STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Crime

3  

ऋतुजा वैरागडकर

Crime

एका आईची आर्त हाक

एका आईची आर्त हाक

2 mins
270

मला माझ्या बाळाला एकदा बघू द्या... प्लीज एकदा बघू द्या...

ही आर्त हाक एका आईची होती, ती पोलिसांना विनवणी करत होती, त्यांच्या हातापाया पडत होती. रडूनरडून बेहाल झाली होती. डोळ्यातले अश्रू आटत होते पण पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. ऑन ड्युटी त्यांचाही नाईलाज होता. असे काय झाले की ती आई आपल्या बाळाला बघण्यासाठी आतुरली होती, हम्म बाळाला नाही मृत बाळाला, तिला एकदा आपल्या मृत बाळाला बघायचं होतं...

    

आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वांत अविस्मरणीय क्षण असतो, एका आईचा दुसरा जन्म असतो. तो इवलासा जीव जेव्हा या जगात येतो, त्याच्या इवल्याश्या हातांनी जेव्हा आईला स्पर्श करतो, आईला तर आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटते, सगळं जग मुठीत सामावल्यासारखं वाटतं, पण जेव्हा मुठीतून तेच निसटतं ना तो त्रास असह्य असतो. या आईची आर्त हाक ,हाकच राहिली, कुणाच्या कानापर्यंत पोहचलीच नाही.


आपलं बाळ काचेच्या पेटीत सुरक्षित आहे या वेड्या आशेने तिने डोळे मिटले, आणि आपल्या गोड बाळासोबतचे स्वप्न रंगवू लागली, अचानक डोळे उघडले ते आजूबाजूच्या ओरडण्याने... ज्या वॉर्डात तिचं बाळ ठेवलं होतं त्या वॉर्डाला आग लागली होती, आणि त्या आगीच्या धुरात तिचं बाळ गुदमरून मरण पावल होत... पाच दिवसांचं ते बाळ जग बघायच्या आतच जग सोडून गेलं... त्या आईने हंबरडा फोडला... पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, तिचे अश्रू देवाला दिसले नाहीत की त्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही...


लग्नाच्या दहा वर्षानंतर तिच्या घरी कृष्णाने जन्म घेतला होता. पण तेही तिच्या नशिबात नव्हतं. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर अंतिम संस्कार केले, त्या आईला तिच्या बाळाला शेवटचं बघताही आलं नाही, एका स्त्री साठी यापेक्षा मोठं दुर्देव नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime