#देवरुपी माणूस :
#देवरुपी माणूस :
गेल्यावर्षी कोरोनाने हाहाकार माजावलेला होता. माणसं एकमेकांशी तुटली गेली. रक्ताची नाती ही जवळ येईनाशी झाली.अश्या खूप विभिन्न परिस्थितीला सर्वजण सामोरे जात होतें.
सिंधू आजी आणि त्यांचा मुलगा राहुल दोघेही या विपरीत परिस्थिती शी लढत होतें. राहुलची प्रकृती खूप नाजूक असल्याने त्या दवाखान्यातच ऍडमिट केलं होत. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत. त्याचा मोठा भाऊ बायको मुलांना घेऊन वेगळा राहत होता. त्याचाही या विपरीत परिस्थितीत मदतीचा हात आला नाही. सिंधू आजी तश्या वयस्करच एकटं घरात राहणं म्हणजे जेवण, चहा, पाणी सगळ्यांची टंचाई कारण वयामुळे घरातील काम करणे त्यांना अशक्यच होत. त्यात मुलाला व्हेंटिलेटर ठेवल्याने त्याची काळजी वेगळीच होती.
त्यांनी त्यांच्या मोठया मुलाला या परिस्थिची जाणीव करून दिली, तर त्याने आईलाच सुनावले आई माझी दोन लहान मुलं लहान आहेत, मला काही झालं तर असं बोलताच त्यांनी त्याला परत फोनही केला नाही. आज रक्ताचं नातंही जवळ येईला घाबरत होत. या परिस्थितीत त्यांना देवच आठवत होता. धाकट्या मुलाच्या काळजीने आसवे गळत होती. काय कराव त्यांना काही समजत नव्हतं...?
त्यांचा घराचा रस्ता ओलंडला की आनंद मेडिकलवाला होता. नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावणारा होता.खूप ओळखीचा त्याची आणि सिंधू आजीची ओळख खूप जुनी. जाता येता सिंधू आजींची आनंद नेहमी चेष्टा करत. तेवढंच सिंधू आजींच्या चेहऱ्यावर हसू येत.
आनंदला जेव्हा सिंधू आजींविषयी समजलं,तेव्हा तो आजींची चौकशी करायला घरी गेला. त्याला पाहून आजींच्या डोळ्यातून आसवे वाहू लागले.
"कोणीतरी चौकशीसाठी तरी आले, त्यामुळे मनाला त्यांच्या उभारी मिळाली.आनंदच्या बोलण्याने त्यांना जरा तरी हिम्मत आली. जाताना त्याने काळजी करू नका.काही हवं असेल तर मला सांगा असं आवर्जून सांगून गेला. सिंधू आजींना त्याच्या बोलण्याने पंखात बळ आल्यासारखं झालं.
आनंद पुन्हा त्यांच्यासाठी चहा, नाष्टा, आणि दुपारचं जेवण घेऊन आला आनंद हा देवासारखाच सिंधू आजींसाठी धावून आला होता. सिंधू आजींनी लांबूनच त्यांना हात जोडले.
आनंद, "आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी राहुलची चौकशी केलीये त्यालाही आता बरं वाटत आहे,आणि हो जेवण करून गोळ्या खा आणि भरपूर आराम करा. तुम्हला काही होणार नाही. मी रोज तुमच्यासाठी जेवण, नाष्टा, चहा घेऊन येईल त्याची काही काळजी करू नका. सिंधू आजींना आनंदमध्ये देवच दिसत होता. आज पोटचा मुलगा उपयोगी आला नाही पण हा कोण कोणाचा तेही तोंडओळख असणारा आनंद त्यांच्यासाठी धावून आला.
राधिका सिंधू आजींची मुलगी. तिने आईला कॉल केल्यावर आईची परिस्तिथी समजली पण तिचाही नाईलाज होता ती परदेशात होती. आजींनी जेव्हा आनंद बद्दल सांगितले तेव्हा तिलाही बरं वाटलं. कोणी तरी आईपाशी असल्याने तिला बरं वाटलं. तिनेही देवाचे मनोमन आभार मानले.
त्यादिवसापासून आनंद न चुकता चहा, नाष्टा, जेवण घेऊन जात असे. सिंधू आजींच्या आयुष्यात देव कधी पहिला नाही पण आज आनंदच्या रूपात त्यांना देवाचा साक्षात्कार झाला.
काही दिवसातच सिंधू आजी आणि त्यांचा मुलगा राहुल या कोरोना महामारीतून बाहेर पडले. राधिका लॉकडाउननंतर आईला भेटायला आली. पहिल्यादा ती आनंदला भेटायला गेली. त्याचे खूप आभार मानले. ती त्याला पैसे काढून देत होती. आनंदने ते घेतले नाही. माणुसकीच्या नात्यात पैशाला मोल नाही असं म्हणून त्याने पैशाला हात ही लावला नाही. अशा प्रकारे माणुसकीच दर्शन राधिकाला ही झालं.
त्यादिवसानंतर आनंद आणि सिंधू आजींच्या नात्यात आणखीनच बॉण्डिंग वाढली. त्या परिवाराला मिळणारी सकारात्मकता फक्त आनंदमुळेच होती. नकारात्मक्तेवर मात करून नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने झाली. त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली.
लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.तुमचा अभिप्राय मिळाल्याने लिहिण्यास प्रोत्साहन नेहमीच मिळेल. लाईक, शेयर, फॉल्लो करायला विसरू नका.
