STORYMIRROR

HEMANT NAIK

Classics

3  

HEMANT NAIK

Classics

चाळीस वर्षांपूर्वीचे पर्यटन

चाळीस वर्षांपूर्वीचे पर्यटन

9 mins
129

४० वर्षांपूर्वी कॉलेजच्या मित्रांबरोबर अनुभलेली सुंदर

उत्तराखंडाची सहल!!!!


तारीख :२७ सप्टेंबर २०२२जागतिक पर्यटन दिवस...


 मी माझ्या COEP तील मित्रा सोबत केलीली उत्तर भारतातील १९८३ साली केलेली ट्रिप आठवली आणि तब्बलाल ४० वर्षांनी वृत्तांत आज योगायोगाने जागतिक पर्यटन दिनी लिहिला गेला.


"पर्यटनाची हीच स्फूर्ती घेऊया,

आज हवापालटाला जाऊया..

भाग COEP च्या  सहजीवनाचाच,

पुण्या बाहेरच्या एका पर्यटनचा.."


हो,आज मात्र मी तुम्हांला पर्यटनाला नेणार आहे. आपली उत्तरभारताची डिसेम्बर ८३ ची फायनल वर्षाची सहल..


केल्याने देशाटन

पंडित मैत्री सभेत संचार

मनुजा चातुर्य येतसे फार


या ओळीची दखल घेऊन कॉलेजनेही सर्व मुलांना चातुर्याचा धडा देण्यासाठीआणि शैक्षणिक सहल आयोजली.अत्यन्त शांत स्वभावाचे गुरुवर्य व्ही. एम. देशपांडे आणि सर्व्हे चे इनामदार सर गाईड होते. बोगी सांभाळण्यासाठी एक सहाय्यक ही होता.


डिसेंबरच्या ३ता. माझ्या बहिणीचं लग्न असल्याने मी भुसावळला जॉईन होणार होतो. सर्व मुंबईहून पठाणकोट एक्सप्रेस ने निघणार होते. आमची स्पेशल बोगी होती त्यामुळे एकदा समान लावलं कुठेही हलवा हलवी नव्हती.या यात्रेत एस. ए., प्रफुल्ल,विजय, सुनील, जयदीप,संजय प्रदीप,प्रकाश आदी साठ एक मित्र सामील होते.थ्री टायर ची संपूर्ण बोगी मुंबईहून बुक केली होती.


उदय, मुंबईहून बसणार होता, गाडी भुसावळ ला बिफोर टाइम आली मी आपला उशिरा जाण्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी सुटायला दहा मिनिट आधी स्टेशन वर गेलो... उदय मी येईपर्यत अस्वस्थ होता.. मी कोचं जवळ गेल्यावर दोन अस्सल शिव्या देऊन स्वागत केले नि माझ्या करिता सांभाळलेल्या लोअर साईड बर्थ वर स्थानापन्न झालो आमच्या कुपे मध्ये नाशिकचा प्रदीप , विद्याधर, उत्तम, जयदीप, आनंद,मेट चा संजय मी आणि उदय असे होतो. राजेंद्र, सुनील, राजस, मधू, विजय, अनिल, प्रकाश मनोहर ...आदी मित्रमंडळी होती. फक्त्त १८०० रुपये देऊन बोगी व ट्रॅव्हलिंग खर्च म्हणून कॉलेज ने घेतले होते. मुक्काम बोगी अथवा हॉस्टेल आदी ठिकाणी होता मात्र जेवण चहा आदी खर्च स्वतः ज्याने त्याचा करायचा होता.


टूर कार्यक्रम असा होता ..

मुंबई..पठाणकोट ने आग्रा कडे रवाना 

आग्रा... ताजमहाल, फतेहपूरसिकरी लालकिल्ला

दिल्ली...दिल्ली दर्शन

दिल्ली टू जयपूर विमानाने

जयपूर टू दिल्ली विमानाने

दिल्ली टू हरिद्वार

रुडकी येथे अभ्यास वर्ग

हरिद्वार.. ऋषींकेश.. मसुरी.

हरिद्वार...काठगोदाम

नैनिताल, अल्मोडा, राणीखेत

काठगोदाम टू दिल्ली

आणि पठाणकोट एक्सप्रेस ने परत.


सर्व मित्र एकत्र डब्यात..खूप धमाल येत होती.. गप्पांचा महापूर होता.. एकमेकांची खेचाखेची मस्त मजा येत होती..


काही मित्रांनी त्यात पत्त्याचा डाव मुंबई पासून मांडला होता...नवरात्रात आपण अखंडदीप लावतो.. अगदी तस्सा...त्या प्रमाणे हा डाव डब्यात बसलो की अखंडित सुरु ठेवण्यांचे व्रत सर्वांनी घेतले होते... कुणाला झोप आली की त्यांची जागा दुसरा मित्र घेत असे.. सर्वं मित्रानी या खेळाचा अनुभव घेतला .... या खेळा बाबत, ज्याचे तीन पत्ती असे नाव होते, मी नवखा होतो पण ट्रिप पुर्ण झाल्यावर माझ्या ज्ञानात बरीच भर पडली...


रावेर चा मित्र दिलीप आणि टी इ चा केळकर हे सरांचे मॅनेजमेण्ट मध्ये सहकार्य करत होते.गाडी स्टेशनं वर आल्यावर स्टेशनं मास्तरशी संपर्कात राहून पुढील ट्रिप नियोजन ते करीत असत.


आग्रा येथे ताजमहाल, आग्रा फोर्ट, जेथे माझा आणि उदयचा फोटो काढला होता, दयालबाग, फतेहपूरसिकरी सर्व स्थळदर्शन झाल्यावर संध्याकाळी ग्रुप ग्रुपने मुले फिरायची, त्यात एका लग्नाच्या वरातीत नाचून घेण्याचीही इच्छाही काहीनी पूर्ण केली होती, थ्री इडियट बघताना अमीरखांन व्हायरस च्या लग्नात अनाहुत पणे घुसतो, तेव्हा या प्रसंगाची मला आवर्जून आठवण झाली.


बार्गेनिंग कसं करावं हे सुद्धा व्यापारी मित्राकडून शिकलो.. अगदी पाणीपुरीत ही बार्गेनिंग केले जात होते... त्याचे व्यसनच सर्वांना लागले होते...


"अगदी कुणी वस्तू फुकटात जरी दिली तर.. दोन देतो का.. या लेव्हलला मानसिकता पोहचली होती ..."


हुशार मंडळी सर्वांची खरेदी झाल्यावर सर्वांचे रेट चा अभ्यास करून अत्यंत किफायती व योग्य भावात ती वस्तू खरेदी करून शाबासकी मिळवत.. पहिल्यांदा खरेदी करणारा मात्र नेहमी गण्डवला जात असे...


फतेहपूरसिकंरी येथील गाईड ची लकब पनवेलचा सोनार (रिक्षा) हा उत्तम करायचा!! बडबडया सोनार राजकारणी, नेता झाला असल्याचे नवल नाही कारण ते सर्वं गुण त्यांत ठासून भरले होते. मुगल राज्यांचे ऐश्वर्य आणि काळाच्या ओघात त्याचा झालेला ऱ्हास तो गाईड त्याच्या खास गमतीदार शैलीत सांगत होता आणि शिटी जोरात फुंकून सर्वाना बोलवीत असे...


त्यावेळेपासून "शिटी मत बजाओ" हे पनवेल च्या सोनारचे वाक्य उचलून धरले गेले. या वाक्याची लोकप्रियता वाढून वेगवेगळ्या कल्पना शक्ती प्रमाणे गमतीदार पद्धतीने सर्वं ट्रिप भर वापर शिट्टी या शब्दांचा सढळ हस्ते वापर होत होता....


उदाहरणार्थ,"साल्यानो, शिट्या वाजवणे बंद करा..झोपा आता.. किंवा कुणी शिट्टी वाजवली रे... आदी "


पण प्रत्यक्षात शिट्टी मारायची वेळ आली की तोंडातून फक्त्त हवा निघायची... मुलींकडे बघुन शिटी मारण्याची हिम्मत कोणतही नव्हती.


थ्री इडियट मध्ये,मध्ये शिटी महात्म्य जाणून गाण्यात सुंदर उपयोग केला आहे.


"ओठो करके गोल,

सिटी बजाके बोल...

भैय्या!!.....ऑल इज वेल "

हे ऐकताना मला शिटी मत बजाना चा किस्सा आठवला.


ट्रिप मध्ये रात्रीचा मुक्काम बोगीतच असायचा वेटिंग रूमच्या बाथरूम मध्ये अंघोळ आणि स्टेशवर चहा प्यायले की सर्व तय्यार , दिवसा साईट सिईंग करायला. संध्याकाळी फिरावयास मोकळीक असे... त्यावेळी ७-८ जण ग्रुप मध्ये जाऊन मार्केटिंग.. नंतर जेवून रात्री बोगी वर परत यायचेत. दिल्लीला कुतूबमिनार,लालकिला,संसदभवन जंतरमंतर.. राष्ट्रपतीभवन आदी स्थळदर्शन झाली दिल्लीला रात्री कॅनॉट प्लेसला, पालिका बाजार मध्ये बऱ्याच रात्री पर्यंत फिरलो. हुमायू टॉम्ब ला एक ग्रुप फोटो काढला होता तो कोणाजवळ असेल तर पोस्ट करा. देशपांडे आणि इनामदार सर एकदम रॉयल होते अगदी मुलांसारखे होऊन गप्पा मारायचेत आणि या गप्पातूनच त्यांनी शेअर्स ची अमूल्य दिक्षा दिली आणि १९८४ पासून मी शेअर इन्व्हेस्टर बनलो.


दिल्लीला बहुतेक सर्वाना प्रथमच जयपूर येथे जाण्यासाठी विमानात बसायचा योग आला त्यावेळी फक्त्त ३०० रुपये तिकीट पडले होते.फक्त्त २५,३० मिनिटांचा प्रवास होता. सकाळी ५.३० ची फ्लाईट होती. एक दिवस स्थळदर्शन करून दुसऱ्या दिवशी परतलो.


जयपूरला चक्क विमानतळावर,अभिनेता सुनील दत्त भेटले होते. उदय अगदी त्यांचे शेजारी बसला होता..आम्ही मित्रांनी त्याचे बरोबर फोटो काढले. जयपूरला सिटीपॅलेस, आमेर फोर्ट आदी सर्व स्पॉट पाहिलेत. रात्री मुक्काम इंजिनीरिंग कॉलेज मध्ये होता. जयपूरला घेललेली स्टील जंबो पेल्यातील, घमंडी लस्सी प्रथमच अनुभवत होतो. संपता संपत नव्हती.. डिसेंबर असल्याने थंडी जबरदस्त होती.


जयपूरहून दिल्लीला आल्यावर हरिद्वार तेथे रुडकी येथे भूकंप लहरीचा अभ्यास वर्ग होणार होता. हरिद्वारला, गंगेत  गोठावणाऱ्या थंडीत पाण्यात मारलेली डुबकी शहारे आणणारी होती. रुडकी येथे अभ्यासवर्ग?...दोन तासात आटोपला आणि आम्ही ऋषिकेशला.. जायला मोकळे झालो .


लक्ष्मण झुला येथील काही व इतर (Hotshot या त्यावेळच्या नुकत्याच नवीन निघालेल्या कलर कॅमेराने काढलेले ) फोटो पोस्ट करतो आहे ते स्पष्ट नाहीत.. आणि कॅमेराच्या या गुणधर्ममुळे तो कॅमेरा ही पुढे डब्यात गेला. फोटो कसेही आले तरी मी मात्र सुवर्ण क्षण म्हणून जपून ठेवले आहे.


ऋषिकेश येथे सर्व मंदिरे फिरल्यावर लक्ष्मण झुल्याच्या बँकग्राऊंड काढलेला सर्वं मित्रांचा फोटो..चोटीवाला या धाब्यावर सूंदर जेवण मिळाले. मनसादेवीला रोपवेने वर गेल्यावर गंगेच विस्तीर्ण पात्र अचंबित करणार होत.


गंगा नदीत, गावातल्या तापी नदीवरच्या सवयी प्रमाणे,तीन टप्प्यात दगड भिकावत होतो तेव्हा...


"गंगाजीको मार रहे हो, कहा पाप फेडोगे "


अशा एक आजी म्हणाल्या.तिथे असलेल्या सर्वांसाठी गंगा ही आराध्य दैवत होती. आमचे दगड मारणं थांबलं आणि सर्व भारतीयांच्या मनातील गंगेचे पवित्र रूप आमच्या समोर आलं..... आणि त्या जीवनदायिनी पुढे आम्हीही नतमस्तक झालो.


संध्याकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हरी की पौडी येथे भावपूर्ण गंगा आरती पाहून धन्य झालो.हरिद्वार येथील अनेक सुंदर मंदिर बघून त्या वयातही देवा बद्दल आस्था व विश्वास जागृत झाला, सर्वं देवांना नमन केले, आणि या गावाला का हरिद्वार म्हणतात, त्याचा बोधही झाला. उद्या डेहराडून मसूरी येथे जाणार आहोत... चलताय ना रोपे वे मध्ये बसायला!!...तर जाऊया...मसुरी, जिमकॉरबेटच्या अविस्मरणीय जंगलसफारीला....


थ्री इडियट्स मध्ये तीनच वेडे दाखवले असले तरी आमच्या अभियांत्रिकी सहजीवनात मध्ये सर्वंच होते.


मैत्री आणि ती निभावण्याबाबत.


योगायोग बघा... एकदा शिव्यांची यादी लिहितांना , वर्गात चिठ्ठी फिरतानाही पहिला शब्द अजाणता मूर्ख लिहिला होतो आणि उरलेले सर्वं हुशार पण मैत्रित ठार वेडे असे सर्वं मित्र होते.. त्यांनी नेहमीच एकमेकांना शंभर टक्के साथ दिली होती.


मला तरी या सहजीवनात कॉलेज मध्ये व्हायरस व्यक्तीरेखेची समरूप व्यक्तिमत्व दिसले नाही.


पढतमूर्ख व्यक्तिमत्वास चतुर नाव देण्याची विरोधाभासात्मक कल्पना दिग्दर्शक राजकुमार हिराणींची झकासच ...


सिनेमांत दर्शवल्या प्रमाणे चतुर आमच्यात असा कोणीही नसला तरी या उत्तरभारताच्या ट्रिप मध्ये, त्या अर्थाने खेचखेची करताना असा "चातुर्याचा फिरता मुकुट " रोज कोणा न कोणावर चढवला जायचा. तो ही तो आनंदाने स्वीकारायांचा.. आणि माझा चतुर बनवायचा नंबर केव्हा लागतो... याची सर्वांना आतुरता असायची!!


त्या वेळा तो सिनेमा रिलीझ झाला नाही, नाही तर "चतुर" या शब्दाचा वापर कल्पकतेने सढळ पणाने झाला असता.


"पर्यटनातून सिनेमांत दर्शविलेला चतुर, न  बनण्याचे चातुर्य शिकण्यासारखे मिळते हे मात्र खरे!"

आlता गाडीतून जातांना खिडकीतून बाहेर बघातानाचे येणारे मनातले अवांतर विचार बंद करतो गाडी रुळावर आणतो.

अरे! चला..डेहराडून..आलं वाटतंय,!!


देहाराडून सकाळी पोहचल्यावर सरांनी सर्वांना मसुरीला जाण्या साठी तेथील लोकल ट्रान्सपोर्ट ने आम्ही निघालो वळणावळणा चा ४५ मिनिटात निसर्ग रम्य रस्ता संपूच नये असे वाटत होते. मसुरीला पोहचल्यावर तेथील सर्वोच्च पॉईंट लालटीब्बा वर पोहचल्यावर आयुष्यात सर्व प्रथम हिमालयाच्या बर्फ आच्छादित शिखराचे दर्शन झाले...बहुतेक सर्व मित्र प्रथमच बघत होते त्या नगाधिराजाला.


हिमालयाची भव्यता विस्फारलेल्या डोळयांत मावत नव्हती,.. त्याचे भव्यतेपुढे, आपण किती क्षुल्लक आहोत..याचीही जाणीव झाली.


या सुंदर ठिकाणी हिमालयाच्या बँकग्राऊंड वर उदय ने माझा, "असा उभा रहा?..हात कमरेवर तर दुसरा डोक्या मागे घे.. एक पाय पाईपा वर ठेव "..आदी सर्वं सूचना देऊन काढलेला व इतर फोटोही सोबत जोडत आहे.थंडी खूप असली तरी जवळपास १००० फूट उंच चढ चढून आलो होतो, कॅमेलबॅक पॉईंट, रोपवे पर्यंत  त्यावेळी रोप वेने वर जाऊ शकलो नाही... पण मालरोड वर मनमुराद भटकंती करून तेथे जेवण करून परत... रात्री पर्यत बॅक टू बोगी... डेहराडून रेलवे स्टेशनं.


उद्या काठगोदामला जायचा प्लॅन थोडा बदलला होता. गाडी चुकल्यामुळे नैनिताल राणीखेत ऐवजी जिम कॉरबेट येथे जायचे नियोजन झाले आणि आम्ही रामनगर येथील स्टेशनंच्या फलटावर बोगी लागली, त्या आधी मुरादाबाद स्टेशनं वर बराच वेळ गाडी जवळपास तीन तास थांबणार असल्याने आम्ही तेथील स्टेशनं जवळचे ब्रास आर्टिकलस चे मार्केट फिरता आले..j


रामनगरला पोहचताना उशीर झाल्याने आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जिम कॉरबेट ला जायचे ठरले. दुपारी एक पासून पूर्ण दिवस खाली होता


आम्ही मित्रांनी रामनगरला संध्याकाळी "सॅव्हेज हार्वेस्ट" हा इंग्लिश सिनेमा बघितला. त्याचे संक्षिप्त कथानक असे होते.


"आफ्रिकेत खूप दुष्काळ पडतो.... प्राण्यांना खायला गवत उरत नाही सर्व शाकाहारी प्राणी नष्ट होता त्यामुळे जंगलात सिंहाना खाण्यासाठी कोणी उरत नाही आणि ते मनुष्य प्राण्याकडे मोर्चा वळवतात... आणि एक यूरोपयन कुटुंबावर काय बितते ...त्याचे अत्यंत सूंदर वास्तविक चित्रण सिंहाचा होणारा हल्ला खोटा असला,...तरी बघताना ही भिती वाटत होती आणि जीव वाचवंतांना त्यांना स्वतः ला सिंहाच्या पिंजऱ्यात कोंडून घ्यावे लागते.. सिनेमा बघितला नसेल तर जरूर बघा. स्टोरी पूर्ण सांगण्याचे कारण पुढे आहे.."


तो सिनेमा हादरवणारा होता... रात्री दोन वेळा दचकून जागही आली....काही नसल्याची खात्री करून परत बोगीत झोपी गेलो.


दुसऱ्या दिवशी बसने जिमकॉरबेटच्या जंगलात निघालो *ढिकाला* येथील जंगला च्या मधोमध असलेल्या रामगंगा बॅक वॉटर जवळील सरकारी विश्रामगृहात आमची निवासाची सोय केली होती. रात्री तेथेच जंगलात मुक्काम होता. जशी बस व्याघ्र अभयराण्यात शिरली तसा, बस मध्ये मागे बसलेल्या व एका साईडच्या खिडकी जवळ बसलेल्या काही भाग्यवंत मित्रांना एक वाघ बस जात असताना मागे क्रॉस झाला... जिमकॉरबेट ला आल्याचे सार्थक झाले... काहींना व्याघ्रदर्शन झाले होते ... इतरांना मात्र व्याघ्र मित्रांना पाहून समाधान मानावे लागले. हरण, सुंदर पक्षी,मोर,ससे, कोल्हे आदी सर्वं प्राणी मुबलक होती. जंगलाच्या मधोमध असलेले ब्रिटिश कालीन रेस्ट हाऊस हे काळाच्या युरोपयन कुटुंबाच्या घरा सारखे भासत होते.. तेथे पोहचता..पोहचता चार वाजले होते. येतांना रामगंगा नदीचे बॅकवाटर आणि तेथे आलेला स्थलांतरित पक्षाचा थवा असे नयनरम्य दृश्य नजरेत साठवून आलो होतो.


तरीही आल्यावर, संध्याकाळी आम्ही जवळपास जंगलात फेरफटका मारला, काही अंगात वाघ आलेल्या वीर मित्रांनी अगदी वाघासारखे जमिनीवर पालथे होऊन वाहणाऱ्या स्वच्छ निर्झरात जलपान करताना चा फोटो होता.. पण आज सापडला नाही.


रात्री जेवण झाल्यावर कॅम्प फायर केले होते.रात्र भर......धूम मजा चालू होती. सर सुध्दा सामील होते. ते झोपायला गेल्यावर गेल्यावर मात्र पूर्ण मोकळीक होती...


थंडी मी म्हणतं होती, पण तरी झोपायला आत जायला कोणी तयार नव्हते.. बहुतेक परत रात्रीचा दिवस करायचा साऱ्याचा प्लन होता जोक्स, गाणे, नाच यांचा सर्व मनोसोक्त आनंद घेत होते, आणि मजा करत होते.रात्रीचे बारा साडे बारा वाजले होते... आणि जवळच असलेल्या मेंदी मागे,...हालचाल दिसली,..अगदी विस तीस फुटावरून.... वाघाच्या डरकाळ्या... अगदी कालच बघितलेल्या सिनेमाप्रमाणे ऐकू आल्यात....


सर्वं जण पाय...आपापल्या योग्य ठिकाणी लावून जोरात..जे पळाले...ते रेस्ट हाऊस मध्ये आल्यावर थांबले ... दरवाजा खिडक्या बंद केल्यात..आणि मी झोपण्याचा प्रयत्न करीत होतो.. पण ती येत नव्हती.


अगदी कालच बघितलेल्या त्या सिनेमांत अनुभलेलं टेन्शन... त्या रात्री पुनः जिवंतपणे अनुभवत होत...


चौकीदार तेथेच रहात होता तो मात्र निर्वीकार होता.. त्याचे साठीचा हा अनुभव नेहमीचाच होता.


वाघाच्या झोपेत..आम्ही व्यत्यय आणल्या बद्दल त्यांनी नाराजी डरकाळ्या फोडून व्यक्त केली होती आणि त्या काळ्याकुट्ट रात्री परत निरव शांतता पसरली आणि रात्कीड्यांचा आवाज परत त्या शांततेचा भंग करत होता.

पहाटे दोन.. तीन तास झोप लागली असेल.. तोच सहा वाजता.. परत मित्रांनी, परत निघायच्या आधी जंगलात फिरायची टुम काढली. जयदीप,उदय मी उत्तम,प्रदीप,संजय आणि विद्याधर फिरायलाही निघालो...कुठे पानांची थोडी जरी सळसळ झाली तर भिती वाटायची. दोन तास चालून परत नऊ पर्यंत परतलो न बस मध्ये बसलो..

परत सकाळी १० पर्यंत रामनगर येथे बोगी वर, रात्री १० ला गाडी सुटणार होती आम्ही झोपी गेलो..पण आपला निसर्ग मित्र प्रकाश तेव्हाही मला, नैनिताल दूर नाही आपण जाऊया.. असा आग्रह करत होता. आम्ही दाद लागू न दिल्याने तो आणि एक जोडीदार नैनिताल लेकला फेरफटका मारून व रोपवेने नैनिताल दर्शन घेऊन, मुरादाबादला, रात्री एकला आमच्या बोगीत परत आले.तेव्हापासूनचे त्याचे निसर्गप्रेम अजूनही तसेच किंबहुना जास्तच वाढले आहे.आम्ही दिल्लीत पोहचलो.. रात्री पठाणकोटला आमची बोगी लागणार होती उदय मात्र त्याच्या जबलपूरच्या काकांकडे जाण्यासाठी इटारसी ला उतरणार होता त्याचा इटारसी स्टेशनं वरचा टाटा करतांना चा ग्रुप फोटो काढून फोटो रिलाने निवृत्ती जाहीर केली.फोटो मात्र जोडत आहे. मी भुसावळ येथे उतरलो आणि सर्वं,

आपापल्या घरी सुखरूप पोहचले..या आयुष्यभर जपण्यासाठीचा .. पंधरा दिवसाच्या मोठया आनंदाचा ठेवा घेऊनच!!! .



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics