बकूळा....
बकूळा....
ती : कधी उठलास...
तो : केव्हाच... माझा तर दोन कप चहा घेऊन झालासुद्धा...
ती : मला का नाही उठवलंस... (असं म्हणून लगेच त्याच्या कुशीत शिरते...)
तो : तू स्वप्नात गुंतलेली होती तेव्हा... खरं सांग... आ... आ... मी होतो ना स्वप्नात?
ती : हट... कुछ भी... माझा प्रियकर होता... तुम्ही काय रोजच भेटता... आज त्याचा दिवस आहे... वर्षातून एकदाच तर भेटतो तो मला... आणि हो तुला पण Happy Valentine day नवऱ्या...
तो : हा हे बरं आहे... तो एक दिवस काय भेटतो... त्याच्यासाठी तू या 364 दिवस साथ देणाऱ्या मला... असं फेकून मारल्यासारखं wish करतेस?
ती : मी तरी wish केलं... तू तर तुझ्या "ती"च्या नादात मला wish पण केलं नाहीस साधं...
तो : sorry बायको आणि happy Valentine day मेरी जान...
ती : lo...
तो : (तिचं बोलणं मध्येच थांबवत)... A sorry हे जान तिच्यासाठी होतं... चु... चुकून निघालं!
ती : (त्याला हलकेच फटके मारत) hate u
मग तो : बरं hate तर hate... तसं ती खूप प्रेम करते माझ्यावर!
ती : हा... हा... करू दे... माझं पण माझ्या "त्याच्यावर" खुप प्रेम आहे...
तो : हो का?
ती : हो खरंच... बरं ऐक ना... इतके वर्षे झाली... तू त्यांच्या love story बद्दल कधी काहीच सांगीतलं नाही... तुझ्या angle ने... तसं मला थोडं थोडं माहीतंय म्हणा... ए पण मला पुर्ण ऐकायचंय... सांग ना रे हवं तर माझं valentine gift समजून सांग!
तो : तसं मी तुला गिफ्ट बीफ्ट काही देणार नव्हतो... पण मला जायला उशीर आहे... म्हणून सांगतो... पण मला तिला लवकर भेटायचंय म्हणून details नाही सांगत हा...
ती : सांगत आहात हेच उपकार आहेत साहेब आपले... भुतकाळ...
May i come in... ती गोड आवाजात म्हणाली... तसे त्याने कान टवकारले... ती... बकुळीचा गोड सुगंध... आणि पैंजनाचा आवाज... ते तिघं सोबतच आले... का कोण जाणे तिच्या येण्याने जे जाणवलं होतं न... ते यापूर्वी कधीच feel नव्हतं केलं त्याने... तो दिवस college चा पहिला दिवस होता... तर सगळेच नवीन होते... एक एक करून सर्वच आपापली ओळख जागेवर उभं राहून सांगू लागले... परत तोच गोड आवाज... आणि थोडीशी पैंजनाची किनकीन... बहुतेक ती हळूच उभी राहली असावी... Good morning sir... मी स्माईली सुहास देशमुख... तिच्या सारखंच तिच नाव पण हवंहवंसं वाटलं त्याला... स्माईली... म्हणजे तिचं हसणं पण कातील असणार...
काही मुला मुलींची ओळख सांगून झाल्यावर... त्यानं पण स्वतःची ओळख सांगितली, रूबाबदार आवाजात... धनंजय... धनंजय खानविलकर...
एकेक करत lectures संपत होती... आणि याला मात्र तिला भेटायची ओढ लागली होती... दिवसभर तो पैंजनांचा आवाज आणि तो बकूळीचा सुगंध... त्याला काही सुचू देईना... आज पूर्ण lectures झाली होती... शिकवणं बिकवणं काही नव्हतं... पण भविष्यासाठीचे सल्ले आणि भीती देऊन lecturer एकेक येऊन निघून जात होते... तिच्या विचारात कधी college time संपला कळालंच नाही त्याला.. ती समोर बसली होती आणि हा मागे... उठण्या उठण्यात... समोरची ती समोरूनच निघून गेली... तो बकूळीचा सुगंध आणि पैंजनाची कीनकीन दुर जाताना भासली तेव्हा कळालं की तिची अन् आपली भेट आज तरी शक्य नाही... ती जाताना त्याला, त्याच्यातली कमी आठवण करून गेली...
पण तो आज एका नव्या उमेदीने college ला जायला निघाला... तसं शक्यता फार कमी... पण... बहुतेक आज तिची भेट होईल या आशेने... नटण्यातच जरा उशीर झाला... आज पहिल्या वेळेस तो कुण्या दुसऱ्याने (तिने) आपल्याला पाहावं म्हणून तयार होत होता... जरा घाईगडबडीतच होता... उशीर जो झाला होता त्याला...
Corridor वर अचानक कुणाशी धडकला... तसंच त्याच्या पायाशी काही पडलं...
ती : ss... Sorry...
तो : (तोच आवाज... बकूळी... पैंजण...) अ... अम्... It's ok... माझीच चुकी होती... ते... मी... जरा गडबडीत...
(ती... समोर... बापरे... काय बोलू न काय नाही अशी गत झालती त्याची पण शब्द काही येत नव्हते)
ती : हो ना... निदान तुम्ही तरी समोर बघून चालायचं... अंध तर नाहीत ना तुम्ही पण...
तो : correct... अंध आहे मी...
ती : oh sorry... मी असं बोलायला नको होतं!
तो : sorry नका म्हणू हो... ते बस माझ्या पायाशी... तुमचं काही तरी पडलं... ते उचला आधी...
ती : हा, ते... फुलं...
तो : बकूळीची???
ती : हो... पण तुम्हाला कसं कळालं? I mean...
तो : u mean की मी आंधळा......आणि मला कसं कळालं की हे बकूळीचेच फुलं आहेत.....Am i right??
ती : हो..... न...नन्....नाही .......मला तसं म्हणायचं नव्हतं.....
तो : आम्ही अंध जरी असलो ना तरी ....बाकी sense strong असतात आमची...... नाही म्हणजे तसं वरदानच दिलेलं असते आम्हाला निसर्गाने......
ती : हो खरंय तुमचं..... (असं म्हणून ती lecture साठी वळून जायला निघते)
तो : (तिच्या काठीचा.......white cane....चा आवाज ऐकून) ek minute......काय बोलल्या तुम्ही....... अंध तर नाही ना "तुम्ही पण"....म्हणजे....
ती : फक्त काठीच्या आवाजाने ओळखलं...... smart हा...... खरंच खूपच strong आहेत तुमचे sense....पण चला आता उशीर होतंय ना lecture ला.....
तो : हो चला......(असं म्हणून दोघेही चाचपडत चाचपडत वर्गात पोहचतात...... आज दोघे पण सोबतच बसतात....... Lectures करतात आणि परत उद्या भेटू अशी आशेने आपापल्या घरी निघून जातात......)
दूसऱ्या दिवशी तो लवकरच college ला पोहचतो...... पण तिला यायला जरा उशीर होतो...... म्हणून त्यांची ताटातूट होऊन ते वेगवेगळ्या बेंचवर बसतात...... याला काही दिवसभर करमत नाही..... तिचे हाल पण काही वेगळे नसतात....... एका दिवसात इतकी attachment....... कमाल आहे...... दोघं याच विचारात असतात...... कसंबसं lectures करून ते जाताना एकमेकांना गाठतातच...... दिसत नसूनही एकमेकांची ओढ त्यांना भेटवते......
ती : धनंजय......
तो : हा ......बोला ना.....
ती : माझ्या सोबत coffee ला चलणार?
तो : काय?
ती : हा coffee.......
तो : नाही..... ते कळालं.......पण coffee......हे मी विचारायला हवं ना!
ती : का..... हे ठरलेलं आहे का..... नाही म्हणजे मी कुठे वाचलं नाही असं...
तो : नाही .....असं कुठे लिहीलेलं तर नाही..... पण बहुतेक आपल्या मैत्रीत..... तुम्ही dominant असणार...... असं वाटतंय...
ती : मैत्रीत...
तो : oh ......Sorry आपल्यात अजून मैत्री झाली नाही.... Legally.....(असं म्हणून तो लगेचच तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करतो).... Friends.....?
ती : coffee....
तो : हो .....हो......किती घाई...
ती : तेच म्हणत आहे ना मी......किती घाई......आधी canteen ला जाऊया आणि तिथे करूया ही legal कामं......
तो : हो चालेल....Why not...... . . . . . मग Coffee.....नंतर फोन नंबर ची अदलाबदल .....(अंध लोकांना अचूक नंबर डायल करता येतोे बरं का !!).....फोनवर बोलणं वाढलं......एकमेकांना जास्त वेळ देणं..... Problems share करणं .....एकदुसऱ्याची मदत करणं.....एवढ्या दिवसात एकमेकांची सवय लागली...... रुसवा फूगवा....रडणं पडणं.... दुरावा.....परत जवळ येणं..... सारे.........सा.....रे....अनुभव घेऊन झाले....
ती : थांब थांब......किती घाई.....स्टोरी पळवतोयस असं वाटतंय.....
तो : correct....तेच करतोय मग मी....
ती : पण का.....मला नाय आवडत असं..... हे तर सर्व लव स्टोरीजमध्ये असतं....
तो : हो म्हणून थोडक्यात अाटोपलं ना..... मेन सर्व details मध्ये सांगेल ना बाळा....
ती : ए तू असं बाळा नको म्हणत जाऊस रे...... कसं तरी होतं....(pause घेऊन)......love u
तो : लगेच खूश नको होवूस..... तिला लवकर भेटायचं म्हणून तूला कटवतोय... आणि ही little love story आहे.... छोटीच असते.....लोणच्यासारखी चवीला.... चटकमटक.....हावऱ्यासारखं फुगोस्तोर खायचं नसतं...
ती : जरा तुला चांगलं म्हटलं की लगेचच फिस्कटतोस...... आणि कुठून आणतोस रे हे असले शब्द..... फुगोस्तोर म्हणे..
तो : आता हा फिस्कटतो......हा तर शब्द माझा आहे न.... तू चोरला, मी काही बोललो तुला..... नाही ना..... आणि तुला स्टोरी ऐकायचीय ना.... मेरी जुबानी..... बाकी मी कुठूनही काही आणेल..... स्टोरी झाल्यावर तुला पत्ता सांगतो...चालंल?
ती : सांग न मग...
तो : हा तर मग खुशीचे दिवस गेल्यावर आले परीक्षेचे दिवस..... त्या दिवशी सक्काळीच तिच्या बाबांचा फोन आला.... त्यांनी त्याला भेटायला बोलावलं......
ती : काय.... ए हे मला माहीतच नव्हतं....
तो : किती tight वातावरण होतं माहिती का त्या दिवशी....कर्फ्यू जणू...तिच्या वडिलांनी गेल्या बरोबर bomb टाकला... तुला या white cane शिवाय साधं चालणंसुद्धा जमत नाही तूझ्या भरवशावर कसं देऊ पोरीला..... त्याऐवजी मी एखाद्या डोळस व्यक्तीला देईल माझी पोर.....
ती : मग....
तो : जसं तुला माहीतच नाही...
ती : तुझ्या दृष्टीकोणाने ऐकतंय ना मी..... सांग न मग...
तो : हा.....मग तो लगेचच उभा राहीला..... हातातली काठी खाली टाकली.... अन् चालायला लागला....... अनोळखी ठिकाण होतं तर धडपडत होता.... ठेचकाळत होता.... तिचे वडील आता मात्र घाबरले..... ते काळजीने त्याला सांगत होते.... अरे काय करतोयस...... लागेल तुला..... मध्ये मध्ये त्याला आधार देत होते.... तो मात्र त्यांचा हात झिडकारून काही तरी शोधत होता.... तो तसाच धडपडत पायऱ्या चढत पडत तिच्या खोलीत पोहचला..... ती त्याच्या तशा येण्याने धांदरली.... त्याच्या स्पर्शाने शहारली.....
ती : एवढ्या मोठ्या घरात कसं शोधलं त्याने तिला..... मला तेव्हा पण कळालं नव्हतं.....
तो : प्रेम.....
ती : (नुसतीच हसते)...
तो : प्रेम बीम काही नाही..... तिने मदत केली होती त्याची..
ती : तिने....... नाही नाही..... बिलकुल नाही तिला तर माहिती पण नव्हतं त्याचं येणं..
तो : हो गं....तिने तिच्या मैत्रीणिला पाठवलं होतं हात धरून तिच्यापर्यंत आणायला..... आधार बनायला...
ती : कोण मैत्रीण?.....कोणी हात पकडला होता? आणि तू हे आता सांगतो आहेस? तेव्हा सांगायला काय झालं होतं? तुला तर आवडला असेल ना तिचा स्पर्श...
तो : हो मग.....खुप...
ती : तू नाव सांग आधी तिचं.... तिला तर मी बघते...
तो : अगं ती.....ती म.....मम् माझी.....
ती : तुझी...?
तो : हो माझी बकूळा...
ती : oh तर बकूळा नाव आहे तीचं...... कुठे राहते....काय??? बकूळा....
तो : ओळखलं वाटते.....
ती : तू पण ना.... घाबरली होती ना मी....
तो : तिचे पप्पा पण घाबरले होते... त्यांना वाटलं हे येडं....... दिसत नाही अन् काही नाही..... तोंड फोडून बसणार....... पण जेव्हा त्याने तिच्या खोलीत entry घेतली...... त्यांना कळून चुकलं की याच्यापेक्षा जास्त प्रेम..... आपल्या मुलीवर कुणीच करु शकत नाही...... बहुतेक तेव्हाच त्यांनी त्याला जावई मानलं होतं......
ती : त्याने त्याचं प्रेम सिद्ध जे केलं होतं!
तो : ती पण काही कमी नाही काही......
ती : तिने काय केलं असं??
तो : तिने पण तर तिचं प्रेम सिद्ध केलं होतं.
ती : काही पण काय रे..... तिने कुठे काय केलं असं... तो : लग्नाच्या एक महीनाआधी..... तिला त्या डॉक्टरने सांगितलं होतं की तिला eye donar मिळाला आहे..... तिला पण हे सूंदर जग पाहता येईल...... पण तिने चक्क नकार दिला..... याआधी तिला पाहता यावं म्हणून तिची धडपड पाहिली होती त्यांनी..... त्यांना वाटलं ती घाबरली असणार...... पण तिने त्यांना सांगितले की तिला यापुढे treatment नाही घ्यायची....... तिला तिचं जग मिळालं आहे.....
ती : हो मग नाही तर काय....... तिला त्याचं असणंच खूप होतं आयुष्य जगण्यासाठी.....
तो : खरं तर त्याला आधी खूप राग आला होता तिचा...... कारण आयुष्य जगायला प्रेमासोबतच practical असणं पण तेवढंच गरजेचं असते ना..... आणि तिला चांगलंच ठाऊक की त्याचा अंधपणा कायमचा...... आणि दोन अंधांचं आयुष्य किती कठीण हे न समजण्याइतकी ती लहान नव्हती..... पण तिचा त्यांच्या प्रेमावरचा विश्वास पाहुन त्याला नमती घ्यावी लागली......
ती : ऐक न......love u...
तो : love u वरून आठवलं......मला उशीर होतोय...... तिला भेटायचं ना...
ती : हो हो जा.... मी पण माझ्या heroला भेटायला जाणार आहे...... विसरू नको. . . . . तो जरा लवकरच पोहचला...... तिला वेळ होता यायला.....तेच college canteen...... तोच corner...... तोच table..... त्यात त्या सर्व जुन्या आठवणींना आठवत तो बसला होता...... आताच बायकोपाशी त्या आठवणींची उजळणी जे झाली होती........ तोच तो बकुळीचा सुगंध प्रवेशतो..... तिथे आणि त्याच्या मनात.....
तो : आलीस तू...... ती : ए तुझं नाक किती strong आहे रे..... तू कुत्रा होतास का मागच्या जन्मी...
तो : बायकोसारखी नको बोलू...
ती : ok ok काय म्हणू मग..... तुझं sense खूप strong आहे असं.....
तो : म्हणूचा काय अर्थ....... आहेतच माझे sense strong....
ती : धनंजय.....
तो : हा बोल न गं.....
ती : मी स्वतःला कधीच नाही पाहिलं.....पण तू मला मिळालास न.....मी सर्व सुंदरता अनुभवते.......
तो : मला विचार ना.....मी सांगतो..........तू खूssssssssssssप सुंदर आहेस.....माझी बकूळा....
ती : स्माईली आहे माझं नाव...
तो : हो हो..... इसी स्माईल के दिवाने हैं हम..... वरना हमे दिसत ना पासत...... काय खाक दिसली असती सुंदरता.....
ती : ईश्य....... आप भी ना....
तो : बरं ऐक ना..... धूंद प्रेमाच्या धूंद राती साथ तुझी हवी हात तुझा हाती..... चांदण्यांच्या नजरकैदेत काजवे लुकलुकती रातकीडे गाती..... चल स्वप्नातंच बांधूया साता जन्माच्या गाठी..... मी जगावं तुझ्यासाठी अन् तू जगावं माझ्यासाठी........ thank u sooooooo much मेरी जान.....
ती : खूप सुंदर कवीवर....... आणि हे काय रे..... तू का thank u म्हणतोय...... thanks तर मी म्हणायला हवं...... एवढ्या वर्षापासून या दिवसाला आणखी स्पेशल बनवण्यासाठी.....
तो : मी कुठे काय केलं गं? उलट तुच त्या गुलाबांची भर घालून माझं आयुष्य आणखी सुगंधित बनवलं......
ती : तुला पण मिळाले का ते.....????
तो : तुला पण म्हणजे....??
ती : अरे इथे येताना प्रत्येक सिग्नलवर मला गुलाबांची फुलं मिळाली.....
तो : मला पण मिळाले.... मला वाटलं तुझं planning आहे हे.....
ती : आणि मला वाटलं तू plan केलं हे.....
तो : आणि तु रागावू नकोस... मी न आज इथलं decorations चं पण सांगायला विसरलो..... पण तरी इथे दर वर्षी प्रमाणे सर्व manage आहे सर्व....
ती : तू कसं काय विसरलास रे.....
तो : अगं ते गप्पगप्पांमध्ये.....
ती : मग हे कोणी केलं सर्व????
surprised........happy Valentine day mumma pappa.... दोघेजण चाचपडत उभे राहतात.....
ती : ओ गं माझे बाळूले......
तो : तुम्ही केलं हे सर्व......???
जाई : हो मम्मा पप्पा..... आम्ही दोघींनीच केलं हे सर्व..... तुम्ही दरवर्षी हा दिवस असं girlfriend boyfriend सारखं वागून तुमच्या प्रेमाला चिरतरुण बनवता....
जुई : आणि sorry आम्ही दोघींनी तुमची story लपून ऐकली.... तुमचं दोघांचं खूप प्रेम आहे न एकदुसऱ्यावर....
तो : हो रे पिलांनो आमचं एकमेकांवर पण खूप प्रेम आहे...... आणि आमच्या दोन फुलांवर पण खूप जीव आहे आमचा.....
ती : धनंजय...... आपल्या जाई-जुई किती मोठ्या झाल्या ना रे..... यांच्या जन्माच्या वेळेस खूप धाकधूक होत होती...... त्यात या twins....... आणि आपण दोघे हे असं अंध.... आपण यांना योग्य ते संस्कार देऊ शकणार की नाही...... पण आपल्या फुलांना काही शिकवायचं कामचं पडलं नाही.... त्या स्वतः स्वतःच उमलल्या...... बहरल्या..... आणि आपलं आयुष्य सुगंधित बनवलं......
तो : हो ना गं स्माईली...... आपली दृष्टी बनून जन्म घेतला या दोघींनी....
जाई-जुई : पुरे आता आमची तारीफ..... cake कापायचा का..... आम्हाला भूक लागली.....
ती : धनू...... चल cake कापूया माझ्या चिमण्यांना भूक लागलीय......
तो : तू धनू नको म्हणत जाऊ गं मला कूछ कूछ होतं.....
ती : निदान मुलींसमोर तरी तुझा हा फाजीलपणा कमी करत जा..... चल cake कापायला. . . . .
जसं लोणचं मुरल्यावर चविष्ट बनते...... अगदी तसंच..... अनुभव...... छोटी मोठी नोकझोक...... दुरावा.... रुसवा..... फुगवा.... चावटपणा...... फाजीलपणा...... आणि सोबत घालवलेले क्षण....... हे सर्व प्रेमाला घट्ट (चवदार) बनवतात....... त्याचप्रमाणे हे अंध प्रेमी जोडपं निघालंय आयुष्याच्या वाटेवर.... चाचपडत चाचपडत....... त्यांच्या प्रेमाला घट्ट बनवायला......