Vasudev Patil

Horror

3.4  

Vasudev Patil

Horror

छपऱ्याची मंजा ६

छपऱ्याची मंजा ६

5 mins
658



   भाग::-- सहावा (गर्भभाव)


 दुपारी गोंधळानंतरच्या भंडाऱ्यात मित्र आग्रह करत असतांना देखील नंदननं मंजिरीमुळं घेतली नव्हती.पण रात्री मंजिरी लगेच झोपली याच्या त्राग्यानं नंदननं फ्रिचमधून स्मिरनाॅफ व्होडका काढुन रिचवूनच झोपला होता. जांभळाच्या झाडाखाली अपरात्री मुलगा पाहताच तो चक्रावला.त्यावेळी व्होडक्याची नशा त्याला सुधरू देईना.तरी पण पावसाळी रातीत हा काय करतोय म्हणून पाहण्यासाठी मिळतील ते शूज चढवत तो खाली आला तर मुलगा विरूद्ध दिशेला तोंड करून बसला होता व काडकाड आवाज करत काही तरी खात होता.प्रथम नंदनला जांभळं खात असल्याचं जरी वाटलं होतं तरी काड काड आवाज ऐकताच हे पोर काय खातंय व कोण? म्हणून नंदन पुढं सरकू लागला. साहेब पुढं सरकू लागला तसा मुलगा झाडाच्या सावली सावलीनं आडोशानं फाटकाकडं सरकू लागला .

"कोण रे तू?काय करतोय या वेळेला इथं?" नंदन नायक पुढे पुढे सरकणाऱ्या पोराला विचारू लागले.पण ते पोर पुढे पुढेच तुरकू लागलं.

"अरे थांब, थांब ना!" नंदन साहेब मागे मागे जात त्याला थांबवू लागले.पण ते पोर थांबेही ना व त्याचा चेहरा ही दिसेना,म्हणून याला फाटकाबाहेर तरी काढावं म्हणून नंदन साहेब त्याचा पाठलाग करत फाटकाकडं जाऊ लागले.त्यांना मध्येच नशेतही काय वाटलं कुणास ठाऊक पण शब्बीरला कार्यालयातून उठवावं म्हणून त्यांनी "शब्बीर,शब्बीर"म्हणत आरोळ्या मारल्या पण शब्बीर उठेना.तो पावेतो ते पोर फाटक चढत बाहेर पडलं.शब्बीरला उठवायचा नाद सोडत ते नशेत फाटकाकडे गेले.त्यांनी 'कचकचकरकर' आवाज करत हॅंडल उघडलं वरची अर्धवर्तुळाकार कडी काढत बाहेर पाय टाकणार तोच फाटकाबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या फरशीवर एका बाजुला ते मुल तर दुसऱ्या बाजूला एक माणूस बसलेला त्यांना दिसला.फाटकाजवळील उंच वाढलेल्या झाडाच्या सावलीत त्यांना चेहरा दिसेना पण पानातून पिवळ्या प्रकाशाची तिरीप मुलाच्या पुढ्यात पडत होती.त्यात नंदनला जे दिसलं त्यानं त्याची नशा उतरू लागली.

मुलाच्या पुढ्यात हाडाचा खच पडला होता.

"साहेब सिना ,चाप ,पायाच्या खुरा याची अर्धवट फोडलेली हाडे आहेत ती! दुपारी खिरणीतल्या एकुण एक लोकांनी मटण चेपलं.पण आम्ही आलोच नाहीत.वावटळीत उष्ट्या पत्रावळी वरवर उडाल्यात पण हाडं तिथंच पडली होती.मुलाकडंनं नाही राहवलं गेलं.एक दिड वर्षांपासून त्यानं मटण खाल्लच नाही.म्हणून उचलून आणत तेच तो खातोय!खाऊ द्या ना आता तरी सुखानं!का उगाच हुसकावून लावताहेत?" बाजुच्या फरशीवर बसलेला माणूस बोलला.

नंदन नायकानं आवाज ओळखला.तो अंधारात ही घामाघूम झाला.प्रसंग ओळखत फाटकापासुन पळ काढण्याचा नायक विचार करत वळले तोच छगन छपरी क्षणात फाटकाच्या आत येत वळलेल्या नायकासमोर उभा.

"साहेब घरी आलात!घाईत तुमचे सोडून माझेच बूट घालून आलात. घ्या हे बूट!आणि पुढे असं कुठं ही बूट टाकत नका जाऊ!उगाच संसार धुळीला मिळतात" छगन बूट देण्यासाठी पुढे सरकू लागला.

नायकाच्या अंगाचा घाम वाढला की काय पण खालची जमीन ओली असलेली जमीन पुरती ओली झाली. नायकानं धूम ठोकली. पण ती क्वाटरकडं नाही तर फाटका बाहेर जिकडे रस्ता फुटेल तिकडे.

"साहेब पळून काहीच हासील होणार नाही, ऐका माझं मुकाट्यानं बूट घ्या व माझे परत करा. "छगन पाठलाग करत साहेबाला पळवू लागला.

"साहेब ऐका ना! त्या दिवशी त्या गजा पाटलाकडच देत होतो बूट पण त्यांनीही ऐकलंच नाही!तुम्ही तरी ऐका!" छगन मागं पळत की साहेबास 

पळवत रानात घुमवू लागला. हा ससेमिरा तीन वाजेपर्यंत चालूच राहिला. सारं रान तुळवत साहेब रात्रीच्या तीन ला पुन्हा सब स्टेशनच्या फाटकाजवळ येऊन थकून उभा राहिला. उंदीर थकून दम तोडण्या आधीच त्याचा दम मारला पाहिजे म्हणून छगन क्षणात फाटकाजवळील जांभळाच्या झाडावर झेपावला.जांभळाची उंच वाढलेली फांदी काड काड आवाज करत विजेच्या तारावर पडली.तार ताड ताड तुटत खाली फाटकावर पडत नायकाला वेटोळा मारत फाटकात अडकले.नायक हॅहॅहॅहॅsssss...करत बोकड शिजावा तसा शिजू लागला. करपटलेला खरपूस वास घुमू लागला.गटलू टाळ्या वाजवत नाचू लागला.

"नाच पोरा!नाच!हे असले उष्ट्या पत्रावळी सोडतात म्हणून ........जाऊ दे चल तुझ्या मंजा मायला सांगायचं अजुन की मेलेला माणूस मटण खायला कसा येईल?"

 शब्बीर आवाजानं उठला त्यानं कार्यालयाचं दार उघडत फाटकाकडं पाहिलं तर लाईट बंद व फांदी पडलेली दिसतात त्यानं घोडा पाडत लाईट बंद केली.व सकाळीच पाहू असं म्हणत झोपला. घोडा पडताच जळालेला उंदीर खाली ढासळला.

 लाईट जाताच कानाजवळ डास भुणभुण करू लागले.मंजिरीस पंखा व लाईट बंद झाल्याचं जाणवू लागलं.तिची झापडं उघडली. तिनं उठत चार्ज केलेली बॅटरी सुरु केली.बाथरुम मध्ये जाऊन तोंडावर पाणी मारत गुळण्या केल्या.तोच मागच्या खिडकीतून उग्र जळाल्याचा दर्प आला.ती साडीचा पदर नाकाला लावत पुढे आली. तर तिला नंदन काॅटवर दिसेना.तिला कुठं गेला समजेना! तोच पुढची गॅलरीची खिडकी खाड खाड वाजू लागली व तोच ...तोच मटणाचा वास घुमला.त्या वासासरशी तिला छगन आठवला. ती खिडकी लावण्यासाठी गॅलरीकडं डोकावली.

  खिडकीच्या गजात हात घालून झडप ओढणार तोच लावलेल्या बॅटरीचा बाहेर पडणाऱ्या झोतात गॅलरीत तिला काही तरी दिसलं.पण जे दिसलं त्यानं मुर्तीसारखी स्तब्ध होत ती समाधीस्थ झाली.

 गटलू हाडं चघळत, फोडत होता तर छगन एका हातात बुटाचा जोड धरून दुसऱ्या हातानं गटलूचं बखोट धरून उठवत होता.

"गटलू नको ना रे खाऊ!ऐक ना!बघ तुझ्या मंजा मायला दाखवायचंय आपल्याला कि माणूस मेला तर कसा येईल परत मटण खायला!"

मंजिरी तशीच भिंतीगत उभी राहिली .

"मंजा हे तुझ्या साहेबाचे बूट घे नी माझे परत कर ! बघ दिड वर्षांपासून बदल करुन गुंथामुथ सोडण्याचा प्रयत्न करतोय मी! पण तिढा वाढतच चाललाय.गजा पाटलांनंही ऐकलं नाही,ना तुझ्या साहेबानं! रातीचा त्याला विनवत होतो .घ्या तुमचे बूट व माझे परत करा पण नाही ऐकलं नी शेवट फाटकाजवळच....."छगन बोलत होता तर मंजिरी निश्चल, शांत ऐकत होती. गटलू छगनसारखाच अधाशासारखा नळ्या चगळत चावत फोडत होता.

"मंजा बघ मी अधाशी अप्पलपोट्या नाही गं!तू सांगत होती तसा!काल साऱ्या गावानं मटण खाल्लं पण मी नाही आलो खायला!"छगन खिडकी पलिकडून बोलतच होता.

आता मात्र मंजिरीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.दार नायक उघडच ठेवून गेला होता पण ना छगन आत घुसला ना मंजिरी बाहेर आली.

उगवतीला केशरसडा उधळत प्राची अवतरण्याआधीच शब्बीरनं बोंब ठोकली.

"गटलू चल....!" ती बोंब ऐकताच छगन नळ्या खाऊन तृप्त झालेल्या गटलूस उठवू लागला.

"माय चल ना गं...!"पाणावल्या डोळ्यानं गटलू मागं मागं पाहत बोलावत गेला.

शब्बीर धापा टाकतच क्वाटरकडं येऊ लागला. पण तो पावेतो मंजिरीनं दार आतून बंद केलं.घरात तिला सर्विस वायरच बंडल दिसलं.डबल वायर करत स्टुलवर चढत मंजिरीनं पंख्याच्या हुकमधून शिरली व.........

मंजिरीचा कॅनव्हास कोराच राहिला.

न रंजन की, न नंदन की! मंजा सिर्फ छगन की!

 जांभळाच्या झाडातून फडफड करत दोन पक्ष्यामागून कोकीळा उडत उडत गजा पाटलाच्या मळ्यातील उंबरावर विसावली.

 कोळसा झालेल्या नंदनच्या देहाभोवती खिरणी गोळा झाली व नंतर तीच गर्दी क्वाॅटरकडे पळाली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror