Vasudev Patil

Horror

1  

Vasudev Patil

Horror

बिंद्रा

बिंद्रा

8 mins
645


चंदू मुकादमानं आपल्या दोन्ही टोळ्या ट्रक व ट्रॅक्टर सहित नोव्हेंबर नंतर महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या सिमेवरिल फैजपुर सावद्याच्या दिशेनं काढल्या.२०-२० मजुरांच्या दोन टोळ्यांचा मुकादम होता तो.या वर्षी अजिंठ्याच्या डोंगरात माळमाथा कन्नड घाटात पाऊसमान बरसलाच नाही.म्हणुन ना धान ना चारा ना पाणी.म्हणुन एक टोळकं ऊस कारखान्यात व ट्रॅक्टर सहित एक टोळकं कापुस वेचणी, केळीचा पाडा पाडणे वा गहू कापणी अशा कामाला लावावं म्हणुन तो जामनेर जळगाव करत तापी उतरत फैजपुर भागात दाखल झाला.

काम सुरळीत चालत असतांनाच दोन तीन महिने कसे गेले हे त्याला व मजुरांनाही कळलं नाही.सगळं आनंदी -आनंद.केळीचा पाडा पाडणे, कापुस वेचणी व ऊस तोडणी यात पैसेही गाठीला राहिलेत .फेब्रुवारी सरायला आला मजुरांना आता घराकडचे परतीचे वेध लागले.पण चंदुला वाटायचं गावाकडं उन्हाळ्याचं काहीच काम नाही.त्यापेक्षा इकडंच गव्हाचा सिजन आवरावा म्हणजे आणखी कमाई होईल मग परतु सावकाश गाव कुठं जातं पळुन.

आज त्याला गणा पवाराचं बोलावनं होतं म्हणुन तो दोन मजुर मानसांना सोबत घेत पवाराच्या गढीकडं निघाला.पवारांची गढी म्हणजे बडी असामी.यांचे पुर्वज होळकरांसोबत पेशवाईत उत्तरेला आलेले पण परत जातांना तापी खोऱ्यातच स्थिरावले.गणा पवाराचे वडील उन्मेश पवार कोकण कृषी विदयापिठात शिक्षण घेऊन खान्देशात त्यांनी कोकणातील रायरी, हापुस आंब्यांचे वाण आणुन बागा लावल्या .नारळबाग तयार केल्या. पंजाबराव कृषी विद्यापिठाकडुन विदर्भातुन संत्राराेप आणुन बागा लावल्या.उन्मेश पवार एक उत्कृष्ठ शेती तज्ञ होते मात्र तितकेच रम व रमेचे दर्दी.याचा चंदु मुकादमास थांगपत्ताही नव्हता व त्यास त्याचे सोयर सुतकही नव्हतं.

