि लॉकडाऊन
कोरोना आणि लॉकडाऊन
प्रथमतः कोरोना नावाच्या विषाणूने चीनमधून भारतात शिरकाव केला. हा संसर्गजन्य विषाणू आहे. भारतीय लोक परदेशात कामानिमित्ताने गेले होते. हा आजार आपल्याकडे पाहुणा म्हणून आला आहे. पण या पाहुण्या आजाराला माहीत नाही की भारत हा निर्णयावर ठाम आहे. जसे भारतात या आजाराचे रुग्ण आढळू लागले आणि या आजारावर मात कारायचे असेल तर लॉकडाऊन करणे फार महत्त्वाचे आहे आणि भारतात लॉकडाऊन आदेश प्रशासनाने अमलात आणला. या मुळे नागरिक बाहेर पडणार नाही आणि जर बाहेर पडले नाही तर हा संसर्गजन्य विषाणूचा रोग पसरणार नाही. प्रत्येक भारतीय नियम पाळत आहे, या आजाराला हद्दपार करण्यासाठी आरोग्यसेवा पोलीस प्रशाशन शासकीय प्रशासन सफाई करणारे कर्मचारी आणि कोरोना कोविड -19 मध्ये काम करणारे कर्मचारी रात्रंदिवस जीवाचे रान करून आपला जीव धोक्यात घालून देशसेवा व देश वाचवण्यासाठी कर्तव्य करीत आहेत. त्यापैकी मी पण एक आहे. जेव्हा मी लोकांच्या घरी जातो सर्व्हे करण्यासाठी, जेव्हा आम्ही लोकांना प्रश्न करतो आपण बाहेर देशातून प्रवास केला आहे का, तुम्हाला सर्दी ताप खोकला कफ आहे का... पण लोक भेदरलेली असूनही चांगल्याप्रकारे माहित आम्हाला देत आहेत आणि हे सर्व कोरोनाला हरविण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकाने प्रशासनाला मदत करा, असे लक्षण आढळले की त्वरित आरोग्य केंद्राला
भेट द्या, शासनाला सहकार्य करा, घरी राहा, सेफ व्हा, गर्दी टाळा, वारंवार साबणाने हात धुवा, मास्क अथवा रुमाल वापरा, आम्ही कर्तव्यावर आहोत, तुम्ही फक्त घरी थांबा, या पाहुण्या कोरोनाला आपण हद्दपार करूया...
लॉकडाऊन बरंच काही माणसाला शिकवून गेला आहे. या मध्ये माणसाला कसं जगावे आणि माणसाची काय किंमत आहे. श्रीमंत-गरीब आज सर्व एकाच कॅटेगरीमध्ये मोडत आहे. एकमेकांकडे आशेने पाहू लागला आहे. श्रीमंत माणूस रोज हॉटेलचे जेवण खाई पण आज त्याच्या नशिबी स्वतः जेवण बनवून खाण्याची वेळ आली आहे. बघा नियतीचा खेळ कसा आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
हाल झाले माझ्या गरीब कामगार, हातावर पोट भरणारे यांचे. कारण दिवसभर राबायचे आणि संध्याकाळी मिळालेल्या मजुरीमधून आपला उदरनिर्वाह करायचा. पण सर्वच कामे बंद झाले तर बिचाऱ्याचे हातावरचे पोट काय करणार... फार मेटाकुटीस आले हो... काहींना अन्न मिळते तर काहींना काहीच नाही. यामधुन असे वाटते की, कोरोना बाजूला राहील व भूकबळीचा शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जर हाताला काम नाही तर गरीब जगणार कसा...
पण कोरोना या महामारीने संपूर्ण मानव जातीला जगणं शिकवलं. एकमेकांबरोबर आदर करण्यास शिकवून गेला आहे कोरोना. हा पाहुणा, संसर्गजन्य विषाणूचा आम्ही भारतीय नायनाट करणारच आणि आम्ही नागरिक या नात्याने नियम पाळणार...