The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

सुरेश पवार

Others

3  

सुरेश पवार

Others

*व्यथा झाडाची*

*व्यथा झाडाची*

1 min
236


  लहान असतांना खूप मज्जा होती,

रोज मला पाणी घालून, लाडी गोडी

लावून वाढवत होते, लहान असताना खूप मज्जा होती... //1//


   दिवसागणिक मी वाढत होतो

अंगाला पाने बहरत होती,

दिवसेंदिवस वाढण्यात खूप मज्जाच वेगळी होती.....//2//


   पाने आले कळ्या आल्या फुले आहे फळ आले,

माझा पिसारा अगदी घेरदार झाला,

लहान असतांना खूप मज्जा होती.....//3//


   दिवसेंनदिवस माझा रुबाब दिसत होता,

मालक मला पोटच्या लेकर सारखा वाढवत होता,

लहान असतांना खूप मज्जा होती.....//4//


   माझ्या अंगाखांद्यावर मुले खेळत होते,

मनसोक्त फळे फ़ुले तोडून खात होती,

काय ते दिवस लहान असतांना खूप मज्जा होती......//5//


   सर्वांना प्राणवायू मी मनसोक्त पणे पुरवीत होतो

आणि हवेतील प्रदूषण मी घेत होतो

लहान असतांना खूप मज्जा होती.......//6//


   ज्याने वाढवले त्यानेच गळा कापला,

कठोर मनाने मला संपवला 

काय चूक होती माझी, लहान असतांना खूप मज्जा होती......//7//Rate this content
Log in