Sonali Kose

Others

2  

Sonali Kose

Others

त्रास देऊ नका कुणाला

त्रास देऊ नका कुणाला

2 mins
119


एकदा मारलेल्या घावापेक्षा, शब्दांनी टोचून बोललेलं घाव जास्त मनाला लागतो. मारलेला घाव मिटून जातो किंवा आपण ते विसरू पण शकतो मात्र शब्दांचा घाव मनाला लागलेला असतो.तो मिटवता सुध्दा येत नाही आणि विसरता सुध्दा येत नाही. लोकांच्या असल्या कृत्यामुळे माणूस वेडेपणाच्या आहारी जातो नी उलट सुलट काही करून घेतो. कधी कोण साथ सोडून जाणार ह्याचेही कुणाला भान नसते. तरुण पिढीला तर प्रेमाचा नादच लागलेला असतो. 


अर्ध्यात कुणी साथ सोडली तर त्यात ते बळी पडतात आणि त्रास सहन न झाल्यास कुणी आत्महत्या करतो तर कुणी हाताची नस कापणे वगैरे इत्यादी हे मार्ग स्वीकारतात. मग हा असला त्रास दुसऱ्यांना देऊन तुम्ही तरी सुखाने जगू शकाल काय ?


मानवामध्ये आज स्वार्थीपणाची वृत्ती जास्त वाढत चालली आहे. आपल्या वाईट वागणुकीमुळे किंवा वाईट बोलण्याने कुणाचे मन दुखावतील ह्याचेही त्याला कधी भान नसते. आपल्याला आपला जीवन सुखाने कसा जगता येईल ह्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करायला हवा. मात्र तसं न करता आपण आपल्याच नादात जगतो. आपल्या हातून चूक घडल्यास त्या चुकीची क्षमा मागायला मनाचा मोठेपणा असावा लागतो.


जन्मदात्या आई- वडिलांना आज किंमत नाही. मुले तरुण वयात आले की आई - वडिलांना खूप दुखापत करतात. त्यांच्या कर्जाचे ऋण फेडण्यासाठी अख्खं आयुष्य संपून जाणार. मात्र आपण त्यांचे कर्ज कधी फेडू शकणार नाही. कारण आजची मानसिकता अशी झाली आहे की मुलाला फक्त बायको हवी, बायको घरात आल्यानंतर अलग होण्याचे निर्णय घेतात. भावभावांत नंतर भांडणे सुरू होतात. प्रत्येक घराघरांत ही असली मानसिकता सुरू आहे. त्यामुळे जो प्रत्येक व्यक्तींना होणारा त्रास टेन्शनकडे वळवितो. ही आजची वास्तविक परिस्थिती आहे.


प्रत्येक व्यक्तींना कोणता ना कोणता त्रास असतोच. मानसिक , शारीरिक , सामाजिक , आर्थिक , प्रापंचिक , शैक्षणिक (अभ्यासाचा ताणतणाव) त्यामुळे होणारा त्रास इत्यादी त्रास आपल्याला होतच असतात. कधी कुणाच्या कटू वाणीतून आपल्याला जन्मभर तो त्रास सहन करावा लागतो. शेवटी असल्या होणाऱ्या त्रासामुळे ताणतणाव वाढतो नी आपण घेतलेलं निर्णय कधी - कधी चुकतात. म्हणून कधी कुणाला त्रास न देता आपण सद्सदबुध्दीने विवेकविचार करूनच अमृताहूनी गोड वाणी बोलली पाहिजे. जेणेकरून कुणाचे मन ही दुखावणार नाही आणि त्याच्या काळजाला पण दुखापत होणार नाही.


Rate this content
Log in