Sonali Kose

Inspirational Others

2  

Sonali Kose

Inspirational Others

लोकं हे बोलतात, लोकं ते बोलतात

लोकं हे बोलतात, लोकं ते बोलतात

3 mins
104


 हे अगदी बरोबर आहे ना , म्हणूनच तर आपण कुठे तरी मागे पडत असतो. लोकांचं कामचं आहे हो दुसऱ्यांना नावं बोटं ठेवण्याची म्हणून आपण जगणं थांबवून द्यायचं काय ? त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपण फक्त जमिनीवरच राहू. आपल्याला कधीच आकाशात मुक्त संचार करायला मिळणार नाही. कारण लोकं आपल्याला काहीही बोलतात म्हणून. अरे , ते बोलून बोलून किती बोलणार. शेवटी आपली नियत परमेश्वराला माहितीच आहे. लोकांचं काय मनावरती घेऊन बसायचं. तुमचे कर्म चांगले असो वा वाईट असो त्यांचं जे काम आहे ते लोकं नक्की करणारच. कारण ते नेहमी आपल्यावर हसायला येतात पोसायला नाही.


               आपल्या यशाच्या मार्गावर कुणी ना कुणी अडथळा आणत असतो. मग ती वेळ असो , परिस्थीती असो किंवा आपल्यावर जळणारी माणसे असो. मार्ग काटेरी असला तरी चालेल परंतु त्या वळणावरून तुम्ही मागे हटता कामा नये. कारण एकदा जर का तुम्ही खचून मागे वळलेत तर पुनः सामोरे जाण्यास तुमच्या मनातील जो आत्मविश्वास आहे तो नक्कीच कमकुवत होणार हे नेहमी लक्षात ठेवा. आणि कोणताही काम छोटं असलं म्हणून त्याला नाकारणे हे अगदी वेडेपणाची लक्षणं. काम छोटं असलं म्हणून ते करायला कधीच लाजू नका. कारण लहानातूनच मोठ्याची प्रगती होत असते. लोकांचं बोलणं कधीच मनावर घेऊ नका. ते नेहमी आपल्या प्रगतीवर खटकत असतात.


                 तुमच्या सुख दुःखाची व्यथा लोकं कधीच समजू शकणार नाहीत. आयुष्यात जे काही तुम्हाला करायचं आहे ते निर्भिडपणे करा. निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामाच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. जेणेकरून येणाऱ्या भविष्यातील दोन दिवस तुम्हाला सुखाने जगता येतील. *ग्रासलेले मन व त्रासलेले चित्त* हे बाजूला सारून नव्याने वाटचाल सुरू करण्याचा धाडस तुमच्या अंगी असूद्या. परिस्थीतीनुसार वेळही बदलत जाते. जे लोकं आज तुमच्यावरती हसत आहेत किंवा तुम्हाला नावं बोटं ठेवत आहेत तेच लोकं तुम्हाला उदयाला आदर सन्मानाने मान देतील असे काही तरी मोठे करण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या लोकांची मानसिकता बघून

मनात कधीच न्यूनगंड बाळगू नका. कारण *You Can Do It*. तुम्ही करू शकता.


              जीवन हे खूप सुंदर आहे. जीवनातील एक एक क्षण हा बहुमूल्य असतो. पैसा हा कधीही कमवता येतो परंतु जिवाभावाची माणसं एकदा गमावल्यानंतर परत ते कमविता येत नाही. तसचं पायाला ठेच लागून पडलो व माझं पाय रक्तबंबाळ झालं म्हणून घरात दडून बसायचं नसते. जीवन जगण्याची हिच तर खरी मजा आहे. लोकांचे ताने , सुख - दुःखाच्या कळा , उन्हाच्या झळा , वेदना , असंख्य हालअपेष्टा , काळजाला लागलेले घाव , खचलेले मन , जीवनात आलेले अपयश सहन करीतच आपण ऊंच शिखरावर पोहचू शकतो. मनात हवी फक्त जिद्द व चिकाटी. तेव्हाच कुठे आपण आकाशात उत्तुंग भरारी घेऊ शकतो. समाजामध्ये वावरत असताना अशी काही लोकं असतात जी आपल्या प्रत्येक वळणावर साथ देत असतात. व काही अशी माणसं असतात जे निव्वळ कामानिमित्त एकमेकांचा वापर करून घेतात. दुसऱ्यांचा भलं झालेलं लोकांना कधीच खपत नाही. तोंडावर गोड बोलून मागे जळणारे असतात ती म्हणजेच आपलीच माणसे. त्यांच्यामुळे आपण आपलं भवितव्य धोक्यात घालवू काय ? हे कितपत योग्य आहे. जोवर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे होत नाही तोवर तुम्ही तुमच्या परिवाराचाही आधारस्तंभ बनू शकणार नाहीत. म्हणून असल्या लोकांकडे दुर्लक्ष करा.

            

              कधी कधी आपण स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखत असतो. आपण नेहमी नकारात्मक विचार आपल्या डोक्यात आणत असतो. लोकं बोलतात बोलू द्या. तोंड त्यांचं दुखणार तुमचं नाही. लोकं हे बोलतात , लोकं ते बोलतात हे शब्द आपण आपल्या डोक्यात बसवून मनात न्यूनगंड निर्माण करतो. खरंतर लोकांच्या बोलण्यातूनच एक प्रकारची जिद्द , काही करण्याची नवऊर्जा निर्माण होते. आणि म्हणून त्यांच्या बोलण्याने एक पाऊल पुढे चाललेली पायवाट दोन पाऊल मागे घ्यायची नसते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational