सुरेश पवार

Romance

3.4  

सुरेश पवार

Romance

*गोष्ट यशस्वी प्रेमाची*

*गोष्ट यशस्वी प्रेमाची*

3 mins
12.5K


     सकाळची वेळ होती मला शाळेत जायचं होतं मला आतुरता होती पूजा ला भेटायची आई मला डबा दे ना लावकर मला शाळेला जायच आहे ना, पण मनात पूजा बद्दलचे प्रेम पूजाला रोज बघितल्या शिवाय माझं दिवस चांगला जायचा नाही, रोज असे वाटायचे की तासंनतास पूजा ला बघत रहायचं. जेमतेम मी नवविला होतो पण हे सगळं अस चाललं होतं. पण अजून पूजा ला कधीही प्रोपोज केला नव्हता आणि पूजा ने पण कधी माझ्याशी या बाबतीत बोलली नाही आम्ही फक्त एक मेकांकडे बगायचो आणि ती पण माझ्याकडे बगायची व मी पण तिच्याकडे बघायचो.


     शिवाजी सरांचा तास नव्हता त्या दिवशी जाधव सरांनी जादा तास घेतला मुले कंटाळली होती, सरांनी गाण्याच्या भेंड्या खेळायला सांगितले, एका बाजूला मुली व एका बाजूला मुले, मग काय विचारता गाण्याच्या भेंड्या खूपच रंगल्या मी प्रेमाची गाणे फक्त पूजा करिता गात होतो.


      पूजा पण मला मनातल्या मनात प्रेम करायला लागली होती, पूजा ने गाण्याच्या भेंड्या मध्ये मन मुराद मजा केली काय गाणी बोलायची मी तर मंत्रमुग्ध झालो आम्ही अजूनही एक मेकाशी बोललो नाही हे सगळं चाललं होत एक मेकांना नजरा ला नजर भिडवून खरच ना काय दिवस होते ते आजही मला आठवतंय वर्गातला तास कधी संपलं हे कळालेच नाही.


     पण अस धाडस होत नव्हती की पूजा वर प्रेम करतो असे तिला सांगायची आम्ही पुढे मॅट्रिक ला गेलो मॅट्रिक चा अभ्यास कठीण आल्यामुळे आम्हाला एक मेकांची मदत घ्यावी लागायची कधी मी तिच्या कडून पुस्तक आणायचो तर कधी पूजा माझ्या कडून गणिताचे प्रश्न सोडवलेली वही न्यायची, तिला काही कळत नसेल तर मी तिला समजून सांगायचो, आमच्यातले आकर्षण वाढत जात होते.


    आम्ही दोघे पण मॅट्रिक ची परीक्षा पास झालो पुढे तालुक्याच्या ठिकाणी आमचा दोघांचा एकाच कॉलेजला ऍडमिशन मिळालं आमच्या प्रेमाला खूपच बहार आली जसा गुलमोहोर ला फुल येतात तशी आमच्या प्रेमाला बहार येऊ लागला आमच्या भेटी गाठी अगदी मनमोकळे पणाने होऊ लागल्या रोज सोबत जेवण आता तर आम्ही एकमेकाशीवाय राहूच शकत नव्हतो मी ठाणले आज पूजा ला आपल्या प्रेमाचा प्रोपोज करायचाच आणि केलं ती थोडी लाजली आणि मान हलवून होकार दिला किती दिवसाच चालू असलेलं प्रेम आज पूर्णत्वास आलं


    आम्ही दोघे फिरायला जाण्याचा प्लॅन केलं आम्ही बागेत बसलो छान हिरवेगार गवताच्या गालीच्या परसल्या होत्या त्या वर छोटे छोटे दवबिंदू पडलेलं होते तसे थंडीचे दिवस होते मी बसलो माझ्या मांडीवर तिने डोकं टेकल होतं मी पूजाच्या केसातून हात फिरवत होतो आणि प्रेमाची स्वप्न रंगवत होतो कधी वेळ गेला माहीतच नाही रात्री चे नऊ वाजले होते आम्ही खूप घाबरलो होतो.


       मग काय धावत पळत धापा टाकीत टाकीत कसाबसा घरी पोहोचलो बाप खूप संतापलेला होता काय रे कुठे होतास एवढा वेळ मी काई सांगणार तोच आईने माझी बाजू घेऊन प्रकरण थांबवलं नाहीतर माझी कासी च होणार होती.


     तसेच पूजा च्या मोठ्या भावाने पूजा ला पण ओरडले काय ग कुठे होतीस एवढा वेळ ही वेळ आहे का तुझी घरी यायची तेवढ्यात आजी ने पूजा ची बाजू मांडून प्रसंगावधान सांभाळले खरच खूप भीती वाटत होती आम्हाला.


      हा सर्व झालेला प्रकार उद्या कॉलेज मध्ये आल्या वर आम्ही एकमेका बरोबर शेअर केल आम्ही तर एकमेकाशिवाय राहू शकत नव्हतो आणि अस चोरून किती दिवस आम्ही भेटत रहाणार आम्ही ठरवलं आपल्या आपल्या आई वडिलांना घरी सांगावे व आपल्या प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावे म्हणून मग काय तो दिवस उजाडला मन घट्ट करून आम्ही आमच्या लग्नाचा प्रस्ताव घरी मांडला सुरुवातीला दोन्ही पक्षाने साफ नाकारलं अस होणार नाही कारण दोघांचे कुटुंब वेगवेळ्या जातीचे होते आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपरा ने ग्रासले होते. आम्ही दोघांनी आपापल्या घरी समजूत काढण्याच्या पुरेपूर प्रयत्न केले आणि सांगितले की आम्ही जर पळून जाऊन लग्न केलं असत तर समाजामध्ये तुमची इज्जत गेली असती आम्ही ते ही करू शकत होतो पण आम्ही तसं काही केलं तुमची मान खाली होऊ नाये म्हणून आम्ही तसं पाऊल उचलले नाही.


     दोघांच्या कुटुंबाने लग्नाला होकार दिला आणि दोघांचे प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले आता दोघे अगदी चांगलं संसार करायला लागले अलीकडेच राजुला मुंबई ला चांगल्या कंपनी मध्ये नोकरी मिळाली आणि पूजा ला पण चांगला जॉब मिळालं आता ते दोघेही आपला संसार सुखाने करू लागले असे करता करता दोन वर्ष उलटली दोन वर्षाने त्यांना एक गोंडस कन्या रत्न प्राप्त झाली दोन्ही कडचे कुटुंब आता एक मेकांच्या घरी येऊ लागले आणि सगळीकडे कन्यारत्ना आल्या मुळे आनंदी आनंद झालं या प्रमाणे या मुळे दोन वेगळ्या समाजाची माणसे या प्रेमा मुळे एकत्र आले प्रेमात किती ताकत आहे हे सिद्ध झाले,या प्रमाणे गोष्ट यशस्वी प्रेमाची कहाणी......!!!!

💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance