Sonali Kose

Others

3  

Sonali Kose

Others

सगळे आपले आहेत हाच मोठा गैरसमज

सगळे आपले आहेत हाच मोठा गैरसमज

3 mins
190


सगळे आपले आहेत हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे...!!


अनेकदा असे होते , जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा त्या आनंदात सामील होणारे भरपूर लोक असतात. आणि जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो तेव्हा कुणीच धावून येत नाही. हीच तर खरी शोकांतिका आहे. ह्यातूनच आपलेपणा किती जपला पाहिजे हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 

वाट्याला कितीही दुःख आलेले असेना तरी ते हसून टाळता आले पाहिजे व नव्या उमदीने सुख शोधता आले पाहिजे. कारण ह्या जगात कुणावर विश्वास ठेवावा.. आणि कुणावर नाही.? याची चलबिचल मनात निर्माण झालेली असते. कारण आपल्या माणसांवर कितीही विश्वास ठेवला तरी ते शेवटी परकेपणाची जाणीव करून देतातच..! कारण भाऊ, कितीही सख्खा किंवा रक्ताच्या नात्याचा असला तरी तो शेवटी वैरी बनतोच. म्हणून समोरच्या व्यक्तीचे वर्तन , त्याची बोलण्याची शैली , त्याच्या बोलण्यातील सत्यता पडताळूनच सखोल असा विचार करून त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे.


           आपण बघतोय , आजच्या युगात आई वडीलांपेक्षा मित्र - मैत्रीण , प्रेमी - प्रेमिका किंवा बाहेरच्या व्यक्तींना आपण अगदी जवळचे समजतो. व त्यांनाच जास्त महत्त्व देत असतो. पण हे कितपत योग्य आहे. ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपलं आज प्रेमाच्या नादात त्यांनाच नाकारतोय. आई वडिलांच्या विरोधात जाऊन मुलगी पळून लग्न करतेय. ही आहे आजची लाजिरवाणास्तव पिढीची गोष्ट. नंतर त्यांना पश्र्चाताप येतो. तुमच्या सुख - दुःखात सहभागी होणारी अनेक माणसं असतील. परंतु त्यातले आपले कोण हे मात्र वेळ आल्यावरच कळते. जीवनात अशी कित्येक तरी माणसे येत जात असतात. पण त्या सर्वांनाच महत्त्व देणे योग्य नाही. 


           आपलेपणाची नाती जपता जपता मनात अनेक असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. वळण कितीही स्वच्छ असली तरी त्या वळणावर थोडेफार खाचखळगे पडलेले असतातच. शरीराला झालेली जखम , संकटकाळात हवा असलेला आधाराचा हात व वृद्धापकाळात मिळणारी आधारची काठी इथूनच खरी आपली माणसे ओळखून येतात. आभाळ कितीही उंच असले तरी मनात जिद्द असल्यास अमाप आभाळालाही आपण हात लावू शकतो. फक्त मनात आशा , जिद्द , चिकाटी असायला हवी. आयुष्य आहे म्हणजे संकट येणारच आणि संकट कितीही मोठे आले तरी त्यांच्याशी सामना फक्त एकट्यालाच करावं लागतो. या जीवनात कुणी कुणाचं नसतं. रक्ताच्या नात्यातला आईच्या पोटचा मुलगाच तिला म्हातारपणी आधाराची काठी देऊ शकत नाही तर आपलं म्हणायचं तरी कुणाला ?.. आपलीच माणसे शिकवितात आपलं कुणी नसतं. *सगळे आपले आहेत हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे...!!* समोर कितीही भयंकर वादळ असो आपली माणसे आपल्यापासून दूरच जाणार. कारण त्यांना फक्त सुखात सहभागी होता येते आणि दुःखात मात्र खदखदून हसता येते. अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतः वर विश्वास ठेवणे. म्हणून स्वतः आत्मनिर्भर बना. स्वतःला इतके मजबूत बनवा की समोर कितीही दुःख किंवा संकटे खेचून आलेत तरी त्यांच्याशी लढण्याची ताकद एकट्यात असली पाहिजे. ना कुणाचा कसलाही विचार करता , ना कुणाची मनात भीती बाळगता आपणच आपल्या माणसांची पारख केली पाहिजे. जीवनात हरलेत तरी चालेल. पण कधी हार मानून घेऊ नका. कारण तुम्ही हरलात तर पुन्हा प्रयत्न करता येईल आणि जर का तुम्ही हार मानली तर तुम्ही तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सक्षम नाहीत असे समजून जा. कारण जीवनात एकट्यालाच संघर्ष करावा लागतो.... 



Rate this content
Log in