Sonali Kose

Inspirational

2  

Sonali Kose

Inspirational

माणसांची कदर करायला शिका...

माणसांची कदर करायला शिका...

2 mins
57


            जेव्हा आपण जन्माला येतो , तेव्हा कुणालाच ठाऊक नसतं. कारण त्या वेळेस आपल्याला काहीच समज नसते. हळूहळू आपण मोठे होत जातो तसतशी आपल्याला समज सुध्दा यायला लागते. तिथंच दडलेलं असते आपलं अल्लड असं बालपण. दैनंदिन जीवनात अशी कित्येक माणसे जन्माला येतात आणि मृत्यूमुखी सुध्दा पडतात. याची आपल्याला जाणीव नसतेच.


           आजच्या युगात फसवेगिरी , धोकाधडीचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. काहीशा व्यक्तींना गरजेनुसार बोलावेसे वाटते तर , काहींना मनात स्वार्थ ठेवून बोलावेसे वाटते. *माणूस जो पर्यंत जिवंत असतो तो पर्यंत त्या माणसाची किंमत आपल्याला कळत नसते* हे अगदी खरं आहे. कारण माणूस कितीही प्रामाणिक असला तरी त्याला नावं बोटं ठेवण्याची सवय कित्येक तरी लोकांत अजूनही आहे. कुणी आपल्यापेक्षा समोर गेलं तर त्याला जळणारे सुध्दा असे भरपूर लोकं आहेत. त्याला मागे कसे खेचता येईल ह्याकडे त्यांचं मन केंद्रित असते. परंतु ही नकारात्मक भावना आपण आपल्या मनात का ठेवावी ? माणसाला माणूसच दुखापत / ईजा करतो आणि त्या जखमेला मलम सुध्दा माणूसच लावतो. परंतु आपल्याला अशा माणसांची कदर मुळीच नसते. जी माणसे अगदी प्रामाणिक असतात त्यांना कुणी विचारत सुध्दा नाही. कारण ह्या जगात प्रामाणिक माणसांचे प्रमाण कमी आणि स्वार्थी माणसांचे प्रमाण अधिक आहे. कधीतरी एकनिष्ठ होऊन निस्वार्थी मनाने आधाराचा हात देऊन बघा , नक्कीच तुम्हाला ऐश्वर्य मिळाल्यासारखे वाटेल. 


                  आपण आपल्याच माणसांशी खोटे बोलत असतो. त्यांच्या भावभावनांचा जराही विचार सुध्दा करीत नाही. जेव्हा तुम्ही सुखात असता तेव्हा तुम्हाला कुणाचीही गरज भासत नाही. परंतु जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा ते दुःख व्यक्त करायला अशी एक व्यक्ती हवी असते जिथे आपण मनमोकळेपणाने आपले दुःख व्यक्त करू शकतो. प्रत्येक माणसांत एक विश्वासाचं नातं असणे गरजेचे आहे. संकटकाळी आपलीच माणसे मदतीला धावून येतात. तुमच्या सुख दुःखात बरोबरीचा वाटा घेतात. मग माणूसच माणसाप्रती एवढा क्रूर का ? एखाद्या संतापलेल्या कुत्र्याप्रमाणे माणूसच माणसाचा बळी घेण्यास झुरतो आहे. नकोशा त्या मार्गावर माणूस गेलेला आहे. त्यांच्याशी तुम्ही उद्धाटपणाने बोलणं हे तर अगदी चुकीचे आहे. कारण ह्या स्वार्थी जगात निस्वार्थीपणे साथ देणारे लोकं क्वचितच मिळतात. अशा माणसांची तुम्ही कदर करायला शिका. जेणेकरून तुमचाही कुठे ना कुठे लाभ होईल. त्यांना फसवून नाही तर त्यांचे मन जिंकून त्यांच्या हृदयामध्ये आपली जागा प्रस्थापित करा. तुम्हालाही नक्कीच माणसं ओळखता येतील. मरणोत्तर स्तुती करणारे अनेक असतात , त्यात कुरवाळून रडणारे सुध्दा अनेक असतात. परंतु जिवंतपणी माणसांची कदर करणारे फारच कमी अशी लोकं असतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational