kanchan chabukswar

Crime

4.1  

kanchan chabukswar

Crime

डोनर अनामिका

डोनर अनामिका

9 mins
440


दूरवर शून्यात नजर ठेवून असलेल्या स्नेहाला रजत च्या पावलांचा आवाज आला. तिला हलकेच जवळ घेत रजत नाही तिच्या कपाळाचे चुंबन घेतले." काय विचार करते आहेस?" रजत म्हणाला.

" आयुष्याचे जेमतेम तीन महिने उरले आहेत, काय काय करायचंय ते ठरवते आहे." हलकेच हसत स्नेहा म्हणाली.


" असं धीर सोडून कसं चालेल? मी पण प्रयत्न करतो तोच आहे ना, बघु कोणीतरी डोनर नक्कीच मिळेल." रजत म्हणाला.

" अरे पण! माझा नंबर तर खूप खाली आहे माझ्या आधी कितीतरी लोक डोनर मिळण्याची वाट बघत लाईन मध्ये उभे आहेत त्यांना सगळ्यांना डावलून, तू जरी मोठा सरकारी अधिकारी असल्यास तरीही, असं बरंच पुढे जाणं मला बरं वाटत नाही." स्नेहाने प्रांजळपणे आपली बाजू मांडली.


गेले वर्षभर स्नेहा किडनीच्या आजाराने त्रस्त होती. मागच्या वर्षी झालेले इन्फेक्शन त्याच्यानंतर घेतलेले औषध उपचार, इन्फेक्शन बरे झाले पण सगळ्या औषधांचा किडनी वरती अतिशय वाईट परिणाम झाला होता. किडन्या काम करेन असे झाल्यामुळे, स्नेहाला डायलिसिस च आधार होता. पण आता तर ती पण शक्यता मावळत चालली होती. पिवळा पडलेला चेहरा, सुजलेले हातपाय, मराठी निर्जीव झाल्यासारखी झालेली सर्व गात्र, एके काळी अतिशय सुरेख आणि अतिशय स्मार्ट, हुशार स्नेहा किडनीच्या आजाराने पूर्णपणे नामोहरम झाली होती.


त्या दिवशीच्या पार्टीमध्ये, रचना बेन मेहता एकदम उत्साहाने त्यांच्या ऑपरेशन बद्दल माहिती देत होत्या. कसा त्यांना एक डोनर मिळाला, कशाच्या कलकत्त्याला गेल्या, आणि योग्य उपचार करुन आता कसं ते आनंदी जीवन जगत आहेत याचा रसभरीत वर्णन रचना बेन आणि विरल मेहता करत होते." तमे चिंता ना करो, हमने बात सांभाळ, तुभी कलकट्टा माटे जा, उपचार कर अपनी जिंदगी आनंद बना." विराल मेहता परत परत स्नेहाला भरीला घालत होते. कुठे नाशिक, कुठे कलकत्ता, कॉलेजमध्ये जाणाऱ्या राधा आणि अभिजीत सोडून तिला कलकत्ता मध्ये जाऊन राहणं शक्यच नव्हतं.

पण आता प्रश्न जीवन-मरणाचा त्यामुळे रजत चिंताग्रस्त झाला होता.


त्या दिवशी अचानक मिस्टर रोड्रिक्स, रजत च्या घरी आले, त्यांची कंपनी ऑर्गन डोनेशन साठी भरपूर मदत करत होती, ते डोनर देखील शोधून स्नेहा सारख्या अतिशय आवश्यक असणाऱ्या गरजू व्यक्तीला पुरवत होती. डोनेशन साठी त्यांच्या कंपनीला कमीत कमी पाच लाख रुपये देणगी देणे आवश्यक होते. सरकारी नियमानुसार सरकारी इस्पितळात मधूनच डोनर चे अवयव काढण्याची परवानगी होती. डोंगर कसा तर नुकताच एक्सीडेंट झालेला, किंवा ब्रेन डेड. जिवंत माणसाच्या अंगातून अवयव काढून घेण्यास सरकारची पूर्ण मनाई होती आणि त्याच्या साठी दंड पण जबरदस्त होता.

रोड्रिक्स ने रजत आणि स्नेहा ची समजूत घातली की त्यांची कंपनी संपूर्णपणे कायद्यानुसारच काम करते आणि मेहता ना त्यांनी मदत केली होती. तरीपण स्नेहा कलकत्त्याला जायला तयारच नव्हती, अभिजीत इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती तसंच राधाची बारावीची परीक्षा तोंडावर होती.

" स्नेहा, जिंदगी बघायची की नाही? तुला तुझ्या मुलीचं लग्न थाटात झालेले पाहायचं आहे ना? मग माझा ऐक, आम्ही डोनर ची व्यवस्था करू तुम्ही फक्त पैसे द्या." रोड्रिक्स परत परत त्या दोघांना समजावत होता.

" तुमच्या सारख्या काही लोकांकडे पैसे असतात तर काही जणांकडे नसतात त्यामुळे आपल्या पैशाचा आपणच उपयोग नाही का करून घ्यायचा?" रोड्रिक्स सगळं पटेल असाच बोलत होता.

" तुमची कलकत्त्याला यायची तयारी नसेल तर मी आमच्या सर्जनला आणि आमच्या डोनर ला मुंबईला घेऊन येईल, तुम्हाला नाशिक हुन मुंबईला याव लागेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये जास्त द्यावे लागतील. त्यापेक्षा त्या एक लाख रुपयांमध्ये कलकत्त्यामध्ये तुम्ही एक महिना राहून पूर्ण बऱ्या होऊनच घरी येऊ शकाल." रोड्रिक्स म्हणणं पटण्याजोग होतं.


हो, नाही करता करता शेवटी रजत निर्णय घेतला, स्नेहाच्या आई-बाबांनी स्नेहा च्या घरी येऊन राहण्याचे मान्य केलं, म्हणजे मुलांच्या परीक्षा व्यवस्थित होतील. आणि स्नेहाची पण तब्येत व्यवस्थित होऊन ती घरी येईल. कलकत्त्याच्या हॉटेलची व्यवस्था, स्नेहाच्या एक महिना राहण्याची व्यवस्था, सगळं काही रॉड्रिक्स न केलं. दोन फिक्स डिपॉझिट मोडून रजत ने पैसे तयार केले आणि पाच लाखाचा चेक रोड्रिक्स च्या हातामध्ये दिला. बाकीचे दोन लाख औषध उपचार ,राहणं, याच्यावरती खर्च होणार होते.


परत एकदा सगळ्या टेस्ट करून स्नेहाने आपले ताजे रिपोर्ट तयार ठेवले. त्या रिपोर्टची कॉपी घेऊन रोड्रिक्स कलकत्त्याला परत गेला.

आठवड्याभरातच त्याचा फोन आला कि" डोनर मिळाला आहे." डोनर च्या ब्लड रिपोर्ट ची कॉपी आणि कंडिशन चे रिपोर्ट रोड्रिक्स स्नेहाला करून पाठवून दिले. स्नेहाने आपल्या डॉक्टर भावाला ते सगळे दाखवून डोनर किडनी तिला चालणार आहे याची खात्री करून घेतली.

या बातमीमुळे स्नेहाच्या घरावरचे मरगळ जणू नाहीशी झाली, राधा अभिजीत, आईचा आयुष्य वाढणार या आनंदात अजून जोमात अभ्यास करू लागले.


     अतिशय थकलेल्या झापड आलेल्या डोळ्यांनी ऑपरेशन टेबल वरून स्नेहाने हळूच डोळे उघडून बघितले, किडनीचा इन्फेक्शनमुळे तिच्या सगळ्या शरीरावर सूज आली होती, डोळ्याच्या पापण्या देखील जड झालेले होत्या, कोणी तिला व्हीलचेअरवरून आणून ऑपरेशन थेटर मध्ये टेबलवर झोपवले हे देखील तिला कळले नाही. अचानक बाजूच्या पडदा बाजूला झाला आणि तिकडे एक तरुण मुलगी तिच्या सारखेच ऑपरेशन टेबलवर ती झोपलेली तिला दिसत होती. सावळ्या रंगाची, उंचच सोळा सतरा वर्षाची पलीकडे पहुडली होती. दोघींची नजरानजर झाली, स्नेहाच्या डोळ्यात आशा-आकांक्षा तर त्या तरुण मुलीच्या डोळ्यांमध्ये सगळा अंधार दिसत होता. भविष्याच्या जाणिवेमुळे दोघेही चिंतामग्न होत्या तरी स्नेहाला प्रकाश मय भविष्याची खात्री होती, ती मुलगी निर्विकार दृष्टीने स्नेहा कडे आपले टपोरे डोळे उघडून बघत होती.


कुठून तरी एक दांडगा वॉर्डबॉय आत मध्ये आला त्यांनी दोघींचे पडदे सारखे केले, नर्स येऊन तिच्या पोटावरती बीटाडीन चोळायला सुरुवात केली, त्या तरुण मुलीच्यादेखील पोटावरती बीटाडीन सारखा पिवळा द्रव्य सोडायला सुरुवात झाली होती. अरेच्या! म्हणजे तिचं पण ऑपरेशन आहे तर, स्नेहाच्या मनात विचार आला. कोणीतरी स्त्री नर्स त्या मुली बरोबर बंगाली मध्ये बोलत होती," टका? टका?" ती मुलगी सारखे विचारत होती, नर्स तिला समजावून सांगत होती. शेवटी पडद्यामागचा संभाषण शांत झाले.


      स्नेहाचा ऑपरेशन यशस्वी झाल्यावर तिच्या अंगावरची सूज हळूहळू उतरू लागली, औषधोपचार, जखम या सगळ्यासाठी म्हणून ती एक महिना कलकत्त्याला राहणार होते. आठ दिवस त्या अनभिज्ञ हॉस्पिटलमध्ये राहून स्नेहा ताबडतोब एका घरामध्ये स्थानांतरीत झाली. तिच्याबरोबर अजून चार-पाच नवराबायकोची जोडपी त्या मोठ्या बंगल्यामध्ये राहत होती. स्वयंपाकाला तीन बायका आणि मधून मधून येणाऱ्या नर्स, खोलीमध्ये असणाऱ्या टीव्ही तिच्या मनोरंजनासाठी उत्तम साधन बनला होता. या पाच जोडप्यांपैकी कोणाचे ना कोणाचे तरी असेच किडनीचे ऑपरेशन झालेले होते. रोड्रिक्सच्या मते सगळ्या पेशंटची व्यवस्थित काळजी घेता यावी म्हणून त्यांना सगळ्यांना एकत्र एका मोठ्या बंगल्यामध्ये ठेवले होते.


सगळे कुटुंब भारताच्या दुसऱ्या-तिसऱ्या स्टेट मधून आलेले असल्यामुळे एकमेकांशी संवाद साधण्याचा जास्त काही वाव नव्हता, भाषेची मुख्य अडचण सगळ्यांनाच येत होती,, कोणी केरळमधून कोणी पंजाब मधून कोणी हरियाणा महाराष्ट्र आंध्र तेलंगणा इत्यादी ठिकाणाहून हे सगळे पेशंट आलेले होते. सगळे हळू ठीक होते, आठवड्यांनी रजत नाशिकला परत गेला.


एके दिवशी टीव्ही बघत असताना कलकत्त्याच्या तीन ठिकाणाहून तीन तरुण मुलींचे मृतदेह सापडल्याची बातमी झळकू ल लागली, रोड्रिक्स च्या मते पेशंट न उगीच बातम्या वगैरे बघून डोक्याला ताप करून घ्यायचा नव्हता त्यांनी फक्त मनोरंजनाचे कार्यक्रमास बघायचे होते तरीदेखील स्नेहाने हट्टाने टीव्ही लावला आणि ती बातम्या नीट बघू लागली.

 

पोलिसांच्या मते तिन्ही मुलींच्या अंगावर ती कुठल्याही ओळखीची खूण नव्हती, त्यांच्यावर बलात्कार देखील झालेला नव्हता, अनुक्रमे चौदा पंधरा सोळा वर्षाच्या होत्या, मध्ये एकच सामने होतं त्यांच्या पोटावरती भलीमोठी जखमेची खूण होती, छोट्या मुलीच्या छातीवरती देखील उभी जखम दिसत होती, बघता बघता स्नेहाच्या तोंडातून एकदम दुःखाने आरोळी बाहेर पडली, कारण त्यापैकी एक मुलगी तिच्या शेजारी झोपलेली हॉस्पिटलमध्ये पडदा बाजूला केल्यानंतर दिसणारी मुलगी होती. स्नेहाने नीट बातमी ऐकली,, मुलीच्या पोटावर दोन्ही बाजूंनी खोल खोल जखमा होत्या, तिच्या खांद्याच्या बाजूने खोल जखमा झालेल्या होत्या, रिपोर्ट मध्ये मुलीचा मृतदेह यामध्ये दोन्ही किडन्या आणि एक फुफ्फुस नव्हतं, तसेच तिच्या लिव्हरचा पण एक तुकडा कापलेला दिसत होता.


स्नेहाच्या डोळ्यापुढे काळोख दाटून आला," अरेरे त्या मुलीचा जीव घेऊन का आम्ही जगत आहोत"? तिच्या मनापुढे शंभर प्रश्नांचे भुंगे घोंगावू लागले. सहज चौकशी करताना केरळ होऊन आलेल्या नफीसा च्या ब्लड ग्रुप आणि स्नेहाच्या ब्लड ग्रुप एकच होता,, नफिसा ला देखील किडनी बदलण्यासाठी कलकत्त्याला आणले होते. रहिमत सतरा वर्षाचा मुलगा आपल्या आईबरोबर त्याच बंगल्यामध्ये उतरला होता, फटाक्याच्या कारखान्यात काम केल्यामुळे त्याचं एका बाजूचा फुफ्फुस निकामी झालं होतं, त्याचा ब्लड ग्रुप देखील स्नेहा सारखाच होता. कुठेतरी आता डोक्यामध्ये एक प्रकाश पडायला सुरुवात झाली होती.


ती मुलगी ऑपरेशनच्या बेडवर तीदेखील नर्सला "टका टका" विचारत होती. पैशाच्या बदल्यांमध्ये तिचे अवयव द्यायला तयार झाली होती.

तिला माहित असेल का, कि तीचे सगळेच काढून घेण्यात येणार आहे? हा तर शुद्ध खुन होता, तिने ताबडतोब रजत ला फोन लावला.

" हे बघ स्नेहा,, आपल्याला काय माहिती कि डोनर कोण आहे आणि त्याचं पुढे काय होणार आहे? आपण सर्व कायद्याने केलेला आहे त्याच्यामुळे उगीच डोक्याला ताप करून घेऊ नकोस". रजत चा चक्क दरडावनी चा फोन स्नेहाला आला.


स्नेहाला मात्र हळूहळू या लोकांच्या रॅकेटचा सुगावा लागला. या मुली कुठून बर आणल्या जात होत्या? तीन-चार दिवसांनी तीन माणसांची मुलाखत झाली, बांगलादेश निर्वासित म्हणून जे भारताच्या सीमेवरती राहत होते त्या तिघा माणसांनी आपल्या मुली हरवल्याची कंप्लेंट बॉर्डर पोलिस कडे दिली होती. फोटोमधल्या मुली त्या तिघांनी आपल्यास मुली म्हणून ओळखल्या होत्या. त्यांना कुठलेही पैसे दिले नव्हते, मात्र एक माणूस मुलींना शाळेत घालतो म्हणून घेऊन गेला होता. कलकत्त्याच्या बाहेरील बाजूस जे चर्च होतं तिथे त्यांनी मुली आणून सोडले होत्या. मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळवून देतो उत्तम शिक्षण होईल भविष्य चांगलं होईल अशी स्वप्न दाखवत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अशा बऱ्याच मुलांना निर्वासितांच्या वस्तीतून चर्च जवळ आणले होते.


स्नेहाने गुपचूप कलकत्ता पोलीस कमिशनर बांधले, तिने फोन वरती तिच्या ऑपरेशनच्या आधी काय झाले हे सगळं त्यांना सविस्तर सांगितलं. खरं म्हणजे असं करण्याने कदाचित रजत ची चांगली सरकारी नोकरी पण जाण्याचा संभव होता. तरीपण स्नेहाची सद सद विवेकबुद्धी तिला स्वस्थ बसू देत नव्हती, तिने घडलेला सर्व प्रसंग कमिशनरच्या कानावर घातला आणि तपासाची चक्रे वेगाने सुरू झाली.


संध्याकाळी फिरण्याची अनुमती सगळ्या पेशंट्सना होती तेव्हा स्नेहा गुपचूप त्या बंगल्याच्या बाहेर पडली आणि तिने चर्च साठी टॅक्सी केली. ज्याच्याजवळ टीव्हीवर ती दिसणार्‍या माणसाला ती भेटली आणि त्याची कहाणी ऐकून घेतली. सहज प्रेयर साठी म्हणून ती चर्चमध्ये शिरली तर चर्च एकदम सुनसान होतं तरी पण तिथे काहीतरी विचित्र वाटत होतं. चर्चा पादरी एकदम तरुण माणूस असून तो थोडा थोडा वॉर्डबॉय सारखा दिसत होता. स्नेहाने नक्की आठवून बघितलं पण तो वॉर्डबॉय नव्हता, तिथे बोलत असतानाच मागून वॉर्डबॉय चर्चमध्ये शिरला त्याच्या हातामध्ये मोठे मोठे टिफिन बॉक्स होते जणूकाही दहा-बारा लोकांसाठी त्याने जेवण आणले होते, वॉर्डबॉयने आपल्या हातातली टिफिन बॉक्स चर्चा अटेंडन्स जवळ दिले आणि त्यांनी दिलेला आईस बॉक्स घेऊन तो घाईघाईने कुठेतरी निघून गेला.


स्नेहाला आश्चर्यच वाटले, चर्च मध्ये फक्त दोनच माणसे दिसत होती आणि जेवण मात्र बारा लोकांचा आलेला होता. चर्चचे फादर कसंनुसं हसून म्हणाले," आज रात्री येथे सेवा करायला बरेच लोक येणार आहेत त्याच्यासाठी नाश्ता मागवून ठेवला आहे. तुला पाहिजे असेल तर तू पण थांब"


स्नेहाने सहज म्हणून विचारले, तर चर्चा फादर तिला म्हणाला की- वॉर्डबॉय अलेक्झांडर देखील कॅथलिक असल्यामुळे तो चर्चमध्ये येऊन सेवा करतो. संशयाचं काही कारणच नव्हतं, तरीपण स्नेहा मधून मधून प्रेयर च्या निमित्ताने चर्चमध्ये जायला लागली. गुपचुप तिथले फोटो काढून ती कमिशनरला द्यायला लागली, मात्र एके दिवशी स्नेहा बंगल्यावर परत आली नाही. तिच्यासाठी रजत न सगळीकडे शोधाशोध सुरू केली तेव्हा या मुलींच्या वडिलांनी त्याला स्नेहा चर्च मध्येच असल्याचे सांगितले. स्नेहाला चर्चमध्ये जाताना त्याने बघितले होते पण बाहेर येताना मात्र नाही त्यामुळे स्नेहा चर्च मध्येच कुठेतरी लपवली गेली होती.


   कमिशनरनी ऑर्डर दिल्यावर सगळ्या पोलीस फोर्सने चर्च ला गराडा घातला आणि आतमध्ये धावा बोलला. वरचा मजला मधला मधला तळघर त्यांना रिकामाच सापडलं मात्र एका दरवाजाच्या आडुन काही तरी विचित्र आवाज येत होते म्हणून तो दरवाजा फोडून त्यांनी आत बघितलं आत मध्ये छोट्या छोट्या पिंजऱ्यामध्ये बऱ्याच कोवळ्या मुली मुले आणि स्नेहा यांना तोंडावर चिकटपट्टी लावून डांबून ठेवण्यात आले होते. पोलीस कारवाई यशस्वी झाली.

 

सगळ्या मुलांना" शाळेत घालतो " असं सांगून तिथे आणण्यात आले होते. नंतर त्यांची दिशाभूल करून त्यांना सांगितलं होतं की तुमच्या पोटावरती एक छोटासा ऑपरेशन करू आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला दहा दहा हजार रुपये देऊन जी तुमच्या शाळेची फी असेल. सगळा कारभार बिनबोभाट चालू होता पण अतिहाव माणसाचा विनाश करते, एकाच मुलीच्या शरीरातून तिचे बरेचसे अवयव काढण्यात आले तेव्हा तिचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ही अवयव चोरीची घटना आणि हा मानवतेचा तोंडावर काळीमा फासणारा गुन्हा उघडकीस आला.


पोलीस कमिशनरने स्नेहाचे अभिनंदन करून ते म्हणाले,"हे असला गुन्हा चालू आहे याची आम्हाला कल्पना होती पण ज्यांचे ऑर्गन बदलण्यात आले असे पेशंट कोणीही पुढे आले नाहीत की आम्हाला काही साक्ष मिळेल, हा एक प्रकारचा अतिशय निंदनीय असा गुन्हाच होता एखाद्या जिवंत माणसाच्या अंगातून त्याचे अवयव काढून घेऊन आपले स्वतःचे जीवन लांबवणे हा एक अक्षम्य गुन्हा आहे तरीपण त्यांनी स्नेहाला मोठ्या मनाने माफ केलं कारण तिला माहित नव्हतं कि डोनर कोण आहे. स्नेहा एक उत्तम साक्षीदार असल्यामुळे, हा गुन्हा उघडकीस आला त्यामुळे ती माफीस पात्र झाली.

रोड्रिक्स वरती गुन्हा दाखल झालेला आहे, संस्थेच्या टीममधल्या अज्ञात सर्जनवरती पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. वॉर्डबॉय पकडला गेला आहे पण त्याच्याकडे जास्त काहीच माहिती मिळाली नाही.

अजूनही रॉड्रिक्स आणि त्याची टीम बेपत्ता आहे शोध चालू आहे.. सगळ्यांनी सावधान.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime