द्रौपदी
द्रौपदी
"अगं रमा जेवायला चल..."
"थांब गं आई एवढंच लिखाण पूर्ण करते आणि येते तुम्ही सुरु करा."
"अगं ये लवकर आम्ही थांबतो तुझ्यासाठी."
"काय हे रमा वेळेत जेवत जा गं."
"बाबा महत्त्वाचं लिखाण दोन दिवसात प्रकाशित होणार आहे..."
"बरोबर आहे जेव्हापासून तू जर्नलिस्ट म्हणून काम चालू केलंस तुझं खाण्यापिण्याकडे लक्षच नाही आहे..."
"हो खरं बोलता तुम्ही बघा कशी झाली आहे..."
"अगं पुरे एवढी काय मी बारीक झाली नाही आहे..."
"हो का मग आता शांत जेवण कर..."
"बरं बाळा कशावर लिहीत आहे तू..."
"झालं तुम्ही सुरु झाला आता... जेवा आता मग बोलूया..."
"ओके मॅडम..."
तिघेही जेवण करून हॉलमध्ये बसतात.
"आई आज मस्त जेवण झालं."
"हो का..."
"बरं बेटा तू कशावर लिहीत आहेस..."
"बाबा द्रौपदी आज असती तर..."
'वाह छान टॉपिक आहे..."
"बरं चल आता झोप शांत..."
"बरं गुड नाईट..."
"गुड नाइट आई-बाबा..."
रमा आपल्या रूममध्ये येते मोबाईलवर जरा नजर टाकत झोपी जाते.
"रमा रमा..."
"कोण कोण..."
"मी द्रौपदी..."
'द्रौपदी..."
p>
"हो महाभारतातली तुला भेटायला आली..."
"खरंच देवी तुम्ही मला भेटायला आलात..."
"हो माझ्यावर तुझं लिखाण चालू आहे... माझ्याबद्दल असलेली तुझ्या मनातली तळमळ मला जाणवली..."
"देवी माझा विश्वास नाही बसत की तुम्ही स्वतः आलात..."
"मी आली आहे रमा...'
"देवी तुमच्यावर मी खूप पुस्तकं चाळली आणि आज प्रत्यक्ष पाहते... तुमच्यावेळी तुम्ही खूप सहन केलंय आणि आता आताच्या स्त्रिया सहन करत आहे त्याचमुळे मी हा विषय निवडला आज तुम्ही असता तर..."
"आज मी स्वतः नाही आहे पण माझ्या रूपातील असंख्य स्त्रिया या ना त्या प्रसंगाला सामोरं जात आहेत. माझ्या मदतीला भगवान श्रीकृष्ण धावून आले पण दुर्दैव आज असे कृष्ण न दिसता दुर्योधन आणि दुःशासनासारखे लोक नजरेस पडतात..."
"देवी त्यावेळी तुमच्या अपमानाचा बदला भीम या योद्ध्यांनी घेतला. आज कोर्ट कचेरीच्या न्यायापर्यंत कधी कधी एवढी वर्ष जातात की कधी कधी अपराधी निर्दोष मुक्त होतो आणि भीम यांच्यासारखे पाऊल उचले तर कारागृह..."
"जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलत नाही आणि स्त्रिया न घाबरता लढत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार..."
"बरोबर बोललात देवी तुम्ही..."
"देवी कुठे गेलात दिसत का नाही मला..."
रमा उठते आजूबाजूला पाहते. तिच्या लक्षात येते की हे एक स्वप्न आहे आणि ती डोळे बंद करून झोपी जाते.