प्रवास वर्णन
प्रवास वर्णन
आज रुमवरुन कोल्हापूरला जायला निघालो. त्यासाठी रुम पासून थोड्या अंतरावर असलेल्या जयसिंगपूर बस स्टेशन वर आलो. भर दुपारी सुर्याचा उष्ण रसरसत्या उन्हाचा भडिमाराने सर्व स्टेशन तापलेल होत. सर्वजन या तिव्र तापमानाला सोसत आपली बस कधी येणार याची वाट बघत कोणी मोबाईल बघण्यात तर कोणी गप्पा मारण्यात मग्न होत.
कोल्हापूर एसटी दहा - विस मिनिट उशीरा येणार अस समजल्यावर मी शेजारी असलेल्या एका पायरीवर बसलो. जसा मी वाट पाहत होतो तसे इतर गावी जाणारे प्रवासी ही थांबले होते. काहीजण एसटी जीथे थांबते त्याठिकाणीच उभे राहीले होते. तिथे मला अशी लोक दिसली जी दोन वेळचा जेवनाची सोय व्हावी म्हणून शेंगदाणे, उसाचा रस आणि इतरही काही खाद्यपदार्थ घेऊन मानसाचा अवतीभोवती फिरत होती. या तीव्र तापमानाचा फटका सर्वात जास्त या कामगार वर्गालाच बसत आहे हे दिसत होत.
तर थोड्या वेळाने कोल्हापूर एसटी आली. त्या बस मधे बसायला जागाही नव्हती तरीही कसाबसा त्यात चढलो. नंतर दुसरी बस आली जागा मिळेल म्हणून त्या मध्ये गेलो तर तिकडे ही हीच अवस्था.
शेवटी कोल्हापूर स्टेशन वर उतरलो. स्टेशन वरची गर्दी पाहून मला माझ्या गावचा जत्रेची आठवण झाली. तितही लोक अशीच गर्दी करतात पण ती गर्दी एक नाहीतर दोन दिवस. पण इथ मात्र रात्र दिवस बसची आणि लोकांची गर्दी चालूच असते.
