चांडाळ चौकडी
चांडाळ चौकडी


दोन जिवलग मित्र रोज कामाला सोबतच जायचे. एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. लहानपणापासून त्यांची मैत्री होती. आजपर्यंत ते मित्र आहेत. एक गल्ली, एक शाळा , एक कॉलेज ,एक ऑफिस असा त्यांचा प्रवास. त्यांना कुणीच वेगळे करु शकत नव्हते. चांगले शिकले मोठे साहेब झाले. पण त्यांना वाईट वळण लागले होते. दोघेही त्यांचे इतर मित्र गोळा करून आणत आणि रात्री कुठेतरी अडगगळीच्या ठिकाणी पार्टीला बसायचे. अती चढलीका मग एकमेकांशी भांडायचे. एकमेकांची चेष्टा करायचे.खायचे प्यायचे मज्जा करायचे अशी त्यांची रात्रचर्या चालायची आणि उशीरा घरी जायचे. त्यांचे घरचे लोकही त्यांना कंटाळले होते. गावातील लोकांनी बरेच उपाय करुनही ही चांडाळ चौकडी सुधारली नाही. दिवसेंदिवस त्यांच्या ग्रुपची संख्याही वाढत होती. त्यांना कुणी चांगले सांगायला गेले तर म्हणायचे आजकाल पिणे म्हणजे स्टेटस समजले जाते. आम्ही हलकी नाही भारी वाईन पितो. त्याशिवाय जगण्याची मजाच नाही. सर्व मित्रांचे लग्नाचे वय झाले होते. सर्व सुटबुट मध्ये चकाचक रहायचे. लोकांना सज्जन निरव्यसनी दाखवण्याचा प्रयत्न करायचे. रात्री कुत्रेसुध्दा त्यांचा अवतार बघुन घाबरायचे. कुत्रे त्यांच्यावर भुंकायची नाही. कारण कुत्र्यांनाही माहीत होते आपल्या एरियातला हायफाय दारुड्या साहेब येतोय. अंगावर गाडी घातली तर म्हणून कुत्रे लपून गंमत बघायचेकाही मित्रांची लग्न झाले. त्यामुळे ते बसायला येणं कमी झाले. कारण वाघावर स्वार होणारी दुर्गादेवी त्यांच्या घरी आली होती. म्हणून हे वाघ थोडे मांजर बनून जगत होते. पण काही दुर्गादेवीला न जुमानणारे होते. जे आई बापाकडून सुधारले नाही ते बायकोकडून काय सुधारतील त्या मित्रांंमधला एक मित्र नेहमी म्हणायचा " मी माझ्या कमाईची पितो तुमच्या काय बापाच जातं " अशाच एका रात्री सर्व मंडळी बसली. अमावश्येची रात्र होती. काही मित्रांना काहीतरी आवाज ऐकू आला.
त्यांनी आजुबाजुला पाहिले. काहीच दिसले नाही. पण आवाज ऐकू आला " मला पण द्या " .काहीजण घाबरले आणि पळुन गेले. हवेचा आवाज आला. पुन्हा ऐकू आले." मला पण द्या " आणि सर्व मित्र पळाले. फक्त जिवलग मित्र धीट होते. ते बसूनच राहिले. ते म्हणतात भीत्रे भागुबाई पळाले. आपण दोघे बहादूर आहेत. असे म्हणता. गप्पा मारत तिथेच झोपून जातात. त्यांचे घरवाले त्यांना शोधायला निघाले. त्यांच्या मित्रांना विचारले. त्यांनी झालेल्या सर्व घटना सांगितली सर्विकडे शोधले शेवटी विहिरी जवळ सापडले. घरच्यांनी त्यांना जागे केले.दोघे उठले.आजुबाजुला पाहून घाबरले आणि म्हणाले आम्ही विहिरीजवळ कसकाय आलो ? दोघांना समजावत रागवत घरी नेले. दोघांच्या डोक्यात तोच विचार आपण विहिरीजवळ कसकाय आलो. नंतर पुन्हा सारे मित्र जमले. त्यातले चार मित्र आले नाही भीतीमुळे आले नाही त्यांच्या लक्षात आले. गप्पांना सुरुवात झाली. खाता पीता गप्पा चालू झाल्या तोच लगेच घुंगरांचा आवाज आला. आता मात्र सर्वांची टरकली आणि पळत सुटले. डायरेक घरीच.पुन्हा दुसऱ्या दिवशी जिवलग मित्र भेटले आणि ठरवले बसण्याची जागा बदलायची. एका मित्राच्या बंगल्यामागे कंपाऊंडच्या भिंतीजवळ बसायचे ठरले. रात्री सर्व
जमले व बसले पण भिंतीवर एक घुबड बसलेले दिसले. घुबड आवाज करत होते. हुसकावण्याचा प्रयत्न केला.पण घुबड हालले सुद्धा नाही.बाकीचे इतर मित्र भीतीने घरी गेली आणि त्यांच्या तोंडची दारुच पळाली. आणि त्यांच्या कुटुंबाच्या सहवासात झोपली. मुलान मधले परिवर्तन बघून कुटूंबाला खूप आनंद झाला. जिवलग मित्र दारु पीऊन स्वर्गात गेल्यासारखे गप्प मारत होते. आणि म्हणत आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. आणि हसत .त्याच क्षणी त्यांच्या अंगावर कसलीतरी
सावली येऊन गेली. दोघे आजुबाजुला डोलत डोलत शोध घेऊ लागले. एक म्हणतो " अरे मित्रा कुणीही नाही इथे " चल आपण गाणे लावू मोबाइलवर असे म्हणताच गाणे आपोआपच चालू झाले. दोघेही घाबरले पण एकमेकांना दाखवत नव्हते. घुबड त्यांच्याकडे बघतच होते. पुन्हा सावली आली आणि त्यांच्या अंगवरुन निघुन गेली. आता मात्र दोघांना घाम फुटला. दारुच्या बाटल्या गायब झाल्या .मोबाईल चालू बंद होत होता. आता मात्र काही खरे नाही म्हणून त्यांनी पळ काढला. त्यातला एक भींतीवरुन पळाला. आणि एक सावलीत अडकला. तो घामाघूम झाला. कोण आहे सोड मला असे म्हणु लागला. त्याचा आवाज बसला आणि तो बेशुद्ध झाला. जो मित्र पळून गेला होता तो इतर लोकांना घेऊन आला. आणि बेशुध्द झालेल्या मित्राला दवाखान्यात नेले. काही दिवसांनी तो चांगला झाला. सर्व मित्रांची दारु सुटली. आता ते चांगला संसार करतात. आणि समाजसेवा करतात. पण भुतांची भीती मनात आहे. भुतांमुळे व्यसन गेले याचा आनंदही वाटतो. भुत खरे होते की खोटे हे जानुन घेण्याचा कधी प्रयत्नही त्यांनी केला नाही. भुतेच फार डेंजर होते. ते भुत जेवढे भयानक होते तेवढेच प्रेमळ होते. त्या होत्या त्याच गावातील दोन खोडकर बहीणी. आपल गाव व्यसनमुक्त व्हाव म्हणून केलेला भयावह ड्रामा. मुलांच्या आईवडिलांना सर्व नाटक माहीत होते. पण ह्या भावांच्या बहीणींनी आईवडिलांकडून वचन घेतले. जर तुमचे मुलं चांगले रहावे असे वाटत असेल तर शेवट पर्यंत आमचं नाटक त्यांना सांंगु नका. आमचे गाव सुधारले याचा आम्हाला खूप आनंद आहे.