Sonali Kose

Inspirational

2  

Sonali Kose

Inspirational

दोन वर्ष, अकरा महिने, अठरा दिस_किती सोसलं भीमानं

दोन वर्ष, अकरा महिने, अठरा दिस_किती सोसलं भीमानं

1 min
571



क्रांतीसुर्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करुनी, पावाच्या तुकड्यावर दिवस काढले. परिस्थिती अत्यंत हलाखीची/गरिबीची असली तरी पाठोपाठ रमाची त्यांना साथ होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी शाळेत बसू देत नव्हते. तरी त्यांनी खचून न जाता वर्गाच्या बाहेर राहून खिडकीतून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षण घ्यावया भीम परदेशाला गेले तरी रमाने त्यांना कधी अडवले नाही. बाबासाहेबांची पुस्तकांशी गाठ मैत्री होती. दिव्याच्या प्रकाशात पुस्तकांसवे त्यांनी कित्येक रात्र काढल्या. नातं जरी रक्ताचं नसलं तरी लाखो भारतीयांसाठी त्यांनी आयुष्याची वात पेटविली. रक्ताचे करून पाणी, हरपून सारे देहभान, आपल्या जीवाचे रान करून कित्येक दिवस पाण्याच्या घोटावर काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस ह्या कालावधीत त्यांनी देशाची राज्यघटना पूर्ण केली. आज संपूर्ण जगत/विश्वाला बाबासाहेबांनी संविधानातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक न्याय, मानवतेची शिकवण मिळवून दिली. संविधानात जाती-पातीचा भेदभाव न करता आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, असे बाबासाहेबांनी नमूद केले.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational