Purnima Desai

Abstract Fantasy Inspirational

4.0  

Purnima Desai

Abstract Fantasy Inspirational

एकमेकांचे पाय ओढणे

एकमेकांचे पाय ओढणे

2 mins
217


लहानपणी रक्षाबंधन दिवशी आमची खुप तयारी असायची. आमची आई एकुलती एक असल्यामुळे तीचे चुलतबंधू तीच्याकडे राखी बांधून घ्यायला मोठ्या उमेदीने आमच्याकडे यायचे. त्यामुळे आई आणि आम्ही चार मुली अगदी उत्साहात सगळी तयारी करायचो. आम्हीही बहीणी आमच्या तिन्ही भावांना बांधण्याच्या तयारीला लागायचो. आईचे बंधू म्हणजे मामा कंपनी आईला चांगली गिफ्टं आणत असल्यामुळे आमचे लक्ष आमच्या बंधूकडे ते काय गिफ्ट देतात याच्याकडे असायचे. पण आम्हाला माहित होतं ते लहान असल्यामुळे आईकडूनच पैसे घेऊन आम्हाला गिफ्ट देणार. मला आठवतं आमची सगळी तयारी झाली की ओळीने त्यांना बसवून राखी बांधत. ओवाळणी झाली की आमचं लक्ष भाऊंच्या हाताकडे असायचे. ताटात काय ठेवतात ह्याची खुप उत्सुकता असायची. आमचा धाकटा भाऊ तेव्हा काहीच न ठेवायचा. आम्ही विचारताच म्हणायचा मी ब्लेंक चेक देतो. तुम्ही मी मोठा झाल्यावर तो केश करायचा. आम्ही सगळ्या बहिणी त्याच्या ह्या लबाडीला ओळखून असायचो. त्याच्याकडून काहीतरी वसूल केल्याशिवाय त्याला सोडत नसत. मग तो नाटकं करत काही पैसे ठेवायचा पण त्यातही त्याची हुशारी असायची. म्हणायचा, 'आता सद्या तुम्ही ठेवा पण मला लागतील तेव्हा परत द्यायचे.' आम्हीही तात्पुर्तीसाठी घ्यायचो खरंतर मला बाकीच्या मैत्रीणीसमोर फुशारकी मारायची असायची ना. कारण त्यावेळी कुणी काय काय दिलं ह्याची मोठी चर्चा आमच्यामध्ये व्हायची. आम्ही मोठे झाल्यावर ही गोष्ट त्या भाऊला प्रत्येक रक्षाबंधनला मुद्दाम आठवण करून देत आणि विचारायचोही .. तुझा तो चेक कधी वठवायचा? आणि तो तेच उत्तर द्यायचा “ थांब गं.. मी होऊ दे मोठा पैशेकार ”..

आता तर म्हणतो, " अगं ती राखी अजून बांधायची असते..? आता आम्ही सिनियर्स झाले ना " ?..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract