kanchan chabukswar

Crime

4.0  

kanchan chabukswar

Crime

बनाव

बनाव

12 mins
243


नाक आणि डोळे लाल लाल झालेली, चेहऱ्यावरती चिंताक्रांत मुद्रा घेऊन, संचित मनाने मिलिटरी ऑफिसर समोर बसलेली स्मृती मागच्या तीन महिन्यातील घडलेल्या घटना एकेक करून सांगत होती. मिलिंद नि शेवटी मिलिटरी कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट जिंकून देवळाली कॅम्पच्या बाहेर मिलिट्री बरोबर संलग्न असे कॅन्टीन चालू केले होते.  मिलिंद ला शेवटी स्मृती ने हो म्हटले होते, आणि त्यांचा धूमधडाक्यात साखरपुडा झाला होता. एक एक घटना सांगताना आता स्मृती ला, तिच्याबरोबर घडलेला बनाव नजरेसमोर आला.


चौकशी सतरातले मेजर राठोड, आणि मेजर देसाई जरी तिच्या वडिलांचे मित्र असले तरी कोणीही तिला मदत करणार नव्हते. पण तिचा स्वतःवरती पूर्ण विश्वास होता की तिने काहीच गुन्हा केलेला नाही. स्मृतीने पहिल्यापासून सगळं सांगायला सुरुवात केलं. नयनरम्य देखाव्याचे फोटो काढत स्मृति त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला बसली होती. हॉटेल सागर माथा गावापासून जरा दूर आणि आजूबाजूच्या घनदाट झाडीने वेढलेले होते. तिथे येणारे फुलपाखरू, काही छोटे पक्षी, छोटे छोटे प्राणी, जणू काही त्यांना अभयारण्य मिळाल्यासारखे बागडत असत. या निसर्गाच्या कुशीमध्ये फोटो काढण्याची फार सुंदर संधी नेहमीच स्मृति घेत असे. श्रुती आणि स्मृती दोघी जुळ्या बहिणी, दोघांनाही सारखीच आवड, पण आज मात्र स्मृती एकटीच सागरमाथा च्या बागेमध्ये हिंडत होती. बागेच्या उंच कट्ट्या वरती जाऊन, ती आजूबाजूच्या परिसराचे शांतपणे फोटो काढत होती, तेवढ्यात तिचा फोन वाजला.

" मी पोहोचतोय, पाच मिनिटे लागतील." मिलिंद चा फोन

" सावकाश ये" स्मृति


चला तर, मिलिंद येऊ पर्यंत अजून पाच मिनिटे आहेत, तेवढ्यात चांगले चांगले फोटो काढून घेण्याची संधी स्मृतीला आली होती. मस्त ग्रीन कलर चा टी-शर्ट आणि त्याच्या खाली जीन्स, व्यवस्थित बांधलेले पण अलवार सुटलेले असे कुरळे केस पिंगट केस, मोठे मोठे डोळे, सावळा सतेज रंग, उंच आणि कमनीय बांधा, अशी स्मृती एम एस सी बायलॉजी करत होती. तिला फोटोग्राफीचा, आणि योगासनाचा छंद त्यामुळे मित्रमंडळ पुष्कळ वाढलं होतं. वडील मेजर सुभाष कुलकर्णी, सीमेवरील नेहमी चाललेल्या युद्धामध्ये जखमी होऊन घरी परत आले होते, त्यांच्यावर ती मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. आई सीमा, दोघी मुलींना धाडसाने एकटी वाढवत होती. दोघींचा भाऊ अमर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाच्या सेवेत एअर फोर्समध्ये रुजू झाला होता. त्यामुळे घरी फक्त सीमा, श्रुती आणि स्मृती.


