भूखंड गिळणारे जिवंत राक्षस (काल्पनिक-नाटिका)
भूखंड गिळणारे जिवंत राक्षस (काल्पनिक-नाटिका)
बारीकराव:नमस्कार.
दगडू:यंदा ग्रामपंचायत निवडणूकीला तू उभा राहतो की मी उभा राहू?
बारीकराव:सध्या माझी जरा आर्थिक परिस्थिती नाही.त्यामुळे तूच उभा रहा.
दगडू:अरे पण गावातले अतिक्रमण जागेचे घोटाळे अजून संपले कुठे?
बारीकराव:होय,होय.विरोधी तर आपल्या मुळावरच उठलेय
दगडू:कसे काय?अरे बाबा आपण सरपंच,उपसरपंच पदावर असताना ग्रामपंचायतच्या जागा फुकट नावावर करून घेतल्या आहे.ते जर का माहीती अधिकारात उघड झाले तर आपली निवडणूक राहील बाजूला आणि जाऊन बसावा लागेल जेलची हवा खायला.
बारीकराव:होय तूझं भी खरंच हाय.काल खारीकराव मारुतीच्या डोक्यावर हात ठेवून शिव्या शाप देत होता आपल्याला.
दगडू:काय म्हणला तो नालायक?
बारीकराव:म्हणला, साल्यानी गाव नासावले,दारूची दुकाने उघडून शाळेतली पोरं बेकार केली.गावात जी जागा रिकामी दिसेल तिथे आपल्यानातेवाइकात वाटून घेतली.बंगले बांधले.बोले की दगड्या व बारीक भाडखावाने गरीबांच्या बायका सोडल्या नाही.जे पोट भरायला येईल त्यांच्या मुळावर हे उपटसुंभ.
दगडू:अजून काय बोलला तो?
बारीकराव:दगडू,त्यानी आपला पार पाणउतारा केला.
खारीकरावचा मित्र जाडेराव त्याने पण शिव्या दिल्या त्या सुद्धा मारूतीच्या पारावार बसून.
दगडू:काय शिव्या दिल्या त्याने?
बारीकराव:अरे,तो बोलला की गावच्या जागा अतिक्रमण करून जो कोणी फुकट घेईल त्याला मारूतीराया किडे पाडून मारील.गावाला फसविले चोरानी.दिवसा दरोडे टाकून गावाला लुटले.दरोडेखोर म्हणाला आपल्याला.
दगडू:अजून काय?
बारीकराव:खारीकराव म्हणाला,ज्याला मेल्यावर मोक्ष पाहिजे ना,त्याने गावातल्या बळकावलेल्या अतिक्रमणाच्या जमीनी ग्रामपंचायतीला परत करा.नाहीतर त्यांचा आत्मा इथेच भरकटत राहील.नरकात जातील.स्वर्ग प्राप्ती नाही होणार.
दगडू:अरे हो ते पण बरोबर हाय!पण काय करायचे आता,आपले जगणे अवघडच झाले आता.त्या दोघाना जरा बोलुन घ्या बारीकराव.
बारीकराव:काय,खारीकराव कुणाला शिव्या देताय?
खारीकराव:ज्यानी गावची जागा फुकट घेतली त्याला कळेल.गावच्या ग्रामपंचायतीचा वापर स्व:तासाठी व नातेवाइकांसाठी केला त्यांना,लागेल.गावचे पैसे ज्यानी खाल्ले त्याना मुळव्याध होइल.सडून मरतील असे चोरटे. ज्यानी ग्रामपंचायतीच्या पैस्याचा वापर स्वत:साठी केला त्याला कधीच मरण सुखाने येणार नाही. अहो,ज्याना गाव लुटून खायची सवय ते निर्लज्ज पुन्हा निवडणुकीला उभे राहतील.केलेली पापे झाकायला.त्याना इज्जत,अब्रू काय भी नाय.
जाडेराव:खारीकराव तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर हाय. मी तर म्हणतो यानी मेल्यावर ते भूखंड स्मशानात न्यावी.तरच याना मोक्ष मिळेल.
खारीकराव:मला तर असे वाटते की ,जो कोणी गावचे अतिक्रमणातील भूखंड मेल्यावर आपल्या सोबत नेईल त्याच्या वारसाना एक कोटीचा इनाम दिला जाईल.अजून बांधलेला बंगला सोबत घेतला तर त्याच्या वारसाना अजून ग्रामपंचायतीचा एक भूखंड फुकट मिळेल.
बारीकराव:यावरच ते बोलुन थांबले नाही तर बोलले की ते राक्षसांची औलाद आहे.माणसे असते तर ते थोडे घाबरले असते .पण ते राक्षसकुळीतले असल्याने सध्या देव संकटात सापडले आहे.तरी एक दिवस सत्याचाच उगवेल.मग लोकांना कळेल सत्य कधी लपत नाही.
