घडयाळ
घडयाळ
काळाकुट्ट खोलीचे दार उघडण्यात आले आणि काही तरी आत फेकण्यात आले ते सरळ ऐकून एकाला धडकले त्या खोलीत जरासा उजेड येत होता त्या उजेडामुळे दडक बसलेल्याने आवाज चढवला
"कोण दडकले मला "
"दडक देणाऱ्याने आवाज वाढवला मी नाही मुद्दाम मला फेकण्यात आले "
"अरे तू तर आमचाच नारे
"हो तुम्ही आमचे पूर्वज ना "?
"हो रे बाबा म्हणून तर या बंद खोलीत बंदिस्त झालो पण तू तर "
"काही नाही आजोबा आम्ही हि काही दिवसात इतिहासजमा होणार "
"म्हणजे रे "?
"आता ज्याने मला आत टाकले ना त्याला माझी गरज नाही "
"म्हणजे रे "?
"काय सांगू आजोबा नवीन डिजिटल घड्याळ घरात आले आणि मी मध्ये मध्ये बंद पडतो म्हणून इथे आलो "
"म्हणजे मी अनुभवलं तेच तू हि जे ""
"बाबा ज्यांनी तुला इथे टाकलं त्यानीच मला हि टाकलं ते हि काही वर्षांपूर्वी "
"म्हणजे त्या राघव ने "
"हो त्यानेच त्याच्या आजोबाच्या पहिल्या कमाईची भेट म्हणजे मी मोठ्या उत्साहात मला हॉल मध्ये मधोमध लावण्यात आले तेव्हा माझे रूप हि सुरेख होते लाल रंग त्यावर सोनेरी किनार आणि नक्षी काय रुबाब होता माझा तर एक तासाने माझ्या टोलचा आवाज असा काही घरात घुमे कि बस सगळयांना न पाहत किती वेळ झाली हे कळे सगळे येणारे जाणारे माझ्याकडे एक नजर टाकतच असेच मी रुबाबात किती वर्ष त्या भीतीवर राहून ह्या घरात होणाऱ्या सुख दुःखाशी सामील झालो अशीच वर्ष भर भर निघून गेली आणि ह्याचे आजोबा हि कालवश झाले मग काय आमची निगा कोण राखणार आणि पुरातन झाल्याने अडगळीत पडलो "
"हो ना जमान्यानुसार बदल तर होणार "
"हो रे बाबा खरं सांगितलंस आमचा जमाना गेला आता आमची नवीन पीडी पुढे येत आहे "
"हो ना आणि आजोबा आपली नवीन पीडी खूप पुढे आहे हा अग्रेसर म्हणा वेळ दर्शवते त्याच बरोबर बाहेरील तापमान पण "
"हो का मग बरीच पुढे गेली आपली पिढी असो जाऊ दे हो होऊन होऊन आपलंच घड्याळ परिवाराचं नाव पुढे येईल याचा आनंद आहे"