खरं म्हणजे जरी लग्नाचं वय असलं तरी मिलिटरी कॅम्पसमधल्या मुली मिलिट्रीमधलाच कोणीतरी शूर जवान आपला जीवनसाथी म्हणून पत्करत. साध्या माणसांविषयी त्यांना आकर्षण वाटतच नसे, कायमच्या ताणतणावामुळे सीमाने स्मृतीचे अरेंज मॅरेज करायचे ठरवले होते. कधी कधी बोलताना ती म्हणे," रोजच्या टेन्शन च्या ऐवजी एखादा तरी नातेवाईक नऊ ते पाच नोकरी करणारा असला तर जास्त बरं होईल, त्याचा बिझनेस असला तरी चालेल, पण रोज रात्री तो घरी येईल याची खात्री पाहिजे." खरं म्हणजे एकदा तिने वैतागून असं म्हटलं होतं, पण स्मृतीच्या ते पक्क लक्षात राहील. खरं म्हणजे त्यासाठी मिलिंद तिला भेटायला येत होता. गार्डन वरच्या उंचवट्यावर ती स्मृती उभी राहून उडणार्‍या फुलपाखरांची फुलपाखरांचे फोटो काढत होती,

"हॅलो" मिलिंदने आवाज दिला,


फोटोतल्यापेक्षा मिलिंद जरा वेगळा दीसत होता, कमरेवरच्या पट्ट्यावरून बाहेर आलेले पोट नजरेत खुपत होते, अंगावरती श्रीमंती ओसंडून वाहत होती, भरलेली मान, भरलेले गाल, सुदृढपणाचे, दर्शन घडवत होती. मिलिटरी कॅम्पसमध्ये असल्यामुळे स्मृतीला कायम एकदम तंदुरुस्त आणि फिट असलेले जवान नजरेसमोर येत असत, त्यांच्यापुढे मिलिंद म्हणजे मुरमुर्याचा पोतं वाटत होता. ठीक आहे याला आपण भेटून घेऊ, स्मृती मनात

म्हणाली. वरवरच्या गप्पांमध्ये मिलिंद स्वतःबद्दल जास्त बोलत होता, कसे त्याचे विविध ठिकाणी चहाचे स्टॉल, मोक्याच्या ठिकाणी उभे असलेले कॉफी हाऊस, शहरामध्ये तीन ठिकाणी असलेले रेस्टरा, आणि शहराच्या बाहेर असलेला रिसॉर्ट. स्वतःच्या बिजनेस बद्दल मिलिंद भरभरून बोलत होता, स्मृतीने जर लग्न झाले तर पुढे काय करावं याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं, फक्त तिने कुटुंबाच्या मर्यादा सांभाळत सणवार रीतीभाती याच्या कडे लक्ष दिले पाहिजे, मिलिंद या अपेक्षा फारच माफक होत्या, त्याचं कारण म्हणजे त्यांनी वाढवलेला बिजनेस. घराकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळच नव्हता, त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्याची होणारी बायको सांभाळू शकेल अशी त्याची अपेक्षा होती. अतिशय हुशारीने आणि मेहनतीने मिलिंद न स्वतःचा बिझनेस वाढवला होता.


स्मृतीने सहज विचारले," तुला तर माझ्या पेक्षाही सुंदर आणि तुझ्या कुटुंबाच्या चौकटीत बसणारी मुलगी मिळू शकेल, मग तुला माझ्यामध्ये असे रुचि का वाटते?"


मिलिंद एकदम गंभीर झाला," आजोबा मिलिटरी मध्ये होते, आजीचा ताणतणाव कुटुंबाने जवळून बघितला होता, त्यामुळे आईने कुठल्याही मुलाला मिल्ट्री च्या वाटेला देखील जाऊ दिले नाही." मिलिंद म्हणाला.

 

मनामध्ये कुठेतरी आजोबां बद्दल आदर आणि मिलिटरी च्या लोकांबद्दल अतिशय उत्सुकता आणि प्रचंड आदर असल्यामुळे मिलिंद ने मनांशी ठरवले होते, कुठल्या ना कुठल्या कामाने मिलिट्री बरोबर संबंध जोडून घ्यायचा, मिलिटरी कॅन्टीन साठी देखील त्याने टेंडर भरले होते आणि त्याचा जोरदार प्रयत्न चालू होता. त्याचे बाकीचे कुठेस हॉटेल्स, स्टॉल्स, कॉफी हौसेस त्याच्यासाठी उत्पन्नाचे भरपूर मोठे साधन होते, पण मनामध्ये असलेला आजोबां बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तो मिलिटरीमध्ये पण काम करायला तयार होता. स्मृतीला ही कल्पना फार आवडली, की प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्षपणे जर कोणी मिलिटरी बरोबर जोडू शकत असेल तर तो आपला जोडीदार जरूर होऊ शकेल.


घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणेच सीमाने खोदून खोदून चौकशी केली, मिलिंद बाकी सर्व दृष्टीने बरोबर होता, परंतु स्मृतीला काही फारसा मनात भरला नव्हता. मेजर सुभाष न बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घरी आले होते, सुभाष यांच्या पायाच्या जखमा लवकर भरून येत नव्हत्या, त्यामुळे त्यांचे चालणे दुरापास्त होऊन बसले होते. हातावर, छातीवर, पायावर असलेल्या गोळ्यांच्या जखमा त्यांना त्रास देत होत्या.

" आमच्या जखमा या आमच्या छातीवरचे मेडल्स आहेत." सुभाष नेहमी हसून म्हणत.


विविध मॅट्रिमोनिअल साइटवरून चाललेले वरसंशोधन त्यांना दिसत होते, सीमा चे म्हणणे जरी त्यांना पटत होते तरी मुलींनी मिलिटरी च्या बाहेर लग्न करणे त्यांना फारसे पटत नव्हते.

ते नेहमी म्हणत," शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात, ही वृत्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या देशाचे भविष्य ठीक नाही."


स्मृती आणि श्रुतीने स्वतःचे काहीही मत व्यक्त केले नव्हते. योग्य संधीची वाट बघत होत्या. नेहमीप्रमाणे शनिवार रविवारी श्रुती आणि स्मृती फोटो काढायला डोंगरावरच्या उंचवटे कडे गेल्या, त्यांचं नेहमीचच रस्ता आणि नेहमीच प्रोग्राम, दरवेळेला जाताना आणि येताना 1,2 मोटरसायकल पास व्हायच्या, मिलिटरी कॅन्टोन्मेंट जवळचा रस्ता असल्यामुळे धोका काहीच नव्हता, असेच दोन महिने गेले, वरसंशोधन तर जोरात चालू होतं पण अजूनही स्मृतीला कोणीही पटलं नव्हतं. मिलिंद च्या घरून तिला वारंवार विचारणा होत होती, मिलिंद च स्थळांमध्ये वाईट काहीच नव्हतं, पण स्मृतीने अजून काहीच निर्णय पक्का केला नव्हता.


श्रावणातले दिवस होते, फुले उमललेली असल्यामुळे भरपूर फुलपाखरं फुलांवर ती बागडत होती. दोघी बहिणी आपले आपले कॅमेरे घेऊन जंगलाच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. पण सुट्टीच्या दिवशी जंगलाचा रस्त्याला भरपुर गर्दी होती त्याच्यामुळे त्या दोघींनी आता सप्ताहाच्या एखाद्या दिवशी जाण्याचे ठरवले. पण त्या दिवशी अघटित घडले. भरपूर फोटो काढून झाल्यावर जेव्हा सुट्टी गाडी सुरू करण्यासाठी आली, तेव्हा त्यांची गाडी काही सुरू होईना. स्मृतीने धक्का मारुन बघितले, बॉनेट उघडून बघितले, कुठे काही वायर सुटल्याचे दिसत नव्हते. बरं पेट्रोल टाकी मध्ये पेट्रोल पण होते. मग काय झाले? दोघींनाही प्रश्न पडला. दुपार टळून गेली होती, ज्या बाजूला त्या होत्या तिकडे अगदी शुकशुकाट होता. फोनची रेंज पण जात नव्हती. शेवटी गाडी लॉक करून, दोघींनी चालायला सुरुवात केली. अचानक झाडांच्या मागून काही माणसांचा बोलायचा आवाज आला. मदतीसाठी म्हणून हाक मारावी असे ठरवून स्मृती पुढे गेली तर तिला श्रुतीने हाताला धरून खसकन मागे ओढले. तिच्या तोंडावर हात ठेवून तिने गप्प बसण्याची खूण केली. कोण कुठली माणसं, आपल्या कसा गैरफायदा घेतील अशी चिंता श्रुतीला वाटत होती.


नीट निरखून बघून श्रुतीने आपल्या कॅमेराने झूम करून तिथे उभ्या असणाऱ्या माणसांचा फोटो काढला. निरखून बघत असताना त्यातला एक माणूस मिलिंदसारखा दिसला. श्रुती आणि स्मृती दोघेही त्र्यंबकेश्वरच्या डोंगरांमध्ये फोटो काढायला जातात हे मिलिंदला पक्के माहित होते, कारण स्मृती ने त्याला सांगितले होते. कदाचित आपल्या पाठीमागे तो पण आला असेल असे वाटून मिलिंदचे तिथे असणे स्मृतीला गैर वाटले नाही.

तरीपण श्रुती आणि ती लपत छपत झाडाच्या मागून त्या माणसांच्या जवळ गेल्या,

"लडकी को पटाया या नही? कर क्या रहे हो अभी तक?" कोणीतरी रागवून दुसऱ्या माणसाला विचारत होत.

"मै तो बहुत प्रयास कर रहा हू, मेरी मा बाप हर हप्ता फोन करके रहे है लेकिन ऐसा है की लडकी जवाब नही दे रही." हा आवाज मिलिंद चा होता.

कोणाबद्दल बोलतो आहे? श्रुती ने स्मृती कडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. या चौघांपैकी दाढीवाले आणि राकट दिसत होते, त्यांच्या बोलण्याच्या लहेजावरून ते हिंदू वाटत नव्हते.


"देख बेटा, अभी तो मैने उसकी गाडी बंद की है, हमने गाडी मे समान भी रखा है, ऐसा कर गाडी ठीक करने के बहाने दोस्ती बना ले. तेरे पास सिर्फ आठ दिन का वक्त है." त्यापैकी एक दाढीवाला माणूस अतिशय उर्मट आवाजात बोलत होता.

"काम हो जाना चाहिए," परत परत मिलिंदला कोणीतरी धमकी देत होता.


आता मात्र दोघीजणी घाबरल्या, गाडी तिथेच सोडून, जंगलाच्या रस्त्याने त्या धावत सुटल्या. जाणून बुजून त्यांनी पायवाट पकडली. पाच मिनिटे धावल्यानंतर अचानक त्यांना समोर असलेल्या दोन गाड्या दिसल्या, त्यापैकी एक मिलिंदची होती. याचा अर्थ तो मुद्दामच तिथे आला होता.

समर आणि सतीश जंगलाच्या रस्त्या कडून नेहमीचा राऊंड घेताना त्या बाजूला आले होते. डोंगरावरती जंगलामध्ये बंद पडलेली गाडी त्यांना दिसली होती पण गाडीपाशी कोणीच नव्हत. दूरवर कोल्हेकुईचा मात्र आवाज येत होता. गाडी जंगलाच्या रस्त्यामध्येदेखील आडबाजूला उभी केलेली होती. बाजूला मिलिटरीची जागा सुरु होत असल्यामुळे कदाचित काही एक्सीडेंट झाला असेल किंवा अजून काही झालं असेल असं म्हणून समर आणि सतीशने गाडीपाशी बराच वेळ थांबून आवाज दिला. गाडीतल्या सामान बघून काहीच अंदाज येत नव्हता. आता मुलींना फोनची रेंज पण येत होती, स्मृतीने घरी फोन करून कळवले होते. समर आणि सतीशने श्रुती आणि स्मृती दोघींनाही ओळखले कारण त्या मिलिटरी कॅम्पसमध्ये रहायच्या.


"तुम्हाला पाहिजे तर आपण परत गाडीपाशी जाऊ आम्ही तुम्हाला मदत करतो," समीर म्हणाला, पण हे फार धोक्याचे होते. जर का गाडीमध्ये काही विचित्र बिघाड झाला असेल आणि ती सुरू झालीच नाही तर तिथे जंगलामध्ये थांबणं हा काही फार चांगला पर्याय नव्हता. श्रुतीला ते काही बरोबर वाटेना," नको, तुम्हाला कशाला त्रास? विनाकारण तुमचा वेळ चालला आहे, आमचा मेकॅनिक येईल आणि गाडी दुरुस्त करेल."


आता संध्याकाळ होत आली होती, समर आणि सतीश ला लक्षात आले की मुली संकोच करत आहेत किंवा त्यांना भीती वाटत आहे. सुनसान रस्त्यावर ती एकट्याच दोघी मुली तेदेखील मिलिटरीच्या ऑफिसरच्या, त्यांना एकट्याला सोडून जाण्यासाठी समर आणि सतीश दोघेही तयार नव्हते. थोड्या दूरवर जाऊन ते दोघेही बसून राहिले. रस्त्यावरून आता ट्रकची रहदारी वाढली होती, येणारे जाणारे मुलींना बघून आश्चर्य व्यक्त करत होते, पण शेजारी दोन तरुण ऑफिसर्स असल्यामुळे कोणीही थांबून खोडी काढायचा प्रयत्न करत नव्हता. मुली हळूहळू पुढे चालत राहिल्या. वाटेत जातानादेखील त्या फोटो काढायचं सोडत नव्हत्या. स्मृतीने हळूच समर आणि सतीशचादेखील फोटो काढला होता.


टीव्हीवरच्या बातम्यांमुळे, मसालेदार सीरीयलमुळे, मुलींच्या मनामध्ये थोडीफार भीती आणि धाकधूक होतीच, जखमी वडिलांना आणि आईला अजून काळजीत टाकणारी त्यांची कृती, आता त्यांना काळजी वाटत होती. हमरस्त्यावर ती आल्यावर देवळाली ची बस पकडून दोघीजणी घरी आल्या. मेजर सुभाषने त्यांच्या नेहमीच्या मेकॅनिकला गाडी आणण्यासाठी जंगलामध्ये पाठवले. गाडी पूर्ण चेक करून आणि स्वच्छ धुऊन मेकॅनिक ने घरी आणली. दोघी बहिणी घरी काहीच बोलल्या नाहीत. त्या घटनेनंतर श्रुती आणि स्मृती ला समर आणि सतीश कायमच जंगलात भेटत, समर फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे तो जंगलामध्ये नेहमीच येत असे. कित्येक वेळेला श्रुतीला त्यांनी सूचना पण केल्या होत्या की तिने असे एकटीने जंगलांमध्ये येऊ नये. बऱ्याच वेळेला श्रुतीच्या फोटोग्राफीमध्ये देखील समर मदत करत असे, आता समरची आणि श्रुतीची चांगलीच मैत्री झाली होती, मेजर सुभाष आणि समर परिचित होते त्याच्यामुळे श्रुती पण आता बिनधास्तपणे समर बरोबर बाहेर जाऊ शकत होती.


त्याच रविवारी मिलिंद आपल्या आईवडिलांसाठी मेजर सुभाष च्या घरी आला, त्यांनी परत लग्नासाठी विनंती केली. मिलिंदला घेऊन स्मृती बाहेर फिरायला गेली, तिने सहज विचारले" गेल्या बुधवारी तू पण आला होतास का त्र्यंबकेश्वरच्या जंगलांमध्ये?" सुरुवातीला मिलिंद चपापला, पण नंतर सावरून म्हणाला," हो अगं, कॉलेजच्या दोस्तांबरोबर पिकनिक साठी म्हणून आलो होतो." त्या भागामध्ये माझा रिसॉर्ट उघडायचा विचार आहे. जमीन बघण्यासाठी आणि पिकनिकसाठी असं दोन्ही गोष्टी साधण्यासाठी म्हणून मी आलो होतो."


त्याच्यानंतर स्मृतीस समाधान होईल अशी उत्तरं नेहमीच मिलिंद देत गेला. येताना तो स्मृती आणि श्रुती साठी भारी भारी भेटवस्तू घेऊन येत असे. मिलिंदचे आई वडील अतिशय सज्जन असल्यामुळे मेजर सुभाष ना स्थळ पसंत पडलं. शेवटी महिन्यानंतर स्मृती आणि मिलिंद चा साखरपुडा झाला. आणि लगेचच त्याला मिलिटरी चं कॅन्टीन चालवायची परवानगी मिळाली. त्याच्यानंतर दोन तीन वेळेला श्रुती एकटीच फोटो काढण्यासाठी म्हणून त्र्यंबकेश्वरच्या जंगलामध्ये गेली होती, यावेळेला गाडी न नेता ती आपली छोटी स्कुटी घेऊन गेली होती. बऱ्याच वेळेला बुधवारी काही ठराविक ठिकाणी चार माणसे एकत्र भेटत, दूरवरून फोटो काढल्यावर नीट दिसत नसे पण एकाच शरीरयष्टी मिलिंद सारखीच होती. हा दर बुधवारी जंगलामध्ये काय करतो? असा प्रश्न श्रुतीला कायमच पडत होता.


एका फोटोच्या प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी म्हणून श्रुतीला बरीच फुलांची आणि फुलपाखरांची फोटो काढायचे होते, म्हणून ती ठरवूनच बुधवारी त्र्यंबकेश्वरच्या डोंगरांमध्ये गेली. आपली स्कुटी झाडांमध्ये लपवून तिने आपल्या कामात सुरुवात केली, काही झाडांवरती तिने मूवी कॅमेरे अडकवून ठेवले, तर काही फोटो ती स्वतः काढत होती, डोली मधली खारुताई, किंवा घरट्यातील चिमणी, कावळ्याची अंडी, आणि अगणित फुलपाखरू. वाईड फोटोग्राफीचा नाद असल्यामुळे तिचं काम मनसोक्त चालू होतं, अचानक तिला मोठ्या वडाच्या झाडा मागून 4 माणसांचा आवाज येऊ लागला," जुम्मे रात को काम होना चाहिए, नही तो तुझे मालूम है हम क्या कर सकते है." कोणीतरी कोणालातरी धमकावत होतो.

"ऐसा मत किजीये, मे बर्बाद हो जाऊंगा," मिलिंदचा स्वर होता.


"अरे! गॅस सिलेंडर का तो कभी भी धमाका हो सकता है, तुमको थोडा और बडा धमाका करना है, समजे, नही तो हम तुम्हारे घर मे धमाका करेंगे." " काम करो नही तो हमारे पैसे वापीस करो." कोणीतरी उर्मट आवाजामध्ये धमकावत होत.


श्रुती तिथून मागच्या पावली परत आली, आपली स्कुटी ढकलत ढकलत की मुख्य रस्त्यापर्यंत आली आणि त्याच्यानंतर सुसाट घरापर्यंत येऊन धडकली. मिलिंद आता दर शनिवार रविवार स्मृतीला घेऊन बाहेर फिरायला जात असे." तुला काही कर्ज आहे का?" स्मृतीने सहज विचारले. मिलिंद ने हसून प्रश्नाला बगल दिली." अगं माझे एवढे ती स्टॉल, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट आहेत, थोडेफार कर्ज तर असतच ना, आणि ते मी व्यवस्थितच फेडतो आहे, तू काही काळजी करू नकोस." मिलिंदचे वागणं कायमच प्रेमळ आणि छान मित्रासारखे असे, त्यामुळे स्मृतीला त्याच्याबरोबर छान वाटत असे.


त्यादिवशी श्रुतीने आपले सगळे कॅमेरे घरी आणले, फुलपाखरांचे फोटो आणि पक्षांचे फोटो याची मूवी तिने काढली असेल असं वाटून तिने सगळे मूवी कॅमेरे एकामागोमाग एक आपल्या कम्प्युटरला जोडले. त्यात जे काही दृश्य दिसलं त्यामुळे तिचा आ वासलेलाच राहिला. कॅमेर्‍यामध्ये तीन जण मोठ्या मोठ्या पिशव्या भरून सामान मिलिंद ला देत असलेले दिसले. त्यापैकी दोघांनी मिलिंद ला थोबाडीत देखील लगावून दिले होते. त्याला धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांनी ते सामान त्याच्या हातात कोंबले होते. मूव्हीमध्ये आवाज देखील रेकॉर्ड झाला होता, "14 ऑगस्ट, 14 ऑगस्ट." सब जगह " असं परत परत कोणीतरी म्हणत होतं.


आता मात्र श्रुती पेटून उठली. ताबडतोब मेजर सुभाष नI मूव्हीकॅमेऱ्यात कैद झालेली चित्र दाखवली. मेजर नि आपल्या सहकाऱ्यांना ताबडतोब बोलावून त्यांच्या हातामध्ये सगळे मूव्ही कॅमेरा ठेवले आणि वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्याच दिवशी संध्याकाळी मिलिंद चालवत असलेल्या कॅन्टीनमध्ये रात्री साडेआठच्या सुमारास, जेव्हा जेवणासाठी तुडुंब गर्दी असते, त्याच वेळेला सिलेंडरचा स्फोट झाला, स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की आजूबाजूच्या घरांच्या काचा देखील पडल्या. नेमकी त्या वेळेला कामगार लोक जेवण्यासाठी आले होते, आणि सुदैवाने कुठलेही जवान त्यादिवशी जेवणासाठी आले नव्हते. स्फोटामध्ये जवळ जवळ दहा माणसं गेली तर जेवढे लोक त्यादिवशी कॅन्टीनमध्ये होते तेवढे सगळे प्रचंड प्रमाणात जखमी झाले. दररोज गल्ल्यावरती बसणारा मिलिंद त्या दिवशी मात्र स्मृतीला घेऊन सिनेमा बघण्यासाठी गेला होता. स्मृतीच्या म्हणण्यानुसार पूर्णवेळ मिलिंद अतिशय अस्वस्थ होता, तो सारखा आपल्या फोन काढून त्याच्यावर चे मेसेज किंवा कोणाचा फोन आला का हे तपासून बघत होता.


पोलीस आणि मिलिटरी ताबडतोब सतर्क झाले, मिलिंद घराची झडती घेण्यात आली, जाब जबाबासाठी त्याला मिलिटरीचे ऑफिसर समोर बसवण्यात आले. श्रुतीने दाखवलेले फोटो त्याला परत दाखवण्यात आले, सुरुवातीला त्यांनी त्या माणसांना ओळखत नसल्याचे सांगितले पण थोड्याच वेळात त्याचे धैर्य गळाले. या तिघा आतंकवाद्यांनी दिलेले आरडीएक्स कुठे लपवून ठेवले आहे हे त्यांनी पोलिसांना दाखवले. मिलिटरीच्या ऑफिसरच्या मुलीला गटवून तिच्याशी लग्न करून मिलिटरी कॅम्पसमध्ये प्रवेश मिळवण्याचा सोपा मार्ग त्या आतंकवाद्यांनी मिलिंद ला दाखवला होता. कोणा कडून घेतलेले कर्ज मिलिंद ला अतिशय भारी पडले होते. श्रुती आणि स्मृती च त्र्यंबकेश्वरच्या डोंगरात हिंडणं आतंकवाद्यांनी अचूक हेरलं होतं, त्यांनीच त्या दोघी मिलिंद ला दाखवून टारगेट करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. हे सगळं काही अतिशय विचित्र घडत होतं. स्मृतीला आता एकेक गोष्टीची संपूर्णपणे तपशीलवार जंत्री कळत होती. एवढ्या प्रचंड फसवणुकीने ती अतिशय दुःखी आणि गोंधळून गेली होती.

"मि लिट्री ऑफिसर चा आतंकवाद्यांची संबंध "

अशा ठळक हेडलाईन्स विविध वृत्तपत्रात झळकल्या आणि त्याच्यामुळे मेजर सुभाष च्या कुटुंबियांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागला. याच्यामध्ये चूक कोणाची होती आणि कोण बळी पडले. उलगडा जसाजसा होऊ लागला तसा तसा एक एक पुरावा मिलिटरीच्या तपास समिती समोर येऊ लागला. सुरुवातीला चहाचा स्टॉल टाकण्यासाठी मिलिंद ला लागणारे भांडवल हे त्याच्या एका गैर हिंदू मित्राने दिले होते. मिलिंद नि स्वतःच्या मेहनतीने जरी आपला बिझनेस वाढवला तरी पण त्या गैर हिंदू मित्राने वेळोवेळी त्याला भरपूर आर्थिक मदत केली आणि त्याच्यामुळे त्याचे बस्तान व्यवस्थित बसले. ही मदत घेताना त्याच्याकडून कुठल्या रूपाने परतफेड करावी लागणार आहे हे मिलिंदला कधीच समजले नाही. आपल्या बिझनेस वाढवण्याच्या धुंदीमध्ये तो एवढा मग्न झाला होता की आपण कोणाशी संबंध ठेवून आहोत आणि ते किती धोकादायक आहे हे त्याला कधी समजलेच नाही. आणि जेव्हा समजले तेव्हा तो आयुष्यातून पूर्णपणे उठला होता. आतंकवाद्यांबरोबर मैत्री आणि त्यांना सहाय्य करणे या कलमाखाली जन्मठेपेची शिक्षा आता त्याला भोगावी लागणार होती. त्याचे तसे तर स्मृतीच्या चारित्र्यावर केवढा मोठा काळा डाग लागला होता. श्रुती आणि स्मृती यांच्या जीवाला जबरदस्त धोका उत्पन्न झाला, पण श्रुतीच्या फोटोग्राफ्समुळे आतंकवाद्यांना हुडकून काढण्याचे यश पोलिसांना लाभले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime