भुतांचा दवाखाना
भुतांचा दवाखाना


पडका बंंगला, तुटका दवाखान्याचा बोर्ड लटकलेला, दिवसा
बंगल्याच्या आजुबाजुला शुकशुकाट रहात असे. रात्री डॉक्टर,
नर्सची वर्दळ चालू होई. चुकून एखादे पेशंट येत. त्यावर इलाज
करत व दुसऱ्या दिवशी दिवसा तेच लोक पेशंटला घेऊन येत
तेव्हा बंगला बघून घाबरून जात असे.
काही वेळा बरेच बाहेर गावचे लोक रात्रीच येत .फेर तपासणीला रात्रीच बोलवत असे. पुष्कळ बायांची डीलेव्हरी
ह्याच दवाखान्यात झालेली आहेत. रात्री जवळपास अपघात झाला तर ह्याच दवाखान्यात येतात. आणि डॉक्टर, नर्स यांची
धावपळ चालू होते आणि पेशंटला वाचवतात. अशी ही कहाणी
पडक्या बंगल्याची स्थानिक लोकांच्या तोंंडी आहे. ह्या बंगल्याला लोकं भुतबंगला म्हणून ओळखतात. लोकं सांंगतात
दवाखान्यात सिलेंडरच्या ग्यास गळतीमुळे झोपेतच सर्व डॉक्टर
नर्स व इतर काम करणारे गुदमरून मेले. त्यांंचे आत्मे त्या बंगल्यात त्यांंची कामे करतात.
पडक्या बंगल्यात कबुतरे, चिमण्या ,मांजरी, कुत्रे,
साप, पाली , उंदीर, घुशी, वटवाघूळ ,कोळी कांतीगा यांची मालकी
असते. घर फक्त मानसांंचे नसते. नव्या घरात पहिला प्रवेश ह्या कीटकांचाच असतो. अशा पडक्या बंगल्यात दारू पीणारे,जुगार खेळणारे, चोर वापर करतात. अफवा पण पसरवतात म्हणजे त्यांना मोकळीक. त्यांंच्या मारामारी होऊन एकदा त्या जागी
मरतो. त्यांचेच लोकं भुताटकीने मेला अशी अफवा पसरवतात.
म्हणजे त्यांचा काळा बाजार कोणाला कळु नये असे त्यांना वाटते. अशा जागेजवळ जायला लोक घाबरतात. त्यामुळे
गुन्हेगारी वाढत जाते.