धुर्त आत्मा
धुर्त आत्मा


एका गावात विवेक नावाचा माणूस राहात होता. विवेक खुप हुशार आणि धूर्त होता. खुप शिक्षण घेतले होते. तो नेहमी इतरांना कमी लेखत असे त्याच्याकडे संपत्तीही भरपूर होती. त्याला बुद्धीचा व संपत्तीचा अंहकार झाला होता.
निसर्ग आहे म्हणून जग आहे. हे तो विसरत
चालला. पैसा आहे म्हणून सर्व आहे असे त्याला वाटत.
एकदा तो आजारी पडला. पटकन औषध घेऊन चांगला झाला. पैसा आहे म्हणून चांगले चालले. असा त्याचा समज. एक दिवस यमराजाने त्याचे दार ठोठावले विवेकने यमराजापुढे पैशाची गठ्ठी ठेवली. यमराजम्हणाले मी काय करु ह्या पैशाचे ? मला हे पैसे नको तुझा आत्मा पाहिजे. विवेक म्हणाला आत्मा काय कधीही नेता येईल आधी जेवण करा आराम करा. धुर्तपणा करत यमराजाला रिकामेच पाठवले. प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून परत पाठवत असे.
विवेक फिरायला गेला तेव्हा यमराज भिकारी बनून आला विवेकने भिकारीला हुसकावून लावले. विवेक फक्त नावाचा विवेक होता. नंतर यमराज कुत्रा बनून त्याच्या मागे
लागले. विवेकने दगड मारुन पळवले. विवेक किल्ला बघायला गेला. चालून दमला आणि बसला आरमशीर विवेकला झोप लागली तेवढ्यात यमराजांंनी सुंदर परीचे रुप घेतले आणि विवेकच्या जवळ गेले विवेक जागा झाला
परीच्या मोहात पडला त्याच क्षणी त्याचा आत्मा यमरूपी परीने काढून घेतला. अशाप्रकारे धूर्त माणसाचा आत्मा नेण्यासाठी यमराजाला धूर्त बनावे लागले. यमराजाने त्याचे कर्तव्य पार पाडले. तसेच माणसाने त्याचे धरती
वरील कर्तव्य पार पाडावीत. मरणाला घाबरून कर्तव्यापासून पळून जाऊ नये.