akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

एलियन

एलियन

2 mins
354


आपल्याकडली माणसे जशी मंगळ ग्रहावर जाऊन संशोधन करतात तसेच एलियन संशोधकानी आपल्या माणसाच्या ग्रहावर येणाचे ठरवले आणि त्याचे यान ३० जणांना घेऊन उतरले आणि वेगवेगळ्या शहरात त्यांनी प्रस्थान केलं जिकडे तिकडे ते लपून छपून होते त्यांना कोणाच्याही नजरेस पडायचे नव्हते 

प्रत्येक शहरात ते लपून छापून सगळे व्यवहार पाहत होते आणि एकमेकांशी ते वॉकी टॉकीं ज्या मदतीने बोलत होते निरनिरळ्या विषयावर त्याची चर्चा वह्यांची 

असेच त्याचे महिना अखेरीस परत आपल्या ग्रहावर जाण्याचे ठरले एका शहराच्या पठारावर रात्री यान येणार होते तसे सगळे दिलेल्या वेळेनुसार तिथे पोहचले पण ३० जणांपैकी २५ जण हजर होते बाकीच्याच पत्ता नव्हता त्याच्याशी संपर्क हि होत नव्हता उरलेल्या साठी तुकडीच्या पुढाऱ्याने १ तास वाट पाहू या असे जाहीर गेले 

१ तास लुटला पण उरलेले काही आले नाही मग मात्र पुढाऱ्यावर मोठा प्रश्न पडला बाकीच्याना सोडून कसे जावे सगळ्याने त्यांना शोधण्याचे ठरवले आणि पुढाऱ्याने आपल्या ग्रहावरचा ड्रोन कॅमेरा चालू केला आणि क्षणात त्या पांच हि जणांना पकडले पण ते काही त्याच्या बरोबर यायला तयार नव्हते कारण विचारताच त्यातला एकटयाने सांगितले कि अरे इथे राहून काम न करता आमचा फायदा होऊ शकतो इथे निवडणुका चालू आहे प्रचार साठी प्रत्येक पक्ष सेलिब्रिटी ना पैसे मोजत आहे जर आपण त्याचा प्रचार केला तर आणि काल मी पहिले एकाने फक्त काही मिनिटं बोलले आणि लाख रुपये खिशात आणि आपण तर सेलेब्रिटी आहोत ह्या ग्रहावर आणि इथे तर खोट्याला खरं करणे म्हणजे एवढे सोपे आहे कि फक्त पैसे द्या मग झाल आपल्या ग्रहावर अश्या सुख सोयी नाही म्हणून आम्ही येणार नाही "

त्याचे बोलणे ऐकून इतर सगळेच रागावले पण पुढाऱ्याने समजावत बोलण्यास सुरवात केली " झाले तुमचे बोलुन आम्ही इथे संशोधना साठी आलो होतो पण तुम्ही तर ह्या फसव्या आयुष्याला भुलला अरे असच सुख सोयी असत्या तर ह्या ग्रहावरचे लोक ह्या निवडणुकीच्या नावाने भष्ट्राचाराच्या नावाने खडे का फोडतात काय ना ज्याला जळत त्यांनाच कळत आणि तुम्ही त्याच्या साठी सेलिब्रिटी फक्त त्याचे काम होई पर्यत मग मात्र त्याच्या साठी तुम्हे परग्रहावरचे असाल विचार करा यायचं असेल तर पांच मिनिटात यानात बसा नाहीतरी तुमचे तुम्ही आम्ही आमच्या घरी जातो."


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy