उन्हाळचा सुट्टीतील ती रात्र
उन्हाळचा सुट्टीतील ती रात्र
त्या तळपत्या उन्हात झाडाखाली सावलीला उभी असलेली मुल पाहिली कि उन्हाळचा दिवसांची आठवण होते.
जेव्हा मी शाळेत जायचो त्या दिवसांची हि गोष्ट आहे. आपल्या पैकी अनेकांना आठवत असेल, लहानपणी जेव्हा परीक्षा संपून शाळेला सुट्टी लागायची तेव्हा सर्वजन काही दिवस मामाच्या गावी जात असत. तसाच मी ही गेलो होतो.
मामाच नुकतच नविन बंगला बांधायच काम चालु झालं होत. मे महिन्याची सुट्टी होती त्यामुळं मावशीची मुलही आली होती. अस तर आम्ही दरवर्षी मामाचा गावी जात असु पण ही सुट्टी थोडी वेगळी ठरणार होती.
ते गाव होत अस म्हणण्यापेक्षा, ती वाडी होती जेमतेम पाचशे ते सातशे लोकांची वाडी आणि बाजूला रानमाळ. वस्तीत असलेल घर सोडून संपूर्ण तेरा लोकांच कुटुंब रानाशेजारी असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये रहायला गेल. आमची त्यात भर पडली.
तर झाल अस कि,जून चा सुरुवातीला त्या रात्री आम्ही सर्वजन जेवण करून झोपलो. रात्री दहा नंतर जोरदार वारा आणि विजेचा कडकडाटा सह धो-धो पावसाला सुरुवात झाली. शेजरी असलेल पिपंळाच भलमोठ झाड आपल्या फांद्या जोरजोरात हलवून पावसाचा इशारा देत होत. इतक्यात काहीतरी पेटल्याचा चर्र-चर्र असा आवाज झाला. कुटुंबातील वडिलधारी मानस जागी झाली. मामा कसला आवाज झाला हे बघायला अचानक जागा झाला. बघतो तर काय, कसलीतरी वायर पेट घेत होती. ती आग पावसाचा सरिंनी आणखीनच वाढत होती. हि आग शोर्टसर्किट मुळे लागली असावी हे त्याने लगेच ओळखले . काही केल्या आग थांबेना. थोड्या गोंधळलेल्या स्थितीत पण हार न मानता.काहीतरी शक्कल लढवून ती आग विझवन्यात यश आले.
हा सगळा प्रकार चालू असताना सगळे जागे होते मी सोडून. विजेचा कडकडाटासह पडणार्या पावसाचा आवाजात मला हा दंगा बहुतेक ऐकू आला नसावा.नंतर ही गोष्ट समजली तेव्हा आश्चर्य वाटल पण त्याक्षणी मात्र याची चाहूल लागली नव्हती.
