एक शोध तिच्या अस्तित्वाचा....
एक शोध तिच्या अस्तित्वाचा....
स्त्रीला लहानपणापासून परक्याच धन म्हणून संबोधलं जात, आणि सासरी परक्या घरातून आली. लहानपणापासून तीच स्वतःच असं हक्काचं घर तिला कधी कोणतं...? असं नेहमी वाटत . त्यामुळे माझ्या मते कोणत्याही स्त्रीने आधी स्वतःच घर तयार केल्या शिवाय लग्नच करू नये.
स्नेहल ही अशीच जी स्वतःच्या हक्कासाठी लढणारी.... !
स्नेहल तिच्याच "शून्य, विचारात जाऊन हरवलेली होती . कारण ही तसेच असते, तीला जवळच्या नातेवाईक मधील स्थळ चालून आलेले होते,पण तिला लगेच लग्न करायचे नव्हते , कारण आता कुठे ती डिग्री पूर्ण करून जॉबला लागलेली होती. तिला आयुष्यात आधी सेटल होईच असत, स्वतःच एक घर उभं करायचं असत नंतर लग्न...!
यामुळे ती जरा नर्वस असते, पण आई बाबांपुढे तीच काही चालत नाही.
तोपर्यंत तिच्या दारावरची बेल वाजते, आणि ती विचारातून बाहेर येते. बाहेर तिला पाहायला पाहूने आलेले असतात. मुलगा आणि त्याचे आई वडील.
आज तिने छान लाल कलर ची साडी घातलेली होती . मस्त पिंक कलरची लिपस्टिक आणि काजळ यामुळे तिचा नाजूक चेहरा खूपच खुलून दिसत असतो.
तशी असतानाच ती गोरी, नाकाची छान उभी दांडी, उभा चेहरा ती आज खूपच छान दिसत असते. पटकन ती आवरून पोहे घेऊन येते.
त्यानंतर एकमेकांना काही प्रश्न विचारले जातात, नंतर दोघांना एकत्र बोलायला पाठवतात.
सुरुवात रोहित करतो त्याचे नाव , कोठे शिक्षण घेतले. आयुष्यात त्याला काय करायचंय...?हे सगळं तिला सांगत असतो.
स्नेहल मान खाली घालून त्याच बोलणं ऐकत असते. ती फक्त मान होकार्थी हलवत असते. स्नेहलला स्थळ पसंद पडलेलं असत. कारण मुलगा कर्तृत्वान चांगल्या पगाराची नौकरी शहरांत स्वतःचे घर, आणि त्याची मोठी ध्येय यामुळे कुठही त्रुटी काढण्यासारखं स्थळ नसत.
रोहितला स्नेहल पहिल्याच भेटीत आवडलेली असते. एकमेकांची पसंती होते, आणि लग्न पुढच्या महिन्यातील शुभ दिवस बघून ठरल जाते.
दोघांचा बस्ता होतो. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडतो . लग्नामुळे सर्वांची धावपळ चालली असते. दोघांचं लग्न थाटामाटात होत. दोघे खूप खुश असतात.
लग्नानंतर दोन दिवसासाठी फिरायला लोणावळ्याला जातात. कारण रोहितला लगेच कामावर रुजू होईच असत.
इकडे स्नेहल खूप खुश असते. तिच्या मनासारखा जीवनसाथी तिच्या आयुष्यात आलेला होता,पण रोहित खूपच रागीट स्वभावाचा असतो ही बाजू रोहितची स्नेहल ला अनोळखी होती.
सकाळी लवकर उठून स्नेहल ने सर्वानसाठी नाश्त्याला गाजराचा हलवा केलेला असतो. गाजराचा हलवा खाऊन रोहित स्नेहलच खूप कौतुक करतो. सासरे ही त्याच्यात भर टाकतात,पण सासू लगेच नाक मुरडते. मुलाने सुनेचं केलेलं कौतुक सासूला अजिबात आवडत नाही.
घरात त्यांच्या लग्नाची पार्टी ठेवलेली असते, आणि पार्टीत असं काही होत कि तिच्या आयुष्यात एक वेगळंच वळण येत.
ज्या पार्टीच्या दिवसाची सर्वाना आतुरता होती.तो दिवस उजाडतो. स्नेहल खूपच खुश असते. संद्याकाळी 7वाजता पार्टीच आयोजन केलेलं होतें . सर्वजण छान कपडे घालून तयार होतात.
स्नेहलने आज ब्लॅक कलरचा वनपीस घातलेला होता . छान मेकअप, हेअर स्टाईल आणि डार्क रेड कलरची लिपस्टिक लावलेली होती . ती आज सर्वांच्यात खूपच उठून दिसत असते.
दोघांनीही आपल्या मित्र मैत्रीण, पाहुण्यांना पार्टीसाठी निमंत्रण दिलेले होते. तोपर्यत तिच्या सासूबाई येतात,आणि तोऱ्यात बोलू लागतात, बास झालं नटणंथटणं पाहुणे आलेत त्यांच्याकडे बघा जाऊन.
सासूबाईच असं तोऱ्यात बोलण ती दुर्लक्ष करून ती तेथून निघून जाऊन पाहुण्यांना सरबत देत सर्वांशी हसत गप्पा गोष्टी करत असते.
आज दोघेही खूप खुश असतात. रोहित आज स्नेहलकडे बघतच राहतो. ती आज खूपच सुंदर दिसत असते.
स्नेहलला दुरूनच तीचा कॉलेज चा मित्र येताना दिसतो, ती त्याला बघताच त्याच्याकडे जाते. दोघांच्या गप्पा होतात. इकडे रोहित खूपच चिडून तिच्याकडे पाहत असतो. तीच असं मित्राशी बोलण त्याला अजिबात आवडलेलं नसत.
कुशल हा स्नेहालचा कॉलेज मित्र असतो. स्नेहल म्हणते, " थांब तू मी आले तुला सरबत घेऊन आणि ती सरबत आणायला जाते.
सरबत घेऊन येताना तिचा ड्रेस पायात अडकतो आणि सरबत एकाच्या अंगावर सांडतो. ते रोहित पाहतो, तो तिच्यावर संगळ्यांन समोर खूप जोरात ओरडतो. तुझं लक्ष कुठं आहे. तुला लक्ष देऊन काम करता येत नाही का..?
तिला रोहित असं वागण खूपच अनपेक्षित असतं . त्याच्या अशा वागण्याने ती खूपच घाबरून गेलेली असते. तिचे हात पाय थरथर कापू लागतात.
रोहित पुढे बोलतो, "तुला जर होत नसल तर तू सरळ घरी गेलीस तरी चालेल.
रोहितच्या अशा बोलण्याने तिला आता रडूच कोसळत. सर्वान समोर रोहितने तिचा खूपच अपमान केला होता. ती रडतच तिच्या रूममध्ये निघून जाते. आज ती नवऱ्याच्या अशा वागण्याने खूपच दुखावली गेलेली असते.
आलेले लोक ही रोहितला बोलत असतात.
" नवीन लग्न झालंय आणि किती बायकोला बोलतोय. रोहितच्या अशा वागण्याने सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून जातात.
स्नेहल रात्रभर झोपलेली नसते. रात्रभर तिच्या डोक्यात पार्टीचाच विषय घुमत असतो. रोहितने केलेला अपमान यासगळ्याच्या विचारामुळे रडून रडून तिचे डोळे सुजलेले असतात.
तिला वाटतं कोणीतरी समजूत घालायला येईल, पण तसं काही होत नाही.
सकाळी ती उठते, आज डोकं तीच खुप जड झालेलं असतं. उठून ती कामाला लागते. रोहित हॉलमध्ये झोपलेला असतो.
ती कामातच मग्न झालेली असते. तिच्या डोक्यात अजूनही पार्टीचा विषय गेलेला नसतो.
तेव्हड्यात सासूबाई आवरून येतात. तिला दोन वेळा चहा मागतात, पण तीच अजिबात लक्ष नसत. तिसऱ्या वेळेस जोरात आवाजात बोलतात, मला चहा दे, बहिरे झालें का कान तुझे...? तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलं नाही का तुला....?
त्यांच्या बोलण्याचा तिला खुप राग आलेला असतो .
ती सरळ बोलते, 'माझ्या आई-वडिलांचं काही काढू नका. काय बोलायचं ते मला बोला.
रोहित दोघींच्या बोलण्याने उठलेला असतो, तो रागातच स्नेहलला बोलतो, आईला अशी का उलट बोलीस माफी माग तिची पटकन... !
स्नेहल, आहो मी त्यांना उलट काहीही बोलली नाही, मी चुकीचे काही बोलेच नाही तर मी माफी का मागू ...!
रोहितला तिच्या अशा बोलण्याने खुप राग येतो. तिच्या जोरदार गालात देतो. तिच्या गोऱ्या गालावर त्याची पाचही बोटे उठलेली असतात. तिचा गाल पूर्ण लाल झालेला असतो. एवढ्या लाडात वाढलेली स्नेहल कधीही आई-बाबानी कधी हात ही उचलला नसतो. आज नवऱ्याच्या मारण्याने पूर्ण बधिर झालेली असते.
आज तिला समजलं असत,कि घरात आपल्याला काडीची किंमत नाही, आणि ती कधी मिळणार ही नाही. आज ज्याच्यासाठी आपण सर्व सोडून आलो त्याची खरी ओळख तिला झालेली असते. "म्हणतात ना, नव्याचे नऊ दिवस तसंच तिच्याबरोबर काहीस झालेलं असतं.
दुपारी तिच्या आईचा कॉल येतो. आई च्या आवाजाने तीला खुप रडू आलेलं असतं. ती हुंदके दाबत आईशी बोलते, सर्व काही ठीक असल्याच सांगते. आई वडिलांना टेन्शन नको म्हणून काहीही सांगत नाही.
यानंतर ती एकच ठरवते कि,यापुढे कधीही रडायचं नाही. या घरातून कुठही न जाता याच घरात राहून काहीतरी करायचं, आणि ती काहीतरी निश्चय करूनच उठते.
आता तिने ठाम ठरवलेले असते कि, " काही झालें तरी मागे फिरायचे नाही. तिची डिग्री पूर्ण असल्याने तिने महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (mpsc)परीक्षा देण्याचे ठरवते .
तिने कोणतेही क्लास न लावता घरी राहून अभ्यास चालू केला होता. रात्रीची ती फक्त तीन तास झोप घेत होती,पण यातील कोणतीही गोष्ट तिने घरात कोणालाही कळून दिली नव्हती.
ती सगळी घरातील काम आवरून अभ्यास करत. ती आता तिच्या ध्येयाच्या दिशेने जात होती. इकडे सासू नवऱ्याचे वागणे यात काही फरक नव्हता. सासरे घरात होणाऱ्या गोष्टीपासून अलिप्त होतें.सासू मुलाचे कान ही भरतच होती .त्यामुळे त्याचा तिच्या नवऱ्याचा राग काही केल्या कमी होत नव्हता.
त्यामुळे घरातील कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता, ती फक्त स्वतःकडे लक्ष देत होती. ती खूप स्वतःसाठी मेहनत घेत होती. तिला फक्त तिचे स्वप्नं पूर्ण करायचे होते, आणि लग्नामुळे तिचे अर्धवट राहिलेले स्वप्नं म्हणजे स्वतःचे घर घेणे. यासाठी ती दिवस रात्र एक करून अभ्यास करत होती.
असेच दिवसामागून दिवस जात होते. चार दिवसांनी तिचा पेपर होता. तिचा अभ्यास तसा कधीच पूर्ण झालेला, आता तिची उजळणी सुरु होती.
परीक्षेचा दिवस आला, तिला थोडंसं दडपण ही आले होते. सकाळी लवकर उठून तिने घरातील सर्व काम आवरून घरी मैत्रिणीकडे जाणार असल्याच सांगिते . कोणाच काही न ऐकता ती देवाला नमस्कार करून निघून जाते.
इकडे दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात . तिला संद्याकाळी उशीर होणार असल्याचही तिने तस सांगितलं होतें.
आज ती खूप खुश होती. पेपर अगदी तिच्या मनासारखे गेले होते. ती घरातील सर्व कर्तव्य अगदी चोख पार पाडत होती. सासू आणि नवऱ्याला एकही संधी टोमणे मारण्याची ती देत नव्हती.
आता तिच्यात वेगळाच आत्मविश्वास आलेला होता. ती आता निकालाची वाट बघत होती. बघता बघता निकाल ही जवळ आला.
ती किराणा आणण्यासाठी दुकानाला गेली असताना दुकानदार तिच्याकडे बघत होता. तुम्ही स्नेहल देशपांडे का....?
स्नेहल ... हो...का..हो काका काय झालं....? ती प्रश्नार्थक नजरेने विचारते ...?
दुकानदार - तुम्ही mpsc परीक्षेत राज्यात 25वा आलात, आताच टीव्ही ला दाखवत होते तुमचा फोटो.
आता तिच्या डोळ्यातून आनंदश्रू ओघळू होतें . ती लगेच आई बाबांना कॉल करून सांगते. तिकडे त्यांचेही आनंदाश्रू थांबत नाही.
रोहित इकडे टीव्ही बघत नाष्टा करत असतो.त्याला बातम्या पाहण्याची खूप आवड , आणि तो समोर पाहतोय तर काय.. ! टीव्ही वर स्नेहलचा फोटो ती राज्यात 25वी आलेली दाखवत होतें.तो नाष्टा बाजूला ठेवून अवाक होऊनच टीव्ही पाहत त्याच्या आईला जोरात हाक देतो. आईचाही टीव्ही पाहून चेहरा पडतो.
स्नेहल तोपर्यंत किराणा घेऊन आलेली असते. रोहित तिच्याकडे जाऊन तिच्या गळ्यातच पडतो. त्याला त्याच्या बायकोच कौतुक वाटत असतं,पण तो त्याच्या आईमुळे थोडा भरकटलेला असतो. तो स्नेहल ची माफी ही मागतो. तिला सॉरी ही बोलतो.
पण ती त्याने केलेला अपमान तुडवलेला स्वाभिमान ते ही सर्वांसमोर कधीच विसरणार नसते. पार्टी त तिला घरी जाण्यास सांगितलेले हेही तिच्या कुठेतरी मनात सलत असतं पण ती त्याच्यापुढे खोटं हसू आणुन तेथून निघून जाते. स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी स्वतःचं घर उभं करण्याचं स्वप्नं लवकरच तिला पूर्ण करायचं होतं.
त्यामुळे कधीच कोणत्याही स्त्री ला कमी समजू नका, तिने मनात आणला ना तर ती काहीही करू शकते.....!
लेख वाचून तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
