गावची यात्रा
गावची यात्रा
प्रत्येक वर्षी गावाकडे देवाची यात्रा भरते. वर्षातून दोन वेळा ग्रामस्थ आणि आजुबाजूचा गावाहून आलेले नातेवाईक मंडळी या सोहळ्याला हजर असतात.इतर गावात जत्रा असते तेव्हा प्राण्यांचे मटन खाणे चालते पण आमचा गावचा या सोहळ्यात मात्र शाकाहारी जेवण सर्व गावकरी एकत्र येऊन करतात.माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवतोय.
तर झालं अस कि प्रतीक माझ्या मामाचा मुलगा. मी दरवर्षी मामाच्या गावी जात असत तेव्हा आम्ही खुप मज्जा करत असू.तो पहिल्यांदा इकडे यात्रेसाठी आला होता. आम्ही दोघे यात्रेला गेलो होतो. जाताना आईने त्याला काही पैसे दिले आणि माझ्याकडे बघुन म्हणाली, "जास्त वेळ थांबू नका, पालखीला डोक टेकवा आणि परत या" अशी आज्ञा केली होती.गर्दी पाहून आम्ही दोघेही थक्क झालो.
त्या तुफान गर्दीतून कशीबशी थोडी जागा करुन आम्ही पालखीपर्यंत पोहोचलो. अचानक माझ्या शेजारी असलेला प्रतीक दिसेनासा झाला. मी त्याला हाक मारली पण एवढ्या लोकांच्या गराड्यात तो कुठे गेला ते काही मला कळेना.
शेवटी ही गोष्ट जर आईला कळली तर माझ काही खर नाही या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आला. वेळ पुढे जात होती तशी माझी भीती वाढत होती. आई काय म्हणेल, पप्पा खुप रागावतील अशा अनेक कल्पना मला हैराण करत होत्या. मी बावरलेल्या अवस्थेत शोधू लागलो. पण काही वेळाने भेलपुरीचा गाडीवर दिसला आणि माझा जीव भांड्यात पडला.