चंदु मुकादम गढीत आल्याबरोबर गणा पवार बाहेर गावास जाण्याच्या गडबडीत गाडीवर होते. त्यांनी उभ्या उभ्या च बिंद्रा नायकिणीच्या मळ्यातला गहु कापुन तुझ्या ट्रॅक्टरनेच खळ्यात वाहणी करण्यास सांगितले व मजुरीही हिशोब न करताच चंदुच्या हातात कोंबली.चंदुनंही आगाऊ मजुरी मिळतेय पाहिल्यावर 'मालक उद्या दुपारपर्यंत कापणी करुन रातीला एक दोन वाजेला चांद उगवला म्हणजे खळ्यात गहु वाहुन टाकतो'असं आश्वासन दिलं.परंतु जवळ उभ्या असलेल्या पवारांचा माणुस चाचपडत मालक 'उद्या रातीला नवमी हाय 'हे थरथरत कानात कुजबुजला. तसं गणा पवार चंदु मुकादमास म्हणाला कि 'तु असं कर उद्या दिसाला गहु काप पण उद्या नवमीचं रातीला वाहणी नको करु त्या ऐवजी परवा दिसाला वाहणी कर'. चंदु काकुळतीनं म्हणाला.साहेब नवमी दशमी या तिथी आपणा सारख्या तालेवार लाेकांकरिता, आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या माणसांना सर्व दिवस सारखेच.दुसरी गोष्ट म्हणजे दिवसा बारा वाजेनंतर उन्हानं जिवाची काहिली व आग होते मजुर कंटाळा करतंय व रातीला घडीचा चांद निघाला म्हणजे थंड वातावरनात टिपुर चांदण्यात कामही चांगलं होतं म्हणुन आज दिसाला बारापर्यंत कापु व रातीलाच वाहनी करु. सरते शेवटी चंदु जुमानत नाही हे पाहिल्यावर गणा पवारानं का कु करत परवानगी देतांना तुझा ट्रॅक्टर मळ्याच्या बाजुला रस्त्यावरच उभा कर मळ्यात नेऊ नको असे बजावले व निघुन गेले.गाडीच्या आत काचा चढवलेल्या मागील सीटवर बांगड्या किणकिणल्याचा चंदुस भास झाला.

चंदुच्या टोळक्यातील दहा जोडप्यांनी म्हणजे विस मजुरांनी गणा पवाराच्या बिंद्रा नायकिणीच्या मळयात दुपारी बारापर्यंत कमरेपेक्षाही उंच वाढलेला गहु कापला . तरीही काही राहिलाच.उन्हं वाढल्याबरोबर उरलेला रात्रीच कापु मग वाहनी करु असे ठरवुन बापये गडी गव्हाच्या पेंढ्या बांधण्या करिता पाडा पडलेल्या केळीच्या बागेत गेले व खोड चिरुन दोऱ्या तयार केल्या व परतीला फिरले .मळ्यातलं वैभव पाहुन त्यांचेही डोळेे दिपले.केळीची बाग, संत्री,नारळ,आंब्याची बाग पाहुन डोळे विस्फारत होते ; पण का कुणास ठाऊक मळ्यात एक भेसुरता, भयानता भरलीय असं पुन्हा पुन्हा त्यांना जाणवत होत.

त्याच रातीला नऊ घडीचा चांद उगवल्यावर पुन्हा जायचं असल्यानं मजुर जेवण करुन झोपली .रातीला बारा वाजता चंदु मुकादमानं सर्वांना उठवलं चहा पिऊन सारी ट्रॅक्टरनं बिंद्रा नायकिणीच्या मळयात आली तोवर पुर्वेला चंद्रकोर निघाली. दक्षिणेकडुन सातपुड्याकडुन उन्हाळ्यातही शितल वारे जाणवत होते .टॅ्क्टर स्वत: चालवत चंदुनं वाहतुक दुर पडेल म्हणुन गणा पवारानं नाही सांगितलं होतं तरी मळ्यात गव्हाच्या शेतात घातलं.दहा बाया व दहा बापये एकुण विस मजुर पटापट उड्या मारत शेतात उतरली व राहिलेला गहु कापु लागली.चंदुनं ड्रायव्हर सीट वरच ताणुन दिली.थंड वाऱ्यानं लगेच डोळे लागले.निवांत वातावरणात गहु कापला जातोय फक्त दरातीचा चर्र चर्र आवाज सारखा चालु.इकडं चंदुचं घोरणं चालु. अचानक चंदुला घुंगरु वाजल्याचा आवाज झाला.अर्धवट उठत त्याला वाटलं आपण घरातुन निघायला चार महिने होत आले. कारभारणीनं याद काढली असावी. असा विचार करत तो पुन्हा झोपी गेला. तोच पुन्हा घुंगराचा आवाज कानात घुमु लागला.चंदुनं उठुन अवती भोवती पाहिलं त्याला गहु कापणाऱ्या मजुरा व्यतिरिक्त काहीच दिसलं नाही .पुन्हा डोळे मिटले.काही वेळ स्तब्धतेत गेलीे.आता आपल्या हातावर कुणीतरी जोरानं ओरबाडतंय असं चंदुला जाणवलं.तो तिरमिरत उठला. आजुबाजुला त्याला कुणीच दिसेना. तेवढ्यात त्याला आपल्या दोन्ही हातांना गार गार जाणवु लागलं.त्याची नजर संधीप्रकाशात हातावर जाताच तो बिथरला .रक्त दिसताच कुणी ओरबाडलं असावं म्हणुन तो मजुराकडं पाहु लागला. त्याला मजुरापैंकी कुणी केलं असेल का?अशी शंका वाटली.पन तो विचार त्यानं लगेच झटकला.तो खाली उतरायला लागला.पण पुन्हा अचानक त्यानं तो विचार पालटला. बसल्या बसल्या त्यानं मजुर मोजले तर एकविस भरले.पुन्हा उड्याही एकविसच.आपण तर विसच मजुर आणलेत मग एक जास्त कसं. त्याचा थरकाप उडाला. त्यानं शांत पणे बापये मोजले तर दहा मात्र बाया मोजल्या तर अकरा.त्याला कोडं उमगेना.मात्र काल आपण पवारास रात्रीचं नाव सांगितल्यावर त्याचा माणुस चाचपडत कानात कुजबुजला नवमी म्हणुन व गणा पवारानंही आपणास आधी नाही सांगितलं पण आपण ऐकत नाही हे पाहिल्यावर ट्रॅक्टर मळ्यात नेऊ नको म्हणुन बजावलं.आपण मध्ये आणलं यातच काही तरी गौडबंगाल आहे. घुंगराचा आवाज, हाताला खरचटणं व आता एक मजुर जास्त. काहीही करुन आपण ट्रॅक्टर मळ्यातुन बाहेर काढलं पाहिजे.पण मजुरांना घेऊनच.एक कोण जास्त हे कसं ओळखावं? त्यानं सर्व बापयांना पेंढया बांधण्याच्या निमीत्तान जवळ बोलावलं.कामात गुंग माणसं का कु करत जवळ आली. त्यानं हळुच झालेला प्रकार कथन केला.व हात दाखवले.माणसंही घाबरली.चंदुनं त्यांना आपापल्या कारभारणीना गाठा व पेंढ्या बांधण्याच्या निमीत्त करत ट्रॅक्टरच्या जवळ आणा व सर्व एकदम बसा.लगेच ट्रॅक्टर मळ्याबाहेर नेऊ.सर्व बापये आपापल्या कारभारणीना पेंढ्याचं निमीत्त करुन जोड्या केल्या त्या बरोबर एकटी राहीलेली ओळखली गेली. हळुहळु पेंढ्या बांधण्याचं नाटक करित मजुर ट्रॅक्टर कडं खसकु लागली.सर्व आवाक्यात येताच पटापट उड्या मारत ट्रॅक्टर वर बसली .चंदुही तयारीतच होता .त्यानं ट्रॅक्टर सुरु करत धडाक्यात मल्याबाहेर काढु लागला. तेवढ्यात माघावुन धावत येत ती बाई "अहो ड्रायव्हर पावणं,थांबा कि मला पण येऊ द्या नं ! नाहीतर माझं गाणं तरी ऐकुन जा " ओरडु लागली. ट्रॅक्टर मळ्याबाहेर निघेपर्यंत ती ओरडत ओरडत धावतच होती.मुस्कामाच्या पालीवर आल्यावर सर्वांचा जिवात जिव आला.मात्र चंदु मुकादमास दरदरुन घाम सुटला व तो ढोरासारखा हमसु लागला. तेवढ्यात ऊस तोडायला निघायची तयारी करत असलेले त्याच दुसरं टोळकंही गर्दी करु लागलं. कुनीतरी गोमुत्र आणुन शिंपडलं.कुणी हळद आणुन हातावर लावली तर कुणी सर्वांना चहा पाजला.चहा प्यायल्यावर साऱ्यांना हायसं वाटलं.तोपर्यत पुर्वेला फटफटु लागलं.

चंदुन मुकादमानं रात्रीचा सारा प्रकार गढीवर जाऊन सागावं व तुमचा राहिलेला गहु कुणाकडुनहीकापुन वाहून घ्याव पैसेही परत करु असं ठरवलं.दुपारला जेवन न करताच तो गढीवर गेला. गढी सुमसाम होती.बराच आत गेल्यावर ओसरी लागली. ती ओलांडताच दिवानखान्यात झुल्यावर एक सुंदर स्री हळुवारपणे झुलत होती.साधारण तिशीच्या घरात.चंदुला पाहिल्याबरोबर कोण हवयं? म्हणुन बसल्या बसल्या झुल्यावरनच दरडावुन विचारलं.चंदुनं मी मुकादम.मालकांना भेटायचं होतं म्हनुन आलोय.अरे मालक तर कालच नाशिकला गेलेत. का?काय काम होतं?चंदुला एकदम आठवलं कि काल आपण आलो तेव्हा च पवार बाहेर गावास जात होते.मग हि बया नक्कीच पवाराच्या कारभारणी असाव्यात. बाईकडं सांगाव कि नाही या द्विधा अवस्थेत असतांनाच बस मी चहा करते म्हणुन बाईनं सांगितलं.मग चंदुस हिम्मत आली त्यान चहास नकार देत. मालकिनीच्या पायाला बिलगन्याकरिता पुढे झुकणार तोच बाई विजेच्या चपळाईनं मागे सरकली.चंदुला पाय दिसलेच नाही.बाईनं काय सांगायचं ते मोकळं बोल मी मालक आल्यावर तुझा निरोप देते.मग चंदुनं रात्रीचा सारा प्रकार कथन करत कसा निसटलो ते कतन केलं व पैसे परत करु लागला. तितक्यात उसासाा टाकत पाठमोरी होत "बाबा कशाचा निसटला!उलट अडकलास. भोग हे, भोगावेच लागतात. भोगल्याशिवाय सुटका नाही.हे ऐकल्या बरोबर चंदु आणखीनच घाबरला. एका कोपर्यात बसण्याची खुण करत झुला झुलवत बाई बोलु लागल्या. तुम्हाला मालकानं नाही सांगितलं तरी तुम्ही नवमीच्या रातीलाच गेलात व पुन्हा मळ्यात ट्रॅक्टर नेला.ही महा चुक केलीत तुम्ही. गाणं ऐकुण जा असं सांगणारी तीच बिंद्रा नायकिन! तुला सविस्तरच सांगते.आमचे मालक गणा पवारांचे वडिलआमचे श्वसुर उन्मेश पवार त्या काळी खान्देशातील एक बडं प्रस्थ.सुंदरता ,ऐश्वर्य देवानं भरबरुन दिलेलं.पण बाईलवेडा.त्यावेली माळव्यातुन रामलिला करणाऱ्याचा एक फड गावात आला.त्यात हि बिंद्रा एक नर्तकी.नितांत लावण्य सुंदरी.आवाजही तसाच स्वर्गीय लाभलेला.हिला पाहिल्याबरोबर आमचे सासरे देहभान हरपले.व तिची मागणी घालु लागले हव्या त्या किंमतीत.परंतु हि कलाकार मंडळी जातीवंत खानदानी.आम्ही कला विकतो अदा विकतो संगितानं मनं रिजवतो.पन इभ्रत नाही.म्हणुन स्पष्ट शब्दात बिंद्रा व तिच्या बापानं नकार दिला.नकार ऐकायची सवय नसलेल्या पवारास तो आपल्या पौरुषत्वाचा अपमान वाटला.त्याच रातीला ड्रायव्हर ला साथीला घेत सर्वाचा पडशा पाडुन पवारांनी बिंद्रा नायकिनीला पालीवरनं मळ्यात पळवली.रानात वाघरानं हिरणी फाडावी तशी बिंद्राची इभ्रत नासवली.त्यावेळेस बिंद्रा मदिरेनं धुंद पवारास गुंगारा देत निसटलीही होती पण ड्रायव्हर नं पुन्हा शिताफिनं पकडुन तिला पवाराच्या हवाली केली.म्हनुन इभ्रत गेल्या र कुटुंब गेल्यावर विहीरीत उडी मारण्या अगोदर तिनं आक्रंदुन सांगितलं कि उन्मेश पवार आजची नवमी लक्षात ठेव .व हेही लक्षात ठेव कि यापुढे या मळ्यात जो कुनी ड्रायव्हर येईल तो परत जाणार नाही. व तिनं विहीरीत उडी घेतली.

एक महिना सासरे गावाकडं फिरकलेच नाही.पण हळुहळु सर्व शांत जाल्यावर आले.तोवर ड्रायव्हर अपघातानं मळ्यातच नवमीला गेला.पुढं उन्मेश पवारकोल्हापुर मुक्कामाला बरखा नावाच्या नर्तकीच्या नादी लागले.व तेथेच काही महिने घालवले.कालांतराने तिच्या सांगण्यावरुनच तिला मळ्यात घेऊन आले तीन दिवसांनी नवमी आली बरखाची बिंद्रा झाली व त्या रात्रीलाच मद्यधुंद अवस्थेत नाचुन नाचुन पवारास गठवलं लोकांना पवार झटक्यानं गेले असच वाटलं.पुढे मळ्यात राबता जरी वाढला पन वाहनाचा ड्रायव्हर परत येत नाही हे पाहुन कुणीच वाहन नेत नाही व नेलं तरी ते बाहेर रस्त्यावरच उभं करतात."आणि तु मध्ये आलास तु सुटणार नाहीस"शेवटच वाक्य चंदुला अलगच कुनीतरी बोलतय असं जाणवलं.बाई पुन्हा शांत झाली व चंदुला धीर देत म्हणाली बर ठिक आहे मालक आल्यावर कानावर टाकते.तु ये आता.

चंदु चार वाजता पालावर आला.त्याला राहुन राहुन शेवटच वाक्य आठवु लागलं.तो थोडा झोपला.ही वार्ता सर्व गावात पसरली.पाचला गना पवार परत आल्यावर त्यांना हे कळल्यावर त्यांनी लगेच माणसास चंदुला बोलवणं पाठवलं.चंदु गढीवर जाताच ओसरीवर गणा पवार बसलेले दिसले. चंदु बसला गणा पवारांनी घरात आवाज देत चहा मागवला.चहा घेऊन मालकिण आली चंदुनं पाहिलं. मालक या मालकिण बाई?

पवारांनी रुकार भरताच मग मी दुपारी येऊन भेटलो त्या कोण? पवारांनी दुपारी गढी तर बंद होती.परवा तुझ्यासमोर गाडीवर आम्ही गावाला गेलो ना.चंदुला परवा काचा चढवलेल्या गाडीत बांगड्या किणकिणल्याचा आवाज आठवला.मग दुपारच्या बाई पाया पडताना झटकन मागे सरल्याच आठवलं.पाठमोरं होऊन बोललेलं शेवटच वाक्य आठवलं व त्याची खात्री झाली कि दुपारी गढीत असलेली बाई बिंद्रा नायकिण?चंदु मुकादमास सर्व गढी गरगर फिरतेय व आपल्या अंगावर कोसळली असं वाटलं व तो जोरजोराने ओरडु लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ट्रक चंदु मुकादमचं प्रेत घेऊन अजिठ्याचे डोंगर चढुन त्याच्या गावात शिरला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror