STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Inspirational

3  

Chaitali Warghat

Abstract Inspirational

गोंडस बाहुली

गोंडस बाहुली

3 mins
8

सुंदर अशी माझी बाहुली

तिला बघून मिळते सुख

पाहून तिला विसरते मी

माझी व्यथा वेदना दुःख

बाहुली म्हटले तर प्रथम दर्शनी आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे आपली सुंदर, सुरेख, देखणी 'गोंडस मुलगी'. आपली लेक, आपली बहीण आणि त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते एक प्लास्टिकची वस्तू ती म्हणजे 'बाहुली'. प्लास्टिकची बाहुली ही लहान मुलींना आवडणारी सर्वात जवळची वाटणारी खेळणी आहे. खूप मोठा जीव ती त्या बाहुलीला लावत असते. मात्र आपली मुलगी, आपली बहीण ही आपल्यासाठी एक जिवंत चालती, फिरती, बोलती अशी जिवंत बाहुली असते. आपल्या मुलींसाठी प्लास्टिकची, कापडाची बनवलेली ती वस्तू, ती बाहुली बालपणात खूप जवळची असते. त्या बाहुली बरोबर ही चालती फिरती गोंडस बाहुली मोठी होत असते. त्या खेळण्यातल्या बाहुली वस्तूला ती काही दूर करत नाही. झोपतांना ही ती बाहुली घेऊनच झोपते किंवा एका ठिकाणी झोपू घालते. तिचा बालपणीच्या भातकुलीचा बाहुली बरोबरचा हा खेळ मस्त रंगत असतो. खेळभांडे घेऊन बालपणतच राजाराणीचा खेळ खेळत असते. खेळभांड्यांबरोबर ती छान असा स्वयंपाक बालपणात ती खेळतांना बनवतं असते. प्रत्येक मुलीचा हा बालपणीचा खेळ. बाहुलीशी खेळणे हा प्रत्येक मुलीचा बालपणातील आवडता खेळ असतो. ती स्वतः मोठी होतं असतांना तिच्याशी घरातील सगळ्यांनी बाहुली सारखे खेळाव असे तिला वाटत असते. ती आपल्या भावाला एक हुकूम सतत सोडत असते. मग तो भाऊ लहान असो की मोठा. भावाने मात्र तिचे लाड पूर्ण कराव. हीच अपेक्षा इच्छा तिची असते. हीच लहान बाहुली आपल्या बाबांना त्रासून सोडते. थोडा जरी उशीर घरी यायला झाला तर ती आईच्या अगोदरच बाबाला ओरडत असते. घरी जाण्यासाठी उशीर झाला तर आपली मुलगी ओरडणार, ती रडेल म्हणून बाबाही घराबाहेर जास्त वेळ राहत नाहीं. काम लवकर उरकून घरी येतात. मुलीला जे पाहिजे ते खेळणी बाबा घेऊन देतात. तिला आवडणाऱ्या खाण्याच्या खाऊ, पदार्थ घरी येतांना बाबा घेऊन येतात. तिच्या भावालाही माहित असते कीं आपल्या लाडक्या बहिणीला काय आवडते म्हणून. त्यामुळे तो तिचे प्रत्येक लाड पूर्ण करतो. बाबासाठी त्यांची मुलगी एक परी असते, राजकुमारी असते, बाहुली असते अशी गोंडस नावे बाबा तिला प्रेमाने हाक देत प्रेमाने बोलवत असतात. भावासाठी ती एक जिवलग मैत्रीण असते. ही बाहुली लाडा कौतुकाने मोठी होत असते. घरातील या चालत्या फिरत्या बोलत्या बाहुलीला रागही खूप येत असतो. तिला राग येऊ नये म्हणून आई बाबा, तिचा भाऊ काळजी घेत असतात. मात्र ही बाहुली घरातील सर्वांना त्रासून सोडते. आईच्या डोळ्यासमोर ही लहान बाहुली जसजशी मोठी होतं जाते, तेव्हा ती आईची जणू सासूबाई बनते. प्रत्येक जेवणाच्या पदार्थात नाव ठेवणे, हेच तिच काम असते. केलेल्या प्रत्येक गोष्टीला ती नाव ठेवायला लागते. त्यामुळे जेवणातले बरेच पदार्थ हे मुलीच्या आवडीचे आईला करावी लागतात. जर बनवले नाही तर ही बाहुली खूप चिडते. आईलाही विचार येतो की पुढे कसं होणार. आईला ही तिची काळजी वाटत असते. भरपूर लाडात कौतिकात मोठी झालेली ही बाहुली एक दिवस आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी जाणार. याची सतत काळजी आईला वाटतं असते. पण एक मात्र खरे कीं प्लास्टिकच्या बाहुली बरोबर खेळता खेळता कधी मोठी झाली आपली मुलगी हे आई-वडिलांनाही कळतच नाही. बालपणातून पुढे सरकत सरकत प्लास्टिकची बाहुली, ती वस्तू जरा मागे राहते. आता मात्र ती एक एक वर्ग चढत शिक्षण घेत उंच भरारी घेते. एक रुबाबदार परिस्थितीला बदलण्यासाठी स्वतःला सिद्ध करताना लढत असतांना दिसते. उंच भरारी घेण्याचे स्वप्न ती बघत असते. रंगवत असते. बऱ्याच अशा गोंडस बाहुल्यांनी तिचे स्वप्न प्रत्यक्षात आणलेले ही आहे. एक स्मार्ट गृहिणी, एक नोकरदार स्त्री, आदर्श राजकारणी, स्त्री बालरोग तज्ञ, शिक्षिका, इंजिनीयर, एअर होस्टेस, कलेक्टर, खासदार, आमदार, आदर्श समाजसेविका, विविध ठिकाणी पदभार ती स्वीकारत आहे. 'स्त्री-पुरुष समानता' ही मूल्ये आत्मसात करत आहे. स्वतःला ती अशातच कमी लेखत नाहीं. ती गवसनी घ्यायला सतत 'गोंडस बाहुली' तत्पर आहे.

बाहुली घेऊन खेळणारी ती

गगन भरारी घेतांना दिसते

क्रांती ज्योती सावित्रीची लेक

विविध पदभार सांभाळते..!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi story from Abstract