Sonali Kose

Romance Others

3  

Sonali Kose

Romance Others

एकतर्फी प्रेम

एकतर्फी प्रेम

3 mins
255


       सहसा कुणालाही एका वेळेस प्रेम होत नाही. समोरील व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल तसल्या काहीच भावना नसतील आणि तुम्ही त्याच व्यक्तीला लाईक करत असाल तर तुमच्या एकतर्फी प्रेमाची पायरी तिथून सुरू होते. आपण जेव्हा प्रेमाच्या बंधात असतो तेव्हा दोन्हीकडून काळजी , समस्यांचे हल , आपुलकी , प्रेमभाव , एकमेकांना समजून घेणे , प्रत्येक वळणावर आधार म्हणून सोबत असणे , सुख दुःख वाटून घेण्याचे साहस असणे गरजेचे असते. जेव्हा आपण आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा करीत असतो परंतु समोरील व्यक्ती तुमच्या भावनांचा विचार सुद्धा न करता तुमच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करीत असेल आणि तुम्ही कितीही प्रेमाने गोड बोलत असलात आणि ती व्यक्ती तुमच्या बोलण्याकडे लक्ष न देता सारखं सारखं Hmm...Oky...H... अशी उत्तरं देत असेल तर तुमचं प्रेम हा फक्त आणि फक्त एकतर्फी आहे असे समजून जावे. कारण बोलताना कधी कधी त्या व्यक्तीला गचबचल्यासारखे / जणू तुम्ही त्याच्यावर भार आहात असली जाणीव तो आपल्या बोलण्यातून करून देत असतो. आपलं त्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम असल्याने आपल्याला समोरील व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहेत हे दिसून येत नाही. कारण तुमचं जीव त्या व्यक्तीच्या जीवात अडकलेला असतो. तुम्ही तुमच्या नात्याला घट्ट बांधून ठेवण्यासाठी कितीही प्रयत्न कराल तरी ते सफल होईलच असे नाही. कारण नात्यात दोघेही सहमत असणे आवश्यक आहे. ह्या नात्यात कुणालाही जबरदस्ती करता येत नाही आणि जबरदस्तीचं नातं टिकत सुध्दा नाही.

 

                 प्रेम जाळात एकदा अडकले की तुमच्या डोळ्यांवर त्या प्रेमाची धुंदी चढलेली असते. आणि मग जिथं पर्यंत तुमच्या काळजाला घाव बसत नाही तिथ पर्यंत तुम्हाला त्या प्रेमाची किंमत सुध्दा कळत नाही.ईथे स्नेहाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा झरा वाहत असतो. परंतु ते फक्त तुमच्या पर्यंतच सिमित असणे आवश्यक नाही. नात्यात गोडवा आणण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करीत असतो. आपला जोडीदार कितीही कामात व्यस्त असला तरी तो आपल्यासाठी अशक्य गोष्टही शक्य करून आपल्यास वेळ देत असतो. त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात सतत विचार डोक्यात घुमत असतात. काय करत असेल ? जेवण वगैरे केलं असेल ना ? स्वतः ची काळजी घेते की नाही ? इत्यादी प्रश्न आपल्या डोक्यामध्ये घुमत असतात. त्यांचाही एक साठा तयार होऊन आपल्या डोक्यावर भार असल्यासारखं वाटते. तुमच्याबद्दल असलेली जाणीव त्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे त्याच्या हावभावावरून , बोलण्यावरून आणि स्वभावातून अगदी स्पष्ट दिसून येते. नेहमी नेहमी आपणच का प्रेम व्यक्त करावं ? का आपणच त्याची इतकी काळजी घ्यावी ? प्रेमाच्या नात्यात दोघेही असतात , परंतु प्रेम मात्र एकाच तर्फे का दिसून येते ? समोरील व्यक्तीला आपली कवडीची सुध्दा चिंता असत नाही.

 

 

                   तुम्ही कितीही मोठ्या संकटात असलात आणि ते तुम्ही तुमच्या जोडीदाराला शेअर केलात तरी तो त्याकडे दुर्लक्ष करेल आणि तुम्ही कुठे आहात ? कसे आहात ? ह्याची माहिती करून घेण्याची तो खात्री सुध्दा करून घेत नसेल तर तिथे तुमची किंमत शून्यच आहे असे समजून जावे. कधी बोलतांना फारसं काही न बोलता काय करत आहेस ? झालं जेवण ? ह्याच्या व्यक्तिरिक्त पुढे तोच म्हणत असेल की बोल तूच.....रोज रोज काय बोलायचं ते मला नाही कळत..... अशी परकेपणाची जाणीव करून देणाऱ्या जोडीदाराला आपल्या लाईफशी कंपेयर करणे हे अगदी अयोग्यच.....!!! तसेच खरं प्रेम करणारा व्यक्ती कधीही कामाचा बहाणा सांगत नसतो. तो कितीही कामात व्यस्त असुद्या तो तुम्हाला वेळ देणारच. म्हणून प्रेम करण्याआधी समोरील व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत ते आधी जाणून घेणे महत्त्वाचे असते. समोरील व्यक्तीला तुमच्या आयुष्यात काय घडतंय ह्याचं काही फरक पडत नाही. तुम्ही कितीही दुःखात असलात तरी एक शब्द विचारून आणि त्याकडे दुर्लक्ष करून त्याला जे पटेल ते करेल. बाकी तुम्ही तुमच्या जोडीदारावर कितीही जीव लावलात तरी ते व्यर्थच जाणार आणि तुम्हाला शेवटी एकांतात बसून कित्येक तरी हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. कारण एकदा ती व्यक्ती सोडून गेली की अगदी जीव गमावल्यासारखं वाटते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance