Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

भाऊबंदकी

भाऊबंदकी

5 mins
292


           माझा एक लहानपणीचा मित्र जो माझा वर्गमित्र पण होता.आम्ही दोघेही थोडयाशा अंतरावर एकाच वार्डात आपाल्या गांवात राहत होतो.त्यामुळे माझा आणी त्याच्या कुटुंबाचा चांगलाच दाट घनिष्ठ संबंध होता. त्याचा भाऊ पण माझ्या साठी ही माझ्या वडिल भावा सारखाचं होता, आहे, आणी समोर ही राहानार !. आजही भाऊ आणी वहिणी माझ्या सोबत त्याच प्रेमाने वागतात. माझे, माझा मित्रा सबोत ही तितकेच दाट, घनिष्ठ आणी पक्के संबध आहे. आम्ही दोघे ही सेवानिवृति नंतर एकाच शहरात राहतो. मध्यंतरी त्याचा आणी माझा जास्त सबंध नौकरी मुळे राहु शकला नाही, कारण तो आणी मी सारखे फिरस्तीवर बदल्या मुळे राहत होतो. तो आणी मी आता सेवानिवृत्ति नंतर एकाच शहरात राहतो. अजुन हृदयाच्या जमिनीतील प्रेमाचा ,जीव्हाळ्याचा ओलावा कायम असल्यामुळे, आम्ही मध्ये-मध्ये कार ने आपाला जुण्या मित्र-मंडळीला भेटायला जात असतो. काकूंची स्मरण शक्ति जवळ-जवळ क्षीन झाल्या सारखीचं होती. त्या कोणालाही ओळखत नव्हता !. एक-दोन वर्षा पूर्वी काकू व माझा मित्रा सोबतच राहत होते. त्या नेहमीच फिरता- फिरता रस्ता विसरुन जात असतं. मग माझ्या मित्राची तीला शोधतांना एकदम तारंबळ ऊडुन जात होती. त्यामुळे त्याने बहिणीच्या मदतीने तीला वडिल भावाकडे छोट्या गांवात नेवुन ठेवले होते. काकूंना पेनशन मिळत असल्यामुळे आर्थीक अडचण नव्हती. तशे भाऊ आणी वहिणी काकू कडे चांगले लक्ष्य ठेवत होते. मी मध्ये- मध्ये काकूला गांवाला गेल्या नंतर भेटायला जात असो. माझा मित्र गांवात गेल्यानंतर ही संबंधात कटुता आल्यामुळे घरी जावु शकत नव्हता. मी मग काकूच्या प्रकृतिची कल्पना त्याला देत होतो.

       अशी ही परिस्थिति पाहुन मला ते जुने प्रसंग आठवत होते. तो आणी मी दोघे आप-आपल्या घरात लहान होतो. त्यामुळे आम्ही दोघांनी सर्वांचे लग्नात धावु-धावु काम केले होते. त्याचे आणी माझे भाऊजी, वहिणी आम्हा दोघानाही आपल्या साळा आणी भाऊजी सारखी वागणुक देत होते. माझ्या मित्राचे आणी त्याच्या वहिणी मध्ये अगदी आई व मुला सारखे संबंध होते. पण असे काय झाले कि दोन्ही भावामध्ये कधी न मिटणारी कटुता जी आली होती. हे समजने माझ्या आवक्या बाहेरचे होते. त्याला मी बरेच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला.तो म्हणतो हे तर मलाही समजुन नाही राहिले. वडिल भावाने गांवचा पूर्ण प्लॉट आपल्या नांवा वर मला न सांगता करुन घेतला होता. मी त्याला म्हटले ,अरे तुला काही कमी आहे कां? मी तर तो प्लॉट त्यालाच देणार होतो. तो मला पाहिजे नव्हता. नंतर मी गांवातील एका भाऊला, जो आम्हाचा मित्र पण आहे. आणी तो माझ्या मित्राच्या भावाच पण खास मित्र आहे. त्याला मी विचरले. अरे, तु यांचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न कां करत नाही.? तो म्हणाला, मी खुप समजावण्याचा प्रयत्न केले. पण ते अशक्य वाटते. त्याला मी विचारले कि याचे मागे असे कोणचे ठोस कारण आहे. तो म्हणाला नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटते. तुझ्या मित्राने आपल्या वडिल भावाने जी त्याच्यासाठी सोयरिक आणली होती. ते तुझा मित्राने नाकारली होती. आपल्या सोई आणी मनानुसार एका शिक्षिके सोबत लग्न केले होते. अरे त्याची पत्नी तर स्वभावाने आणी रुपाने खुपच सुंदर आहे. मग कुठे फाटले. अरे जो संबंध त्याने याच्या साठी आणला होता ती पण सुंदर आणी एकटिच होती. आणी श्रीमंत पण. पण तीची संपत्ती थीडी वादग्रस्त होती. तुझ्या मित्राचा भाऊ तहसिल मध्ये असल्यामुळे त्याला आत्मविश्वास होता कितो सर्व लफडे, अर्थात कानुन अडचणी दूर करु शकत होता. त्याचा हा डाव फसला आणी त्याने हा आपला अपमान समजुन मनाला लावुन घेतले असावे. जनु भाऊंच्या योजनेचे माझ्या मित्राने अष्ट्कोणी वाटोळे केले होते.असे मला वाटते. त्यामुळे भाउंचे कदाचित पितळ उघडे पडले असावे !. पण ही कटुता इतक्या अटी-तटीला जाईन असे मला वाटले नाही. सगळी कडे कोरोना मुळे भीतीचे वातावरण असल्यामुळे व्यक्तिगत संबंध दुरावले गेले होते. ईच्छा असतांनाही कोनी कोणाला भेटायला जावु शक्त नव्हते.

      माझ्या मित्राचा एक दिवस मला सकाळी फोन आला होता.अरे आई मरण पावली. अशी बातमी मला गांवावरुन प्रदिप ने दिली आहे. तु जरा माहिती मिळवतो कां ?. मी लगेच भाऊच्या मित्राला फोन केला. आणी विचारपूस केली. त्यांनी सांगितले माझी पण प्रकृति मागच्या आठ-दहा दिवसा पासुन चांगली नाही. आता मोठी हिम्मत करुन काकूच्या शेवटच्या दर्शनासाठी जात आहे. मी त्याला आग्रह केला. अरे मी माझ्या मित्राला व बहिणीला लगेच निघण्यासाठी सांगतो. तु शवयात्रा विलंब करण्याचा प्रयत्न कर. तशी मी लगेचं माझ्या मित्राला सुचना पण दिली होती. माझी पण प्रकृति चांगली नव्हती म्हणुन मी त्याच्या सोबत जावु शकलो नाही. तो जुळवा-जुळव करु निघाला होता. ईकडे शवयात्रा पण निघाली होती. पण भाऊनी याची सुचना कोण्या बहिणीला किवा जावायाला दिली नाही. त्याने ठरवले होते कि कोणालाही यांच्या पैकी आईचे अंतिम दर्शन घडु द्यायचे नाही. प्रेत जसे मशान घाटावर पोहचले. प्रेताला अग्नी देण्यासाठी भाऊ सर्व विधी फटा-फट करण्याचा प्रयत्न करत होते. आमचे मित्र, आपल्या मित्राचा किती वेळ लागेल याचा आदावा घेत होते. शेवटी त्या मित्रांना भाऊला सांगावे लागले कि काकूंचा लहान पुत्र आणी मुली थोड्याच वेळेत येनार आहे. आपण वाट बघावी !. भाऊने तर्क दिला कि खुप वेळ झाला आहे. प्रेता सोबत येनारे किती वेळ वाट बघणार ?. आणी ते थांबायला तयार नव्हते. शेवटी त्यांना चेतावणी द्यावी लागली. जर तुम्ही वाट बघायला तयार नसालं तर आम्हालां पोलिस तकरार तुम्हच्या विरुध्द करावी लागेल. मित्र गाडी घेवुन पोलिस तकरार करण्यासाठी निघणार, तेव्हाच काही वरिष्ठ नागरिकांना त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशी भाउंची थोरवी जगाला दिसली होती. शेवटी नाइलाजास्तव वाट बघावी लागली. शेवटी थोड्या वेळा नंतर माझा मित्र आणी आईंच्या मुली, मी दिलेल्या सलल्यानुसार सरळ मशान घाटा वर पोहचले होते. मित्र आणी अन्य लोकंनी काकूंचे अंतिम दर्शन घेतले. रुढी प्रमाने, माझा मित्र कनिष्ठ पुत्र असालामुळे प्रेताला त्याने अग्नी दिली होती. व बाकीच्या विधि पण आटपल्या होत्या. म्हातारी गेल्याचे दुःख नाही पण काळ माझ्या मित्राला सोकावला होता.

     पावसाने भिजवले अन नवर्याने झोडपले तर सांगनार कोणाला ?. अशी गत माझ्या मित्राची झाली होती. आई हयात असतांना तीच्या सर्वच मुली-मुलांना तीचा जिव्हाळा असने स्वाभाविक असते. व्यक्तिगत कारणामुळे हा जिव्हाळा तोडुन टाकने कितपत योग्य आहे. मेलेल्या म्हशीचे पाच शेर दुध. आणी नंतर आईचे खुप गुण-गाण करायचे याला काही अर्थ नाही. दुःखाची गोष्ट आहे. ज्या आई ने मुलांना जन्म दिला. त्या आईचा मृत्यु पण त्याच्यांतील कटुता घालवु शकला नाही. अर्थात रक्ताच्या संबंधा पेक्षा मानसाचा अंहकार किती मोठा असतो. हे यावरुन कळते. मानसाने जर अंहकार सोडला नाही ,तर त्याचे किती दुःखद वाईट परिणाम परिवाला भोगावे लागतात. या कडे सर्वांनी अंहकार बाळगतांना विचार करावा !. मत भेद असावे,पण मन भेद असु नये.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy