Mitali More

Others

3  

Mitali More

Others

रानी रोलर राजाची ....

रानी रोलर राजाची ....

4 mins
201


सरूबाई : फुले...... अय फुले


फुलवा : काय वं मा....


सरूबाई : कुटे हाईस


फुलवा : परसा मांग ......येतूय थांब


सरूबाई : हाव..... ये ये....काय म्हणावं या पोरीले.......पोराकडचे येत असतीन अन हिले गाव हुंदडायला जायाचं


फुलवा : काय वं माय ......कामून वरडून र्हायली


सरूबाई अवं पावने येणारेत ......आंग धूय....


फुलवा : आंग नाय धूत नावं......


सरूबाई : र्हावू दे जाय तोंड हात पाय त धून घे

.

.

.

.

.

न्यानू : धुतल्या.... .सार्या म्हशी धुतल्या म्या


नर्मदा : मंग जाय .....त्या बबन्याच्या टपरी वरून द्हाचे पेडे आन


न्यानू : काहून वं माय .....पेडे काहून


नर्मदा : अरे त्वाला बाप म्हणते ना पोरगी पायले जाऊ .......त मंग म्या म्हंटलं की पक्कच करून येऊ......जाय आन बरं....मंग निंग्न हाय आपल्याले


न्यानू : हाव आनतू

.

.

.

.

.

पांडूरंग : या या चिनकाजी ......या बसा सतरंजी वर.....आयकलं काय वं......पावने आले .......पाणी घेऊन ये पाय धूयाले


चिनकाजी : र्हाऊ द्या पांडूरंगराव.......आंदीच पाणी टंचाई हाय


पांडूरंग : बरं या मंग आत .....बसा...


चिनकाजी : हाव हाव.....बरं हा आमचा पोरगा....न्यानू.....न्यानदेव(ज्ञानदेव)......


पांडूरंग : घ्या पाणी न्यानदेवराव......


न्यानू : हाव


पांडूरंग : अगं ये आयकलं का.....च्या मांड अन फुलीले घेवून ये

.

.

.

.

.

फुलवा......9 वर्षाची चुनचुनीत मुलगी..... दिसायला फार काही सुंदर नाही......साधारण अशी.....पण रांगडी.... गड्या सारखी.....तिच्यात खास असं काहीच नाही.... म्हणजे तिला पाहून पहील्या नजरेत प्रेम होनं शक्यच नाही..... पण ज्ञानूची मात्र विकेट पडली होती.....म्हणतात ना......कनेक्शन झालं की दगडात पण देव दिसतो....तसलं काहीसं कनेक्शन त्यांच्यात झालं होतं.....अन ती पोलकं आणि झांपरा मंदली फुलवा त्याला फुलराणी वाटायला लागली


                   आणि आपला ज्ञानू....ज्ञानदेव... गोरापान ....नाक डोळी छान....राजपुत्राचा पुनर्जन्मच जनू......पण नोकराचं आयुष्य जगणारा.....सावत्र आईच्या त्रासाला त्रासलेला 20 वर्षाचा नवरा मुलगा.....सावत्र आईने त्याला पाटलाकडे सालानं ठेवलं होते

.

.

.

.

.

चिनकाजी :अरे न्यानू .....घेनं च्या.....पोरगी कवाची कपबशी घेऊन उभी आहे


न्यानू : आ...ह......हा....बाबा


चिनकाजी : बरं पांडूरंगराव आम्हाला पोरगी पसंद हाय.......उशीर कायले लावायचा म्हणून सांगून टाकलं......तुम्हाला माया पोरगा पसंद अशीन त उरकून टाकू


पांडूरंग : (खूश होत)अवं आईकलं का वं साकर घेऊन ये .....पावन्यास्नी दे.....तोंड गोड कर सार्यायचं

.

.

.

.

.

मुलगी पसंत पडली.....सुपारी फुटली......लगीन ठरलं आणि उरकलं बी........पोलकं घातलेली छोटी नवरी लागली संसार थाटायला......संसार म्हणजे माहीत नसतांना नवरा म्हणजे देवंच समजायची......आणि आपला देव ज्ञानदेव......जसं आपल्या आयूष्यात काही बदललंच नाही .....असं वागायचा.......त्यातंच न्यानू चा बाप देवाघरी गेला.......सावत्र माय आता त्याच्या सोबत त्याच्या फुलवाचा पण छळ करायची.......पांडूरंगाचं फुल आता सुकून गेलं होतं......न्यानू पाटलाकडे गहान होता.....तो त्यायच्याच घरी रायचा....म्हैन्या दोन म्हैन्यानं यायचा....... सासू लायन्या फुलवाला राबराब राबवायची ......चुकलं माकलं की बदड बदड बदडायची.....मायबापा वरनं शिव्या द्यायची......बघता बघता तीन वरीस निंगून गेले.....न्यानूचं घरी येणं बंद झालं होतं....

.

.

.

.

पांडूरंग पोरीची म्हायती काढायचा......काईमाई कानावर यायचं त मन दुखायचं त्याचं.....त्यात त्याला न्यानू बिमार असल्याचं कळलं......बिमार असतांनी पाटील त्याला ढोरासारकं वापरायचा.....पांडुरंग न्यानूले भेटायले गेला.....न्यानूची हालत पाहून हळहळला.....


न्यानू : मामा


पांडूरंग : रडू नका जावाईबापू......चला माया संग...... घरला चाला.....


न्यानू : पाटील नाही येऊ देईन मामा....


पांडूरंग : असा कसा येऊ देत नाही पण पायतोच म्या...


            पांडुरंगाने पाटलाच्या तोंडावर नगद दिडशे रूपये मारले आणि न्यानूला घेऊन त्याच्या घरी गेला......फुलवाला बापाला पाहून रडायलाच आलं.....तिची हालत पाहून न्यानूला पण रडायला आलं.....पाटील जे हाल त्याचे करत होता......तेच हाल फुलवाचे होत होते.....आज त्याला काही जानवलं तिच्या खराब हालत कडे पाहून..... काळजी......की काळजीतलं प्रेम...... त्याचं त्यालाच माहीत......ते दोघं पांडूरंगासोबत त्याच्या घरी गेले.......माहेरी येऊन फुलवा फुलली होती......अन त्यांच प्रेम पण फुलत जात होतं.....

.

.

.

.

.

पांडुरंगानं जावायाला रोड रोलरवर कामाला लावलं अन फुलवा दगडं फोडायची छन्नी हातोड्यानं... .रोड बनवायचा कंत्राट घेतला होता सुपडानं.....सारा संसार रोडवर मांडला होता..... तो रोलरराजा अन ही त्याची राणी......


          असंच एका दिवशी काम आटोपल्यावर ते दोघं कुटका भाकरी खात होते .....


फुलावा : आहो ती बोर भगा न कशी लदबदली हाय बोरायनीं ......मले खायचे हात ना व बोर ....


न्यानु : बरं चाल मी वर चडतो झायावर अन तू खाली पदरात वेच......न्ह्यायत खाली नाल्यात पडलेलं बोर खराब होतं घाणींन 


       न्यानू वद्रे झाडावर चढते अन फुलवा खाली.....दोघं गुंग असतात बोर तोडण्यात ......लाल लाल बोर न्यानू तोडून देते आणि खाली पदरात वेचू वेचू फुलवा बोरं खाई ......तेवढ्यात तिच्या पायाला काही टुचते ......ती खायच्या नादात लक्ष देत नाही ......न्यानूचं लक्ष तिच्याकडे असते .....तरी तो विचारतो तिला ......काय झालं वं......ती काही नाही म्हणते .......पण तेवढ्यात न्यानूचं लक्ष झाडाच्या बुंध्यापाशी जाते......बुंध्याच्या थोडं दूर अन फुलीच्या थोडं जवळ न्यानुला साप दिसतो .....नाग 


न्यानू : फुले हालू नगं .....जागीच थांब .....डोम्या नाग हाय ....


ती भेदरून जागच्या जागीच दगड बनते .....तो झाडावरून झपझप खाली उतरतो ........सापाची फना काढून फनकार सुरूच असते ......फुली मोठ्या श्रद्धेनं त्याच्या समोर हात जोडून उभी होते 


फुलवा : देवा.....बाप राज्या .....जाय रं बापा इथून 


     तिनं हात जोडतांच साप तिथून सरपटत निघून जातो.....न्यानूला तर हे मोठ्या चमत्कारासारखं वाटतं .......दोघं पण आनंदून जातात ......तिच्या पदरातले बोरं तर कधीचेच सांडतात ......पण मोठं संकट टळलं म्हणून देवाचे आणि नागराजाचे आभार मानतात .......पण नागराज आणि वेळ त्यांचा डाव खेळून निघून गेले असतात .......अचानक फुलीला चक्कर येते ......ती खाली कोसळते ......तोंडाला फेस यायला लागतो .....न्यानू घाबरतो ......तिची तडफड सुरू होते आणि इकडे याचं काळीज खालीवर होतं ......तो लगेच तिला उचलतो .....गावच्या दवाखान्यात नेतो ....नशिबाने त्या दिवशी गावात मोठ्या डॉक्टर लोकांचा दौरा असतो .....

.

.

.

.

.

पेशंट सोबत कोन आलं आहे ....एक नर्स ओरडूनच विचारते 


न्यानू : मी .....म्या हाव मड्म तिचा नवरा ......न्यानू हाय मावं नाव 


नर्स : तुम्हाला डॉक्टर साहेबांनी आत बोलावलं ......ते तिकडं त्या बाजूला 


न्यानू : साएब आत येऊ का 


डॉक्टर : हो या या .....बसा 


न्यानू : साएब फुली ....म्हंजी फुलवा ....म्हाजी बायको 


डॉक्टर : हो त्यांची तब्येत ठीक आहे आता ......आई आणि बाळ दोघेपण ठीक आहेत 


न्यानू : न्हाय न्हाय .....फुलवा ....माझी बायको .....तिला आता कायी वेळ आंदी साप चावला तर हितं आणलं म्या .....लेकरू नाय 


डॉक्टर : अरे हो हो .....माझं पूर्ण ऐकून तर घेशील ....फुलवाला वाचवलं आम्ही ....आणि ती 4 महिन्यांची गरोदर आहे .......पण ती खूप अशक्त आहे .....तुला तिची खूप काळजी घ्यावी लागेल ....


न्यानू : लेकरू ......फुलवा ......आई ......मी बाप ......आम्ही मायबाप होनार


           न्यानू इतका आनंदी झाला की अगदी धावतच फुलवा जवळ धावत गेला .....आणि फुलवा ......न फुललेली फुलवा आज खऱ्या अर्थाने फ़ुलली होती


Rate this content
Log in