kanchan chabukswar

Crime

3  

kanchan chabukswar

Crime

ब्रेकफास्ट सर्जरी

ब्रेकफास्ट सर्जरी

4 mins
531


डीएसपी इनामदार यांना प्रश्नच पडला होता राजीव नगरच्या डॉक्टर देशमुख यांच्या हॉस्पिटल बाजूच्या कचराकुंडीमध्ये रोज, रोज काळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले अर्भक किंवा त्यांचे हात पाय आढळून येत होते.


डॉक्टर देशमुख एक निष्णात शल्यविशारद, आणि त्यांची पत्नी डॉक्टर मेधा या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. आणि ते दोघं तर दोन महिन्यासाठी अमेरिकेला गेले होते.


डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर मेघा कुठलंही अवैध काम करत नसत, इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांचा चांगलाच जम बसला होता, आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये डॉक्टर प्रसिद्ध होते आणि त्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जायचं.


काहीतरी घोटाळा होत होता म्हणून इनामदारांनी डॉक्टर देशमुख यांना सरळ फोन लावला.


डॉक्टर देशमुख यांचा दूरचा नातेवाईक डॉक्टर विकास सध्या हॉस्पिटल चालवत होता. डॉक्टर विकासची पत्नी डॉक्टर मीना ही पण स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यामुळे तिची हॉस्पिटलमध्ये आवश्यकताच होती.


डॉक्टर देशमुखांना तर विकास आणि मीनावरती अतिशय विश्वास दिसत होता. पण कुठे तरी पाणी मुरत होतं.

डॉक्टर विकासने त्याचा मित्र डॉक्टर सुरज यालादेखील हॉस्पिटलच्या कामात मदत करण्यासाठी बोलावले होते. तसं बघायला गेलं तर विकास आणि सुरज कसेतरी डॉक्टर झाले होते. त्यांच्या वडिलांनी भरपूर पैसे चारून त्यांना डॉक्टर केलेले होते. आणि आता त्यांना ते पैसे परत मिळवायचे होते.


देशमुखांचे हॉस्पिटल चालवण्याची आयतीच संधी विकास आणि सुरज यांच्याकडे चालून आली. सगळ्यात आधी डॉक्टर विकास आणि मीनाने आधीच्या पेशंटच्या फाइल्स धुंडाळून काढल्या.आणि त्यांचा बेत ठरला.

  

विकास आणि सुरजच्या कामांमध्ये त्यांचा मित्र निखिलदेखील सहभागी झाला. कुठलाही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यास निखिल त्याचा एक्स-रे काढत असे. एक्स-रे मध्ये रुग्णाला हमखास किडनी स्टोन आहे हे दाखवण्यात येई.


किडनी स्टोन बऱ्यापैकी मोठा दाखवून विकास आणि सुरज घाईघाईने ऑपरेशनची तयारी करत. त्यांच्या या कामांमध्ये हॉस्पिटलच्या नर्सचा देखील सहभाग होता.


आश्चर्याची गोष्ट म्हणजे अचानक लोकांना किडनी स्टोन का बरं व्हायला लागले? असा प्रश्न देखील लोकं विचारायला लागले.


डॉक्टर मीना, तिने पण आपला जम बसवला. पाय घसरलेल्या मुलींना सोडवण्यासाठी तिने सर्रास गर्भपाताची ऑपरेशन करण्यास सुरुवात केली. स्वतःची प्रतिमा मलिन होण्यापासून वाचवण्यासाठी मुलींचे पालक हवे तेवढे पैसे देत असत. आणि सगळा काही चुपचाप चाललेला कारभार होता. पाय घसरलेल्या किंवा कुंटणखान्यातील मुली मीनाच्या क्लाइंट होत्या...


गर्भपाताचं व्यसन जडलं की मीना चांगल्या स्त्रियांचेदेखील गर्भपात करायला लागली, गर्भ मुलीचा असो की मुलाचा, डॉक्टर मीना आता सगळ्यांचाच गर्भपात करायला लागली होती.


रोज सकाळी नऊ ते अकरा ऑपरेशन्स चालू लागले.


शेवटी इनामदारांनी आपल्याकडचे पोलिस ऑफिसर, तपासासाठी, देशमुख हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्यांचे निवडक चार ऑफिसर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पेशंटचे नातेवाईक म्हणून बसले.


लाल दिवा लागला आणि ऑपरेशन सुरू झाले. झाले दहा मिनिटातच सगळे पोलिस ऑफिसर ऑपरेशन थिएटरमध्ये घुसले.


बघतात तर काय!!!!!.

.

.

.


डॉक्टर सुरज आणि डॉक्टर विकास हे चक्क नर्सेसबरोबर बाजूच्या टेबलवरती बसून ब्रेकफास्ट करत होते.


ऑपरेशन टेबलवरती पेशंट आडवा पडलेला होता, तो बेशुद्ध होता. त्याच्या पोटाला तीन ठिकाणी थोडीफार भोकं पडलेली होती आणि त्याच्या वरती बँड ऍड लावून ठेवलेलं होतं. सलाईनची बाटली नुसती टांगलेली होती पण पेशंटला सलाईन वगैरे काहीही दिलेलं नव्हतं.


ऑपरेशन थिएटर मध्ये ब्रेकफास्ट?


डॉक्टर विकासच्या बाजूला एक छोट्या काचेच्या बाटलीमध्ये एक छोटासा दगड पण तरंगत होता जो मेड टू ऑर्डर होता.


पोलीस आतमध्ये घुसलेले बघून सुरुवातीला ते दोघेजण घाबरले, सारवासारव करत म्हणाले की, "ऑपरेशन झाले, हा बघा किडनी स्टोन."


दहा मिनिटात ऑपरेशन? सगळं काही आश्चर्यजनक असं होतं.


बाजूच्या थिएटरमध्ये डॉक्टर मीना खोबरं खवल्यासारखी गर्भपात करत होती. टेबलवरची मुलगी तर चौदा-पंधरा वर्षाची दिसत होती.


म्हणजे हे सगळं अवैध चालू होतं.


या दोन महिन्यांमध्ये मुलींच्या गर्भपाताच्या वेळेला, दोघी मुलींना अति रक्तस्त्रावामुळे जीव पण गमवावा लागला होता.


सगळं प्रकरण दडपून टाकण्यात आले होते. नाहीतरी मुली वाकड्या वाटेवर वळल्या होत्या आणि त्यांच्या पालकांना पण त्या नकोशा झाल्या होत्या.


डॉक्टर सुरज आणि डॉक्टर विकासने निखिलवरती आरोप टाकले, निखील काढत होता एक्स-रे.


डॉक्टर देशमुख यांच्या आधीच्या पेशंटच्या हिस्टरीमध्ये बघून त्यांनाच पुनर्तपासणीसाठी बोलावून खोटे ऑपरेशन केले जात होते. अर्थात डॉक्टर आणि डॉक्टर विकास जणूकाही पेशंटच्या जीवाशी, पेशंटच्या विश्वासाबरोबर खेळत होते

.......

सगळ्या डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आणि नर्सेसना देखील. कारण त्यांचा पण तेवढाच सहभाग होता. एक्स-रे काढणाऱ्या निखिललादेखील अटक करण्यात आली, स्वतःचे हात झटकत डॉक्टर विकास आणि डॉक्टर सुरजने निखिलवरती पूर्णपणे आरोप टाकले की निखिलच एक्स-रे काढून पेशंटला त्यांच्याकडे पाठवत होता.


असे सांगितल्यावरती पोलीस ऑफिसर एक्स-रे रूममध्ये गेले. तिकडे त्यांना जे काय दिसलं त्याच्यामुळे त्यांना आश्चर्याचा फार मोठा धक्का बसला.


रुग्णाच्या स्ट्रेचरच्या खाली निखिल बेमालूमपणे एक मॅग्नेट लावून टाकत असे, एक्स-रे मध्ये मॅग्नेट जणूकाही किडनी स्टोन आहे असाच दिसत असे. एक्स-रे च्या टेबलखाली तसं मॅग्नेट लावून किडनी स्टोन असल्याचा आभास प्रत्येक वेळेस निखिल करत होता.


डॉक्टर विकास आणि डॉक्टर सुरेशच्या ब्रेकफास्ट सर्जरी जोरदार चालत होत्या. पण अजिंक्य इनामदारांच्या सावधपणामुळे बऱ्याच रुग्णांचे प्राण तर वाचले, बऱ्याच लहान मुलींचीदेखील सुटका झाली.


फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांच्यावरती केस करण्यात आली. डॉक्टर मीनाचा अपराध अक्षम्य होता.


कोर्टामध्ये खटला उभा राहिला, न्यायाधीश साहेबांनी निर्णय देताना सांगितले, एवढ्या मेहनतीने घेतलेली डॉक्टरची डिग्री, आणि पेशंटची सेवा करण्यासाठी घेतलेली शपथ या सगळ्याचा अपमान डॉक्टर विकास आणि डॉक्टर सुरज, डॉक्टर मीनाने केला होता. त्यामुळे ते डॉक्टर अशी उपाधी लावण्यासाठी लायक राहिले नाहीत.

निखिलनी थोड्याशा पैशासाठी आपलं स्वत्व विकून टाकलं होतं.


विकास आणि सुरेशला जबरदस्त दंड भरून मोकळीक मिळाली मात्र मीनाची डॉक्टरची डिग्री रद्द करण्यात आली.


डॉक्टर देशमुख जेव्हा हिंदुस्थानात परत आले तेव्हा त्यांना धक्यावर धक्के बसण्याचे बाकी राहिले होते. विश्वास टाकून विकासला आपले हॉस्पिटल सांभाळण्यासाठी दिले होते आणि त्याने तर वाम मार्गावर चालून सगळ्यांना लाज आणली होती.


कितीतरी डॉक्टर्स स्वतःच्या तब्येतीकडे न बघता रुग्णसेवा करत असतात, दिवसातले 14-14 तास काम करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करत असतात पण काही डॉक्टर असे पण असतात जे रुग्णसेवा कडे पैसे कमावण्याचे साधन म्हणून बघतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime