दूरदर्शन
दूरदर्शन
शक्तिमानला चिंतेत पाहून गीता ने विचारले "शक्तिमान कसली चिंता तुला सतावत आहे "?
"काय सांगू गीता आज जे चित्र पहिले ते पाहून खूप वाईट वाटले "
"म्हणजे "
"आज खूप दिवसांनी म्हटले बाहेर फेरफटका मारू आणि तुला तर माहित आहे बच्चे कंपनी माझे मित्र म्हणून ठरवले पाहूया तरी माझे हे आजचे मित्र काय करतात म्हुणन सगळीकडे डोकावून पहिले पण जे पहिले "
"म्हणजे शक्तिमान असे काय तू पहिले कि तुला एवढे वाईट वाटले "
"काय सांगू आज ची बच्चे कंपनी मोबाइल मध्ये एव्हडी गुंतली आहे कि ह्यचे बालपण म्हणयां पेक्षा मोबाईल पण म्हणावे काय ते त्यात गुंतले कि त्याना आजूबाजू काय चालू असते हे पण लक्षात नसते दुसरी कडे पहिले तर मुले टीव्हीवर कार्यक्रम पाहत होती ते हि छोटे मुलांचेच पण जे दाखवले जात होते त्यातून ते काय आत्मसात करतील देव जाणे एक्दम चुकीचा संदेश देत होता तो कार्यक्रम जरा पुढे गेलो तर मोठ्या बरोबर छोटे हि डेली सोप मध्ये अडकलेलं ते पाहून मात्र मन खिन्न झाले कुठे जात आहे बालपण ज्या वयात त्याना चांगल्या संस्कारांची शिकवणीची गरज आहे तेव्हा ते हे सगळ्यात गुंतून काय संस्कार घेतील "
"बरोबर आहे तूच शक्तिमान जेव्हा फक्त दूरदर्शन एकच वाहिनी होती तेव्हा कार्यक्रम हि दर्जे दार होते मी पाहिलंय रविवारी तर तुला भेटण्यासाठी बच्चे कंपनी ची कशी उत्सुकता असायची सगळे जण एकत्र बसून मन लावून तूच कार्यक्रम येण्याची वाट पाहायचे आणि मुख्य म्हणजे तू त्याचे मनोरंजन करायचा त्याच बरोबर चांगली शिकवण द्याचा पण आता तसे नाही साठ शंभर वाहिन्या त्यात प्रसिद्ध होण्यासाठी त्याची रस्सीखेच"
"हो ना टी आर पी वाढली की झाली आपण स्वतःला आधुनिकते कडे पुढे एक पाऊल उचले असे असले तरी तो दूरदर्शनचा काळ सगळ्या कुटूंबांना बांधून ठेवत होता सकाळची सुरवात रंगोलीच्या गाण्याने असू दे वा रात्री सुराग पाहून विचार करायला लावणे चित्रहार ,सुरभी ,अश्या दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी रविवारी आणि शुक्रवारी तर घर सिनेमा टॉल्किज बनायचं पण आता कुठे कोण एकत्र बसून काही पाहता वाहिन्या वाढल्या तश्या आवडीही वाढल्या गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी"
