STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग25रूनझून पैंजनाची"कादंबरी

भाग25रूनझून पैंजनाची"कादंबरी

15 mins
181

भाग25 रूनझून पैंजनाची"कादंबरी


कोणास ठाऊक सुमेधाच्या आत कोणते बवंडर सुरु होते ती काहीच कशी बोलत नव्हती की जाणून-बुजून अबोल झाली होती आता तीच्या जाण्याची ही वेळ जवळ आली होती प्रशांत आधी ही जगतच होता आताही जगणार होता.. कदाचित तिच्या बोलण्याने प्रशांतला तिची आशा लागेल म्हणूनही सुमेधा बोलत नव्हती की काय.. 


तिला त्याची काळजी वाटत असली पाहिजे म्हणून ती अशी मूक होऊन दुःख लपवित होती. तिला आज खरंच आनंद झाला होता तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज आलेलं होतं, सुमेधाने आज प्रशांतच्या चेहऱ्याला दोन्ही हातात घेऊन त्याच्या माथ्यावर ओठ टेकवले प्रशांत आज चुपचाप स्टॅच्यू सारखा तिच्या समोर बसून होता त्याला सुमेधा काय करते आहे ते काहीच कळलं नाही तो तसाच मूक बसून होता ,


आज त्याने वैद्य बाबाशी झालेला संवाद तिला सांगितला,

तेव्हा तिच्यात अचानक काही अघटित बदल दिसला ,ती उठली आणि प्रशांतच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला आपल्या मिठीत घेऊन तिने त्याचे समर्थन केले, असं वाटत होतं की आता ती निश्चित झालेली आहे...प्रशांतला जणू अनमोल खजाना मिळाला होता....प्रशांतला काय करू काय नको असं झालं होतं आनंदाने ताडकन उभा झाला..तोच सुमेधाने त्याचे दोन्ही हात धरून हळूच आपल्या जवळ बसवले ती पण उठून बसली होती....


आणि सुमेधाच्या मुखातून आवाज निघाला. 

सुमेधा म्हणत होती..! 

" प्रशांत खूप छान खूप छान" त्या दोन शब्दांनी त्याचे सांत्वन केले नी पुन्हा ती मूक अबोल झाली ... 


प्रशांत अचंभीत होता...

सुमेधाला म्हणू लागला बोल ना सुमे !،،अजून काहीतरी बोल ना माझ्याशी तू माझी खास मैत्रीण आहे ना ! बोल ना मग अशी मौन पांघरून घेउ नको ; माझ्यावर अशी तू रागावली आहेस का... माझ्याशी तू का बोलत नाही ! परंतु तिने दुसऱ्यांदा शब्द ही उच्चारला नाही . 

 सुमेधा बोलत असल्याचा आभास तर प्रशांतला झाला नसावा कारण ती पुन्हा बोलली नाही....


सुमेधाला गावी न्यायची तयारी झाली होती राजीव आणि राघव तिला न्यायला आले होते . सुमेधा एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी वागत होती चल म्हटलं तर चालायची बैस म्हटलं तर बसायची रेल्वे स्टेशन वर प्रशांतने आपल्या गाडीने नेले .औषधी वगैरे सर्व साहित्य ठेवली आणि 


गाडी थोडी लेट होती त्यामुळे त्यांना गोष्टी करायला वेळ मिळाला...

राजीव प्रशांतला म्हणाला .!

आम्ही तुमचे उपकार जीवनभर विसरणार नाही तुम्ही आम्हाला देवासारखे भेटलात तुमचं कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावं हे आम्हाला समजत नाही ..

प्रशांत म्हणाला .!

आभाराची भाषा बोलू नका राजीव मला ती भाषा आवडत नाही मी जे काही केले ते निस्वार्थ भावनेने केले सुमेधा ही माझी बालपणीची मैत्रीण आहे त्यामुळे केले आणि माणुसकीच्या नात्याने केले....


राघव दोषी असल्यासारखा वागत होता नजर वर करून सुद्धा त्याने बघितले नाही तो राजीवच्या बाजूलाच जमिनीवर बघत असायचा आणि सुमेधा फक्त प्रशांतला एकटक बघत असायची... पण मुखातून एक शब्दही बोलली नाही ...

प्रशांतला तिच्या डोळ्यात दुःखाची छाया दिसली.. प्रशांतच्या हृदयात कालवाकालव झाली ..संर्वांगात थरकाप सुटला त्याला क्षणात हे जीवन नकोसे वाटायला लागले तो एकदम गर्भगळीत झाला . तिथून पळूनही जाऊ शकत नव्हता .. शक्ती एकवटून उभा होता त्याचे लक्ष फक्त सुमेधाच्या डोळ्यावरच होते त्या नेत्रात तो स्वतःला पेरत होता..अन् सागरी लाटेत वाहत होता.. परंतु तो तिथे काहीच बोलू शकला नाही किंवा सुमेधाचे दुःख दूर करू शकला नाही आणि करू शकत हि नव्हता.


धाडधाड करीत रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मवर आली. प्रशांतने प्रवासाची सर्व व्यवस्था चोख पणे केली होती .बुक केलेल्या सीटवर शहानिशा करून व्यवस्थित बसवले आणि एक-दुसर्‍याचे सगळ्यांनी गळाभेट घेतली व प्रेमाने आलिंगन दिले भावभावना प्रगट केल्या. स्वतः सुमेधाला आधार देउन प्रशांतने रेल्वे बोगीत बसविले आणि अजून दोघांना क्षणभऱ्याचा सहवास लाभला . त्याने तो श्वास मोगऱ्याच्या सुगंधासारखा आत अंतकरणात भरला.....


ट्रेन सुरू झाली हळूहळू गडगडत ती समोर जाऊ लागली आणि प्रशांत सारखा सुमेधा कडे बघत राहिला.आणि सुमेधा ही एकटक प्रशांत कडे बघत होती..प्रशांतची नजरानजर झाली सुमेधाची नजर माझ्यावरच आहे ती मला एकटक बघत आहे ती नजर प्रशांतने चक्क आपल्या हृदयात सामावून घेतली डोळे बंद करून कितीतरी वेळ तो ट्रेन गेल्यावर तसाच तटस्थ उभा होता त्याला काहीच भान नव्हते फक्त जातानाची ट्रेन दिसली होती अन ती पण गायब झाली ..आता फक्त सुमेधाचे डोळे दिसत होते...


कुणाच्यातरी हाकेने व हलवल्याने प्रशांतची तंद्री भंग झाली तो दचकुन मागे वळला तर प्रशांतच्या ऑफिसचा सहयोगी मित्र होता ..सोबत सोबत प्लॅटफॉर्म बाहेर आले प्रशांतने गाडी काढली तो मित्र पण गाडीत येऊन बसला प्रशांत गाडी चालवत होता मित्र काय बोलत होता इकडे त्याचे लक्ष नव्हते मित्र सतत बोलत होता प्रशांत फक्त हो नाही मध्ये उत्तर देत होता प्रशांत कोणत्यातरी तंद्रीत होता समोरचे त्याला काहीच दिसत नव्हते तो आपल्या विचारात गर्क होता.... तेव्हा समोरून येणारा ट्रक अगदी समोर आला होता. त्या मित्राने बघितले आणि तो फार घाबरला तेव्हा त्या मित्राने स्टिअरिंगवर ताबा मिळवून गाडी वळवली रोडच्या कडेला गाडी लागली ट्रक फास्ट होता तो थांबला नाही.. त्यावेळी कल्पनाही करू शकत नाही , कुणास ठाऊक काय होणार होते .अशी अघटित घटना घडली असती .मित्राच्या रूपाने वाचण्याकरिता प्रत्यक्ष देवच आला होता...प्रशांतने आपल्या जीवनात खूप काही चांगले काम केले होते म्हणून प्रत्यक्ष ईश्वर त्याच्या पाठीशी होता .यावेळी असाच प्रत्यय आला...


प्रशांत आपल्या निवासावर आला आणि कितीतरी वेळ तसाच पडून विचार करू लागला , मनात सारखं द्वंद युद्ध सुरू होते... सुमेधा अशी का वागली असेल माझ्याशी ती का बोलली नाही ..की खरच तिची वाचा गेली असेल...

त्याचे मन जागेवर नव्हते त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटत होते तो कुणाशीच बोलत नव्हता आपल्याच दिनदुनियेत तल्लीन ,रूम मध्ये पडून राहायचा ना खाण्याचा होश ना पिण्याचा होश त्याची अशी अवस्था सुमेधा गेल्यापासून होती ...तो पार खचला होता.. प्रशांत कित्येक दिवस ऑफिसला गेलाच नाही त्याची स्थिती फारच दयनीय होती बरं झालं तिथे प्रशांतचे आई-बाबा पण आले होते...

आई-बाबा सारखी मुलाची चिंता करीत होते परंतु ही स्थिती पाहण्याखेरीज ते काहीच करू शकत नव्हते..


सुमेधा पण आपल्या घरी परतली होती ती स्वस्थ होऊन आली होती पण ती मुळात अस्वस्थच होती तिच्या मुली रिया नित्या आई आई म्हणून आनंदाने नाचू लागल्या आणि आईचा लाड करू लागल्या परंतु सुमेधा तशीच स्थितप्रज्ञा सारखी तटस्थ उभी होती...तिने काहीच संवेदना जाहीर केल्या नाहीत ती अविचल मुर्तीसारखी भासत होती..

कालचक्र फिरत होते रोज दिवस निघायचा रोज रात्र व्हायची सुमेधा शुन्यात बघत बसायची अश्यातच एक महिना उलटला , राघव पण तिची खूप काळजी घ्यायला लागला होता तिला आधीसारखी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले...


आताशी रिया नित्या मोठ्या झाल्या होत्या त्यांना समजत होते की आईला काहीतरी झालेले आहे तीची तब्येत बरोबर नाही आधीसारखी आई राहिलेली नाही सुमेधाचे आई-बाबा सासू-सासरे सगळे हळहळ व्यक्त करीत होते आणि मुलीला पाहून अश्रु गाळत होते....कुणाची दृष्ट तर लागली नसेल ना ; किंवा कोणी जादू तर केली नसेल ना; टोटका तर केला नसेल ना ; काय झाले असेल माझ्या टवटवीत सुमूला आईची; भाबडी माया कोणी पिर फकिर ,जाणत्याचा पत्ता सांगायचे तिथे तिथे आई-बाबा सुमेधाला घेऊन जायची अनेक गंडे ताईत.अंगारे घूपारे केले पण काहीच फायदा झाला नाही....

राघव सुमेधाला पाहुन पश्चातापाच्या अग्नीत जळत होता अशी सुमेधाची अवस्था माझ्यामुळेच झाली आहे आणि मीच त्याला कारणीभूत आहे असं म्हणून तो स्वतःलाच दोष द्यायचा आणि घरी मुलींची आणि सुमेधाची सेवा करायचा ड्युटी पण रोज नित्यनेमाने करायचा...


इकडे प्रशांतचे आई-वडीलही ह्याच गोष्टी करीत होते . झाड फुक गंडे ताईत आजमावले पण कवडीचाही फरक जाणवला नाही नुसता प्रशांत क्षितिजापलीकडे बघत असायचा आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी अस्फुट बोलायचा.. त्याची भाषा त्याचे बोल कुणासही समजत नव्हते....

परंतु एवढ्या हि दुःखात तो रोज ऑफिसला वेळेवर जायचा ऑफिसचे काम अचूक करायचा या व्यतिरिक्त गाडी घेऊन कुठेही भटकत राहायचा.... सुमेधाच्या आरोग्यासाठी केलेले नवस न चुकता तो बरोबर फेडत होता ...ज्या ज्या ठिकाणी द्यायचे कबूल केले होते त्याच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी जाऊन त्याने ते पूर्ण केले होते..


नियतीने त्याच्यावर सूड घेतल्यासारखे अनेक वार केले होते... जसा धागा तुटावा आणि माळेतले सारेच्या सारे मनी गर्तेत जावून मिळावे.आणि उचलनाऱ्याची कशी गत व्हायची तशी गत प्रशांतची झाली होती...अशी जीवघेणी हास्यास्पद त्याची कहाणी होती.. जीवनातला प्रत्येक क्षण हा अनमोल असतो अस म्हणतात ना ..! प्रशांत जीवनाचा प्रत्येक क्षण हा हा विषासमान घोट घोट घेउन एकटा पीत होता....


कवी गौतम सुत्रावेंच्या कवितेच्या काही ओळी मला आठवल्या،،،،


एकदा फुलली सखी प्रीत अंतरात 

सोबतीस तू ना आता संपला वसंत..!!

सुधा पौर्णिमेची प्यालो एकरूप दोघे झालो 

स्वप्न मिलनाचे बघता जाग ये क्षणात..!!


फारच विरह ग्रस्त अश्या कवितेच्या ओळी आहेत पुढे कवी म्हणतात ..!،،


प्रीतीच्याच प्रतिकासाठी तू उजळलेली ज्योती! 

मालवून जाता दाटे , या तिमिर जीवनात!! 


दिला शब्द मोडुनी जाता

तुजविन केवळ आता 

गंधहीन सुकली सुमने

उरे ओंजळीत..!!


इतक्या भयंकर अशा या वेदनेवर फुंकर तरी कशी घालावी एक जळजळीत तारा धाडकन जमिनीवर आदळला अन तुटून पडला.... कशी ही प्रेम नशा कसा हा प्रेम रोग लागला होता ...कशी होती हि आंधळी प्रीत ,,,,अशी कशी जीवघेणी ही प्रीत प्रशांतला पूर्णतया भोवली होती....आणि मजल-दरमजल फक्त एकटाच भयान काहूराचे ओझे घेऊन तो मार्गक्रमन करीत होता....

 34" 

कोण्या कवीच्या रचनेच्या काही ओळी ،،


" निवडुंग होणं सोपं असतं 

अंगावर काटे मिरवता येतात

पण प्रियकर होणे अवघड असतं 

काळजात काटे ऋतवावे लागतात"


किती सत्य अधोरेखित केलेलं आहे या कवींनी काळजाचे तुकडे व्हावे असे....  


अशा ह्या शापाने होरपळणारे आयुष्य आपल्याच हाताने आपलं सरण रचणारा आपलं अख्ख आयुष्य वातीप्रमाणे जाळणारा प्रशांत.


तिकडे सुमेधाला भेटायला तिची बालपणीची मैत्रीण सई आली होती सुमेधाची दशा पाहून रडू लागली ...तरीपण तिला आपली प्रिय सखी जिवंत आहे हीच एक जाणीव सुखावुन गेली मनातल्या मनात म्हणत होती माझी सुमू उभी तर आहे ना "हाड आहे तर मासंतर येणारच "आहे.. सई आल्याने सर्वांना आनंद झालेला होता ،सईची सारखी बडबड करण्याच्या सवयीमुळ घर कसं गजबजलेलं वाटत होतं.... रिया नित्याची तळमळते ने विचारपूस आणि कोड कौतुक करीत घरात आवरासावर करणे पण तिचे सुरू होते सुमेधाला पहिल्यासारखी करायची हे मनोमन ठरवून तिने आपली कला पणास लावली होती पण सारे प्रयत्न व्यर्थ झालेले पाहून सईने राघवला विचार घेतला,आणि समजाविले की काही दिवसाकरता सुमेधाला माहेरी राहायला पाठवा कदाचित तिथे सुमेधाला काही आरोग्यात सुधारणा होऊ शकते तुम्ही म्हणत असाल तर मी तिला आत्ताच घेऊन जाते कदाचित तिथल्या वातावरणात तिला काही फरक जाणवेल राघव म्हणाला सुमेधाच्या तब्येतीबद्दल जे काही करता येईल ते करा राघवची परमिशन मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी..रिया नव्याला आईच्या तब्येतीबद्दल कल्पना दिली आणि लगबगीने तयारी केली ....


नव्या म्हणाली सई मावशी !.. आई पूर्वीसारखी बरी होईल ना गं.. सई म्हणाली हो अगं नक्कीच गं रिया नव्या आईच्या आरोग्याची काळजी आहे मला म्हणूनच तिला मी आज गावी घेऊन जाणार आहे तिकडे तिच्या खूप बालपणीच्या आठवणी आहेत तुमच्या आईच्या तब्येतीत तिकडे सुधारणा होऊ शकते आणि आई आधीसारखी स्वस्थ सुदृढ होऊ शकते..हो ना गं रिया.....


 सई म्हणाली..!  तुझी मम्मी बरी होईल देवाला नित्यनियमाने रोज प्रार्थना करत चला ,म्हणाव माझ्या आईला पूर्वीसारखी लवकर बरी कर देवा...

रिया म्हणाली!... मावशी तू घेऊन जा आईला ईकडची काहीच काळजी करू नकोस मी सांभाळीन हिला त्या दोघींचं बोलणं ऐकून सईचं हृदय भरून आलं डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या म्हणाली किती समजदार आहेत ग माझ्या छकुल्या, सईने त्या दोघींचा खूप खूप लाड कौतुक केले आणि सुमेधाला घेऊन गावाकडे आली....

सुमेधाने काहीच विरोध केला नाही ती चुपचाप सईच्या मागे मागे जात होती....


एकाएकी सुमेधाला पाहुन तिचे आई-वडील आणि भावंड तिला पाहून खूप आनंदले होते . आणि तिच्या अवती भोवती बसून खूप गप्पा गोष्टी करू लागले ....

सुमेधा अबोल होती...

सई सुमेधाला म्हणाली..! मी माझ्या घरी जाऊन येते माझे पती व मुलं वाट पाहत असतील..

आणि ती आपल्या घरी गेली.. आपल्या पती व मुलांना तिने सुमेधा मावशीला आणल्याचे सांगितले ती पण सुमेधाला भेटण्याकरता आतुर झाले होते....


सुमेधाची जीवन मरनातून सुटका झालेली होती गावातील ओळखीची गावातिल काही लोकं सुमेधाला भेटायला आली ..साऱ्यांनी सुमेधा कडे बघून हळहळ व्यक्त केली आणि तिच्या भविष्यासाठी तिला हिंमत दिली.. 


इकडच्या तिकडच्या गोष्टी करता करता संध्याकाळ झाली तोपर्यंत सुमेधा एकही शब्दानं उच्चार केला नव्हता... दुसऱ्या दिवशी घरची कामे करून सई पटकन सुमेधा कडे आली आणि सुमेधाच्या आई बाबाला पुर्ण कल्पना दिली होती की आपण सुमेधाला कशाकरता येथे आणलेले आहे तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे....


सर्वांनी हमी भरली कि जे काही सई करत आहे तिला सहकार्य करायचे त्यासाठी सर्वांना वाटेल ते करायची हमी दिली..आणि सईच्या प्रयत्नाला यश आले पाहिजे सर्वांनी तयारी दर्शविली...


इकडे रिया नित्या दोघी राघवला म्हणाल्या आपणही गेलो असतो ना बाबा आई बरोबर तर खूप मजा आली असती राघव म्हणाला आईची तब्येत बरोबर नाही आणि तुम्ही तिथे गेल्यास तिला त्रास झाला असता ना ,आणि तसंच तुमची शाळा अभ्यास कोण करणार परीक्षा अजून झालेल्या नाही आणि पर्सेंटेज कमी मिळाले तर आई नाही का रागवणार, आणि हो तब्येत बरोबर नसल्यामुळे ती आराम करायला गेली आहे आणि आपण तिला पुन्हा डिस्टर्ब करायचा का ?..

दोघिंचा चेहरा कोमेजला होता आणि राघवणे परीपरीने त्याची समजूत काढली आणि बाहेर फिरायला घेऊन गेला राघवचा आटोकाट प्रयत्न होता की आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये पण कधीकधी जीवनातील एक चूक घोडचूक ठरते, पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते...


असल्या चुकांमुळे मनुष्याला ताक ही फुंकून फुंकून प्यायची सवय होते आणि कालांतराने चांगले दिवस येऊ शकतात म्हणतात ना، "पश्चातापे पापे हरती"

रिया नित्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले आणि काही वस्तू घेऊन दिल्या दोघीही आनंदात घरी आल्या आणि अभ्यासाला लागल्या... सुमेधाला गावी येऊन दोन दिवस झाले होते सई पुरेपूर प्रयत्न करीत होती परंतु सुमेधा जशी होती तशीच तिच्या कुणाशीच काही घेणेदेणे नव्हते ती आपल्यातच एखाद्या यंत्रमानवा सारखी वागत होती....


सूर्य मावळतीला आला होता सईला आपल्या घरी पण जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता ती सुमेधाला म्हणाली मी घरी जाऊन येते .माझे पती मुलं वाट पाहत असतील...सर्व काम करून सई निवांत झोपी गेली ...


सई मध्यरात्रीला ताडकन उठून बसली ती मोठमोठ्याने श्वासोश्वास करीत होती आणि डोळे वटारुन इकडेतिकडे बघत होती ..तिला काहीतरी स्वप्न दिसले होते ती थरथरत होती तेव्हा तिचे मिस्टर म्हणाले..! काय झालं सई ? सई म्हणाली... मी खूप वाईट स्वप्न पाहिलं .. सुमेधा धावत होती आणि प्रशांत तिच्या मागे मागे धावत होता तेव्हा प्रशांत खाली पडला आणि रक्तच रक्त दिसलं आणि तो लवकर उठलाच नाही मला फार भीती वाटत आहे....


सईचे मिस्टर म्हणाले.. तू नेहमी काहीतरी दिवसभर बडबड करत असते रात्री तुला तेच स्वप्नात दिसत असते तू सावकाश झोप बरं ..! 


सई म्हणाली..!नाही हो मला खूप भीती वाटत आहे मी प्रशांतला फोन लावते म्हणून ती उठली आणि प्रशांतला फोन लावला खूप वेळ रिंग वाजत होती. तरी तिकडून फोन उचलला नाही पुन्हा पुन्हा लावला तेव्हा कुठे प्रशांतने फोन उचलला ... प्रशांत आवाज कानावर आला 

प्रशांतची खैरखबर घेतली तब्येतीची विचारपूस केली..

नंतर त्यावर भडकली ..

सई म्हणाली.. !अरे असा कसा तू किती वेळ लावतो फोन उचलायला मी कितीदा ट्राय करत आहे तू फोन का नाही उचलत ...

प्रशांत म्हणाला..! अगं घड्याळ बघितली ना किती वाजले ते अर्ध रात्री झाली आहे.. झोपायची वेळ आहे आणि तू फोन केला कोणास ठाऊक फोन येणार आहे म्हणून काय झालं कशाला फोन केला इतक्या रात्री...


सई म्हणाली ..! मला फार वाईट स्वप्न दिसलं आहे ना तुझी तब्येत बरी आहे ना तेव्हा प्रशांत म्हणाला हो मी एकदम ठीक आहे मला काय झालं तेव्हा तिला बरं वाटलं आणि ती म्हणाली मी सुमेधाला परवा गावी घेऊन आले आहे तू तिला भेटायला यावे अशी माझी इच्छा आहे तिची तब्येत खूपच खालावत आहे ती कुणाशी बोलत नाही ती अबोल आहे तिने मौन धारण केले आहे ...ती खूप अशक्त वाटत आहे तिला इकडचा हवामान मानवेल आणि इकडे बालपणीच्या काही गोष्टी तिला आठवेल म्हणून मी तिला इकडे घेऊन आले आहे... मला असं वाटते तू पण तिला भेटायला येथे यावे ..तुला बघून तिच्या काही आठवणी जागृत होतील..


प्रशांत मनाला..!  हे कसं शक्य आहे ती आता आत्ताच माझ्याकडून गेली आहे आणि जर गावाला आलो तर कोणी काय म्हणेल?..

सई म्हणाली ...! तुझं तिच्यावरचं प्रेम सर्वांनाच माहित आहे तुझ्या घरी पण आम्ही गेलो होतो तेव्हाच सुमेधाला पण माहीत झालं होतं...

आणि तिच्या घरच्यांना पण माहित आहे तू ना असं नाटक करू नकोस.. तू पटकन येण्याचं कबूल कर तुला नाही का वाटत आपली बालपणीची मैत्रीण बरी व्हावी म्हणून..

मी तुला इतके सांगत जीव तोडून सांगत आहे सुमेधा विषयी आणि तू तुला कसं काही वाटत नाही प्रशांत ऐक माझं मी काय सांगते तू सुमेधा साठी एवढे कष्ट घेतली आता ती तुझ्यामुळेच बरी झालेली आहे मला राजीवने सर्व हकीकत सांगितली आहे ..तू सुमेधा वर जीवापलीकडे प्रेम करतोय हेही समजले आहे राजीवला तुझ्या औदार्याचे त्यांनी खूप खूप कौतुक केले.तरीपण कुणाच्या हातात काही असते का नाही ना मग तू सुमेधाला अशी एकटी सोडून तिच्यापासून विलिप्त भावशून्य कसा राहाणार ...


प्रशांत तू तिला पूर्ण बरी करण्यासाठी काय करू शकतोस तुझी इच्छा नाही का सुमेधा पहिले सारखे हसणारी बोलणारी व्हावी म्हणून प्रशांत उदास आवाजात बोलला... तिच्यासाठी मी जीवाचा ही त्याग करायला तयार आहे अजून मी काय करू शकतो....

सई पुनश्च उद्गारली अरे वेड्या काय सांगू तुला कसं सांगू तुला सुमूची हालत आता नाही रे बघवत मला.. तुला थोडी ही माझी तमा असेल ना तर तू इथे पटकन ये आपण करू काही प्रयत्न तिच्यासाठी .पुढे देवाची इच्छा.


साईच्या बिनधास्त वक्तव्याने प्रशांतला हार मानावी लागली आणि त्याचा नकार हो मध्ये बदलला उद्याच येण्याचे कबूल केले आणि म्हणाला आता निश्चिंत झोप नाहीतर पुन्हा अर्ध्या रात्री कुणाला जागवशील...


सई म्हणाली..! तू ना मला छेडू नकोस मी काही इतकी वेडी नाही कुणालाही जागवायला... ओके गुड नाईट म्हणून फोन ठेवला..


पुढे देवाची इच्छा दुसऱ्या दिवशी प्रशांत आपल्या जन्म गावी आला तसेच सईला त्याने फोन करून कल्पना दिली.. सई म्हणाली . ! तिथे आई-बाबा नसल्यामुळे तू इकडे माझ्या घरी ये.... ओके म्हणत त्याने

फोन ठेवला आणि फ्रेश होऊन सईकडे आला...


प्रशांत म्हंटल्याप्रमाणे सईकडे आला सईला खूपच आनंद झाला आणि ती पटकन उठून प्रशांत कडे झेपावली त्याचे दोन्ही हात धरून कृतज्ञता व्यक्त केली म्हणाली खरंच तू आल्यामुळे मला खूप बरं वाटतं आहे खूप हिम्मत आलेली आहे..

मी सुमेधाला गावी घेऊन आले मी तिच्यासाठी काही करावे ही अभिलाशा घेऊन पण मला काहीच सुचत नव्हते आता काय करु शकते पण तू आला आता माझं डोकं काम करेल ...


सई नाश्ता चहा घेऊन आली प्रशांतने बोलता-बोलता नाश्ता करण्यास सुरूवात केली होती ... सई तुला माहित होतं मला ढोकळे आवडतात म्हणून ,

सई म्हणाली....! अशी कशी विसरणार आपण सर्व बाल मित्र आहोत ना मग एक दुसऱ्याच्या आवडीनिवडी कशा विसरू शकतो आणि पुढे म्हणाली तू जरूर आम्हाला विसरला होता नाही का ?...इतक्या वर्षात प्रशांत त्यांच्याकडे कधीच आला नव्हता कारण तो दहाव्या वर्गा पासून बाहेरगावी शिकायला गेला त्यानंतर त्याला जॉब ही तिकडेच लागला ..आला तरी तो खूप भटकायचं नाही फक्त सुमेधाच्या घरीच जायचा सईपण ईकडेच यायची .. जसजसे मोठे झाले तसतसे खेळणे बागडणे बंद झाले.... 


प्रशांत म्हणाला...?

नाही ग सई मी कोणालाच विसरलेलो नाही पण वेळे अभावी इथे जास्त राहता आले नाही .... तोपर्यंत सईचे मिस्टर रमेश ही आले होते..रमेशची या आधी भेट झाली नव्हती पण त्यांनी खूप छान प्रशांतचे स्वागत केले.

तसा कधीच रमेशचा संबंध आला नव्हता...जरी रमेशही याचं गावातिल मुलगा होता त्यांच्याच मागे पुढे लहान-मोठा होता तरीपण कधी भेटले नव्हते... रमेशचा स्वभाव खूप साधा सरळ आणि लाघवी होता... इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करीत बसले होते....


तेवढ्यात सईचा आवाज कानावर आला, चला डायनिंग टेबलवर जेवण तयार आहे रमेश म्हणाला चला ऑर्डर आला आहे ..त्वरा करा नाहीतर स्फोट होईल .. रमेश मिस्कील स्वभावाचा होता त्याला गमती जमती करणे आवडायचं मध्ये मध्ये जो काही जोक्स वगेरे मारायचा...


स्वयंपाक छान स्वादिष्ट झाला होता म्हणून प्रशांतने खूप स्तुती केली... याआधी सईच्या हातचे कधी खाण्याचा योगच आलेला नव्हता...अतिशय सुंदर चव होती...


सर्व कामे आटोपून सई पटकन बाहेर निघाली तसाच अभिनव म्हणाला आई कुठे निघाली.! सई म्हणाली मी सुमेधा मावशीला घेऊन येते पाच मिनिटात तुम्ही सगळे काका सोबत बोला तोपर्यंत, म्हणत ती बाहेर निघाली आणि पटकन सुमेधाकडे गेली ...आणि सुमेधाला म्हणाली ...

चल मी तुला फिरवून आणते ...सुमेधा निमुटपणे उठून सई बरोबर निघाली...

आईला म्हणाली आई मी सुमेधाला घेऊन जाते.. आई आतून म्हणाली ठीक आहे बेटा सांभाळून जा..सुमेधाला हात धरून ती आपल्या घरी घेऊन आली...

  

सुमेधा सई ला घेऊन आली प्रशांतची आणि सुमेधाची नजरानजर झाली प्रशांतला बघून सुमेधा आत दचकली ती तशीच उभी होती तेव्हा सोप्या वर सहीने नेऊन बसवले, प्रशांत सुमेधाला बघून खूपच कळवळला तीची खुपच कृष अवस्था होती..मासतर नव्हतेच फक्त हाडाचा सापळा दिसत होता... पहिल्यांदा जर कोणी बघितले तर कधीच म्हणणार नाही की ही आधी लावण्याची खान होती रुपसुंदरी होती ...सई .तिच्यासाठी पाणी घेऊन आली मनातल्यामनात तिकडे प्रशांत तर्क-वितर्क करू लागला की आता सुमेधा शी काय बोलू.....


सुमेधाला उद्देशून सई बोलू लागली ....प्रशांतला बघून तुला आश्चर्य होतो आहे ना सुमू... तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून मी काहीच सांगितले नाही आणि तुला इकडे घेऊन आले...मला माहित झाले प्रशांत आलेला आहे..

मी त्याला फोन करून इकडे बोलावले बरं झालं ना सुमे प्रशांतची आणि आपली खूप दिवसांनी भेट झाली आता मी त्याला कडाडून सांगितले की ,तू दोन-तीन दिवस जायचे नाही आमच्यासह इथेच रहायचे आपण खूप भटकायचे ....


रमेशला तर मला न्यायला कुठे वेळच मिळत नाही नेहमी कामातच असतात आणि मुलांना पण कधीच घेऊन कुठे जात नाही ...रमेश आवासून बघत होता मनातच म्हणाला किती खोटे बोलते सई ... माझ्यासारखा फिरवणारा नवरा हिला कधी सात जन्म मिळणार नाही तरीपण माझी बदनामी करीत आहे किती हुशार म्हणावे हिला ....चला मित्रासमोर सुमेधाच्या भल्यासाठी ती खोटं बोलत आहे यात काही वावगे नाही ....कुणाच्या भल्यासाठी खोटे बोलणे यात काही वाईट नाही .. या गोष्टीचा तिच्याबद्दल मला मनस्वी अभिमान आहे ..


 पुन्हा सई बोलली म्हणाली.... बरं चांगले केले ना मी प्रशांतला बोलवून आता आपण दोन-तीन दिवस खूप खूप गप्पा करूया भटकूया... पुन्हा सई बोलली म्हणाली.... बरं चांगले केले ना मी प्रशांतला बोलवून आता आपण दोन-तीन दिवस खूप खूप गप्पा करूया भटकूया प्रशांत चुपचाप खाली मान टाकून बसलेला होता जमिनीकडे बघून त्याला फक्त सुमेधाची अवस्था पाहून अति व दुःखाने वेदनेने पछाडले होते तो मनातच कासाविस झाला होता ....

सई पुन्हा म्हणाली प्रशांत बोल ना सुमेधा सोबत थोडा मी लगेच कामे उरकून येते... सगळेजण इकडे तिकडे कामानिमित्त निघून गेले ...हॉलमध्ये दोघेच बसले होते आणि एक दुसऱ्याला बघत होते प्रशांत उठला आणि सुमेधाच्या पायाजवळ जमिनीवर जाऊन बसला तिचे दोन्ही हात हातात घेऊन रडू लागला म्हणाला काय ग सुमू काय व्यवस्था केली तू स्वतःची काय झाले तुला काबर अशी जीर्णशीर्ण दिसते आहेस बोल ना माझ्याशी काहीतरी...


 परंतु सुमेधाच्या मुखातून एक शब्दही निघाला नाही ती अबोलच राहिली आणि प्रशांत अश्रू ढाळीत राहिला तेवढ्यात सई आली आणि म्हणाली... चला आपण मळ्यात जाऊया ..!  खुल्या धूंद वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात खूप काही गोष्टी आठवल्या सर्वांनी त्यां मनातच ठेवल्या संध्याकाळ झाली . सूर्य मावळतीला लागला तेव्हा सर्वजण घरी आले ...

प्रशांत म्हणाला..! मी येतोय सुमू ! 

आणि सईला उद्देशून म्हणाला सई उद्याचा काय प्रोग्राम आहे तो सांगशील मी येऊन जाईल तसा मी चार दिवस इथेच आहे.. येतो म्हणून पटकन तो आपल्या गाडीने निघून गेला....


,,,,,,,क्रमशः






साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama