भांडणातलं प्रेम
भांडणातलं प्रेम
गेले महिनाभर कस्तुरी आणि सौरभमध्ये सतत वाद होत होते. बोलायचे नाही एकमेकांशी... कस्तुरी कितीही रागावली तरी सौरभ तिला मनवायचा... पण त्या दिवशी त्यांच भांडण इतकं विकोपला गेलं की दोन दिवस बोलचाल बंद होत... त्या दिवशी बराच वेळ झाला तरी सौरभ ऑफिस वरून आला नाही...उशीर होणार आहे तर कळवता पण येत नाही, कस्तुरी मनातल्या मनात सौरभचा राग करत होती.. वाट बघून ती शेवटी जेवणाला लागली..नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा पाऊण तास जास्त झाला तरी तो अजून आला नाही.आता रागाची जागा काळजीने घेतली.. ती दाराजवळ येऊन सारखी बघून जात होती. दोघांमध्ये भांडण असलं तरी तो आला नाही म्हणून तिला काळजी वाटू लागली ..इतका का वेळ लागला आज....अजून कसा आला नाही....अस म्हणून तिने त्याला call केला ....रिंग जात होती. पण तो उचलत नव्हता...ती सारखी call करत होती त्याला.... आता मात्र तिच्या मनातली काळजीची जागा वाईट विचारांनी घेतली... कुठे अडकला असेल....काही झालं नसेल ना.....कस्तुरी, कसले अभद्र विचार करतेयस तू( मनातच बोलत होती) तिने त्याच्या सगळ्या collegues ना call केला... त्यांच्याकडून कळलं तो तर कधीच निघालाय... कस्तुरी पूरती रडवेली झाली ...एक collegue म्हणाला मी विचारतो कोणाला तरी तुम्ही काळजी नका करू...पण तिचे कशातच मन लागेना... थोड्या वेळाने तिने पुन्हा त्या collegue ला कॉल केला तो म्हणाला माझं बोलणं झालंय... येतोय तो...तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला... थोड्यावेळाने सौरभ आला...पण तिने त्याला काहीच जाणवू दिल नाही की ती त्याची वाट बघत होती...
रात्री जेवण वगैरे झाल्यावर तिने त्याला msg केला ( direct कस विचारणार म्हणून)
कस्तुरी- माझा कॉल का नाही घेतलास???
सौरभ- मोबाइलला problem झालाय...
कस्तुरी- Collegue चा कॉल कसा उचलला...anyways तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही...
सौरभ- तुला काहीच वाटत नाही ना आपण बोलत नाही ते...का वागतेस माझ्याशी असं😢
कस्तुरी- मीच तर सांगितलं तुला माझ्याशी बोलू नकोस .उगाच माझ्यामुळे तुला त्रास कशाला
बराच वेळ बोलून मग दोघांचं मन थोडं हलकं झालं...दुसऱ्या दिवशी सकाळी तिने त्याला एक dress चा photo पाठवला.. मी घेऊ का हा dress...
घे ना छान आहे..
सौरभ आता बोलतोय माझ्याशी...कस्तुरी मनोमन सुखावली...तिला वाईट पण वाटतं होत...खूप काही बोलली होती ती सौरभला...चुकलंच माझं... वाईट वागले मी त्याच्याशी... तिला स्वतःचा राग यायला लागला.. तिने त्याला sorry चा msg पण पाठवला...
कस्तुरी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागली... थोड्या वेळाने अचानक तिला काहीतरी जाणवले... ती खिडकीजवळ गेली तर सौरभ येताना दिसला...
तिला जाणवलं की तो आलाय.…ती खूप खुश झाली...
तो घरी आला... दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि घट्ट मिठी मारली...
माझा सगळा थकवा निघून गेला...सौरभ म्हणाला...
5 वर्षाच्या संसारात सौरभ हे प्रथमच बोलत होता...
कस्तुरी च्या डोळ्यात अश्रू आले...
तात्पर्य - जेव्हा भांडण होत तेव्हा दोघांच्या हृदयामधील अंतर वाढतं आणि जेव्हा आपण सगळं काही विसरून पुन्हा एकत्र येण्याचा विचार करतो तेव्हा ते अंतर कमी होतं..
(कस्तुरी आणि सौरभ मधील अंतर एवढं कमी झाल की त्याच्या हृदयाचे ठोके तिला लांब असून पण ऐकू गेले आणि तो आल्याचा भास झाला..)
*भांडण झालं तर एकाने तरी आपला ego बाजूला ठेवून नमतं घ्यायला हवं...
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
*लडाई झगडा भी जरुरी है क्योंकी बिना तडके की दाल किसीको पसंद नहीं

