Vgshjsksldv Gshshshs

Tragedy

2  

Vgshjsksldv Gshshshs

Tragedy

बेभान प्रेम

बेभान प्रेम

8 mins
8.7K


बेभान प्रेम

तीन वर्षापूर्वीची ही गोष्ट

माझ्या बायकोला मी प्रेमाने काळे, वेडे बोलायचो. बायकोच्या बाबतीत मी आई वडलांच्या कृपेने नशीबवान ठरलो. मला प्रेम विवाहच करायचा होता. पण मला कोणी भेटलीच नाही प्रेमविवाह करायला, मग आई वडलांच्या इच्छेमुळे त्यांना आवडेल अस लग्न करायच ठरल. दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला  मी तिला सुख मिळाव म्हणून सिध्दीविनायकाला जायाचो. माझ खर प्रेम कधीच मी तिला दाखवल नाही. जास्त प्रेम केल की बायको बिघडते अस मला वाटायच. ती दिसली कि तिला ओरडायच, टोमणे मारायचे मी वाईट नवरा आहे अस तिला दाखवायच पण लपून तिच्या नकळत तिच्यावर निस्वार्थ जीवापाड प्रेम करायच. कधी कधी मला भीती वाटायची कि माझ्या अशा वागण्यामुळे ती मला सोडून तर जाणार नाही ना. पण ती मला नाही सोडणार एवढा मला विश्वास होता.  तिच्या नकळत सिध्दीविनायकाला जायाच खर कारण म्हणजे मी तिच्यामुळे खूप खूष होतो. कशी पण असली तरी माझी अर्धांगिनी होती ती. आणि उद्या जरी मुलांनी घराबाहेर हकलल तर बायकोच सोबत असणार.

सुरवातीला तिच्याशी लग्न करुन मी काही दिवस खूशच नव्हतो. तरुण मनाला अप्सराच पाहिजे होती. पण सावळी प्रिया भेटली. लग्न झाल्यानंतर मी थोड तिला टाळतच असायचो पण तिने कधी राग मानला नाही. मी कारण शोधायचो तिच्याशी भांडायच. पण मी भांडण रागात सुरु करायचो आणि ती प्रेमळ एकाच शब्दांत माझा राग शांत करायची. मी जेवढ तिच्यापासून पळायचा प्रयत्न करायचो तेवढच तिच्याजवळ खेचलो जायाचो. सावळी असली तरी चेहऱ्यावर जादूची चमक होती. मी तिच्या प्रेमात पडत होतो कारण ती होतीच तशी
तिच्यावर कविता करावी अशी होती माझी बायको.
शांत स्वभावाची गोड परी म्हणजे माझी बायकोच.
आई वडलांनी दिलेली आयुष्याची गोड भेट म्हणजे माझी बायको.
साक्षात देवीसारखी पुजाच करत राहावी अशी माझी बायको.
घरातली सर्व काम करुन न कंटाळणारी स्री म्हणजे माझी बायको,
व्यवहारज्ञान असणारी माझ्यापेक्षा हुशार म्हणजे माझी बायको.

माझ्या आई वडलांसमोर मी तिचा खूप अपमान करायचो पण कधी मला उलट उत्तर तिने दिल नाही. माझे आईबाबा मला ओरडायचे मी तिला बोललो की आणि ती कोपऱ्यात रडत बसायची. दुसऱ्या दिवशी परत काल रात्रीच विसरुन सकाळी गोड हसत नवीन सुरवात करायची. तिच्या हसण्याने मला वेडच केल होत. 

आज माझ्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली. आज तिला म्हणजेच माझी बायको प्रिया हीला रोमेंटिक रात्रीच जेवण द्याच ठरल होत माझ. आज अॉफिस मधून सुट्टी काढून योजना आखली होती मी.
आज तिला संध्याकाळी तिच्या अॉफिसमध्ये भेटायच ठरल होत माझ. नंतर चौपाटी फिरायची, हॉटेल मध्ये जेवायच, रात्री तिच आवडत आईसक्रीम खायाच. आणि तिला एक पर्स भेट द्याची माझ ठरल होत. तिच अॉफिस ६ ला सुटणार हे माहित असून मी ४ ला तिच्या अॉफिस गेटच्या बाहेर उभा राहिलो.
एका हातात एक  तिच्यापेक्षा कमी सुंदर असलेल गुलाब. दुसऱ्या हातात तिला आवडणारी कँटबरी . मनात ठरवल आज तिच्यासोबत फक्त प्रेमाच्या गोष्टी करायच्या. २५ वर्ष माझ्यासारखा अर्धवट, मूर्ख, वेड्या नवऱ्याला सहन केल म्हणून तिच खूप आभार मानायच माझ ठरल होत.

६ वाजून गेले तरी ती अजून आली नाही तिच्या अॉफिसमधले सर्वजण जाताना दिसले तरी ही काय आली नाही. आज भरपूर काम असाव.

७ वाजले अजून ती आली नाही. खरच तिच्या बॉसचा गळाच दाबाव वाटत होत.

८ वाजले तरी ती आली नाही वैतागलो होतो पण रागावयच नाही ठरवल होत.

९ वाजले तरी आली नाही. आता सहन होत नाही सरळ तिच्या अॉफिसमध्ये गेलो. अॉफिस बॉय अॉफिस बंद करत होता. मी बोललो

मीः अरे थांब माझी बायको आहे अजून.

अॉफिस बॉयः अहो सर सगळे गेले आत्ताच. आत कोणी नाही. तुम्ही कोण ?

मीः अरे प्रियाबाई असतील.

अॉफिस बॉयः कोण प्रियाबाई ? इथे कोण प्रिया नावाच काम करतच नाही.

मीः ऐ गप्प तुला काय माहीती नाही.

अॉफिस बॉयः थांबा एक मिनट सर. तुमचा गैरसमज दूर करतो. अॉफिसचे मेन सर येत आहेत.

मीः ओके

अॉफिस बॉयः सर हे कोणत्या तरी प्रियाबाईंना शोधत आहेत, त्यांना सांगितल इथ कोण प्रिया म्हणून काम करतच नाही.

सरः तू शांत बस. तुझ काम कर. हा सर बोला तुम्ही कोण?

मीः अहो सर मी प्रिया बाईंना भेटायला आलोय. खूप वेळ त्यांची वाट पाहतोय.

सरः तुम्ही कोण आहात ते आधी सांगा?

मीः मी प्रियाबाईचा नवरा.

सरः आत या तुम्ही. हे पाणी प्या.

मीः थँक्यू सर.

सरः तुम्हाला भेटून बर वाटल. मी तुमच्या दुखःत सहभागी आहे सर. कृपया शुध्दीत या. स्वतःला सांभाळा.

मीः मला काय धाड भरलीय.

सरः प्रियाबाईंना देवाज्ञा होऊन २४ वर्ष झालेत.
मी दोन मिनीट शांतच होतो.

सरः स्वतःला सांभाळा.सगळ नीट होईल. तुम्हाला घरी सोडू का मी?

मीः माफ करा सर. तीची इतकी सवय झालीय कि तिला विसरणच अवघड होत. माझी चूक झाली. माफ करा.

सरः माफीची गरज नाही सर. त्यांच काम खूप छान होत. अॉफिस बॉय नवीन आहे. त्याला काय माहितच नाही.चला तुम्हाला घरी सोडतो.

मीः नको सर मी येतो. बाय.

सरांचा निरोप घेऊन मी निघालो. हातातल गुलाब कोमजल, कँटबरी वितळली.मी तसच ते रस्त्यावरच्या भिकारी मुलाला दिल. ते खूश झाल.

मी सरळ चौपाटीला गेलो. तिचा विचार करत बसलो. खरतर लग्नानंतर एक महिन्यानंतरच माझी बायको दोनचाकीवरुन पडून मरण पावली होती. आणि त्याला जवाबदार मीच होतो.

मी परत त्या भूतकाळात वाहून गेलो.

जुलै मधला तो शनिवार मी कधीच विसरु शकत नाही. आमच लग्न होऊन एक महिनाच झाला होता. आणि त्यादिवशी प्रियाचा वाढदिवस होता. घरात सर्वांना सांगितल आज मित्राच लग्न आहे प्रिया आणि मी मोटारसायकल घेऊन लग्नाला जाणार आहोत. प्रिया मला बोलली.

प्रियाः तुम्ही जा. माझी खरच बाहेर याची इच्छा नाही.

मीः अग चल. तुला पण जरा वेगळ वाटेल. माझ्या मित्रांना भेटशील.

तरी मस्का मारुन मी प्रियाला तयार केल. खरतर लग्न नव्हतच पण बायकोला सर्वासमोर कस बोलायच जाऊया फिरायला म्हणून हे कारण.
आम्ही निघालो घरातून. डायरेक्ट चौपाटीवर.

प्रियाः अहो लग्न कुठे आहे ?

मीः तू गप्प बस आणि चल माझ्यासोबत.

प्रिया एका ठिकाणी थांबवून मी केक आणायला गेलो होतो. तिच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसत होते.

मी आलो तिला एक गुलाब दिल. कँटबरी चारली आणि केक समोर ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ती खूप खुष झाली. तीच हसण मला अविस्मरणीय सुख देऊन गेल केक कापला. दोघांनी खाल्ला आणि राहिलेला केक चौपाटीवर फिरत असलेल्या गरीब मुलांना दिला. प्रिया खूप खुष होती. तिला चौपाटीच्या पाण्यात नेऊन भिजवल. भिजलेल्या अवस्थेत ती फुलांसारखी फुलली होती.तिच्यासोबत बोलण्यात कधी वेळ गेला कळलच नाही. अचानक पाऊस सुरु झाला.

प्रियाः चला लवकर घरी आई बाबा वाट पाहत असतील.

मीः हो पाऊस कमी झाल्यावर निघूच.

पाऊस कमी झाल्यावर आम्ही निघालो. घरी लवकर पोहचाव या दृष्टीने ५० ते ६० किमी वेगाने मी गाडी चालवत होतो. हायवेला लागल्यानंतर अचानक माझ्यासमोर एस्टी आली. पाऊस थांबला होता.
गाडी वेगातच होती.
पहिली वाईट वेळ आली. बसच्या मागे असल्यामुळे आणि मोटारसायकलच्या कमी प्रकाशाने मला खड्डा दिसलाच नाही. गाडी मोठ्या खड्ड्यातून वेगाने बाहेर पडली. प्रियाने मला घट्ट पकडल.

दुसरी वाईट वेळ आली आणि घात झाला. लगातर दोन मोठे खड्डे आणि पाणी भरल्याने मला दिसलेच नाही गाडी जोरात खड्ड्यात आपटली आणि प्रिया गाडीवरुन पडली.
प्रिया गाडीवरुन पडल्यावर मी लगेच गाडी थांबवली. गाडी तशीच टाकून प्रियाकडे धावलो. प्रियाला काही सुचत नव्हत ती बेशुद्ध अवस्थेत होती. एका माणसाने गाडी बाजुला लावली प्रियाला रस्त्यातून बाजूला घेतल. रिक्षा थांबवून आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. प्रियाच्या डोक्यातून रक्त वाहत होत. माझे हात, शर्ट, पँट प्रियाच्या रक्ताने भिजले होते. काहीच सुचत नव्हत. प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणल. डॉक्टर चेकअपला आले आणि म्हणाले.

डॉक्टरः माफ करा पण यांच निधन झालय.

एका क्षणात पायाखालची जमीन सरकली होती.
लाजणार फुल एका क्षणात कोमजल.
मी आईबाबांना फोन लावून सर्व सांगितल.
माझ्यासाठी वातावरण बेशुध्द झाल होत      
अंतिम संस्कार झाले पण मी सुन्न होतो.

लोक खूप स्वार्थी असतात. अपघाताची वेळ माझ्यासाठी वाईट होती. त्याचा लोकांनी चांगलाच फायदा घेतला. प्रियाची पर्स, मोबाईल, गळ्यातली चैन, तुटलेल घड्याळ सर्व गायब झाल होत.

५ महिने कधी गेले कळलच नाही.

काही महिन्यानंतर आई बाबांनी दुसऱ्या लग्नासाठी आग्रह केला. पण माझा पूर्ण विरोधच होता. कारण स्वतःला मी आपराधी मानल होत. माझ्या बायकोचा मीच खून केला अस मला वाटत होत. दुसर लग्न म्हणजे समजून केलेला करारच अस मला वाटायचं.
आणि
आज या अॉफीसच्या सरांमुळे मला जाणवल मी आजारी आहे.
बायकोच निधन होऊन २४ वर्ष ११ महिने झाले. तरी तिला मी विसरलो नाही. तिच्या एक महिन्याच्या अस्तित्वाने मला वेड केल होत.
आईबाबा पण मला सोडून गेले. आणि मी दादा वहिनीकडे राहत नाही.
एकटाच राहतो. त्या एकट्या घराने मला आजारी बनवल.
कधी कधी मी आॉफिस मधून घरी येऊन या मोकळ्या घराला पाणी आणि चहा मागायचो.
कधी कधी आंघोळ करुन प्रियाला हाक मारुन टॉवेल मागायचो.
तासनंतास प्रियाच्या फोटोशी गप्पा मारायचो. ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवल्या.
लगेचच दुसऱ्या दिवशी मी एका मानसिक आजारावरील तज्ञ डॉक्टर स्मितांना भेटलो.
त्यांना माझ्याबद्दल मी सर्व सांगितल.

डॉक्टर स्मिताः तुम्ही बरे होऊ शकता. पहिली गोष्ट तुमच्या बायकोच्या मृत्यूच्या धक्क्यातून तुम्ही आजारी पडलाय.. तुमच्या बायकोला तुम्ही मनात जीवंत ठेवल त्यामुळे तुम्हाला तिचे भास होतातय. पहिल तुम्ही तुमच्या मनाला सांगा तुमची बायको कधीच परत येणार नाही. कारण ती हे जग सोडून गेलीय. नंतर तिच्या बरोबर घालवलेले क्षण आठवून भरपूर रडा. रडण म्हणजे  झालेल्या दुखःला विसरण्याचा उपाय आहे. रडल्यानंतर तुमच मन स्थिर शांत होईल. तुमच्या बायकोच्या मरणाला तुम्ही स्वतः जवाबदार नव्हता ती परिस्थिती जवाबदार होती हे स्वतःला सांगा. शांत झोपा, व्यायाम करा, ध्यान करा, वेळच्या वेळी जेवा, तुमच्या भावाच्या घरी जमल तर राहायला जावा. स्वतःला एकट कोंडून घेऊ नका. निसर्गात फिरा. भूतकाळ बदलत नाही म्हणून त्याला विसणेच योग्य वर्तमान काळ बदलला म्हणजे भविष्यकाळ सुंदर जाईल. आणि नंतर तुम्ही नक्की बरे व्हाल.

आज ३ वर्षानंतर
मी बरा झालोय आता, स्वतःला भयानक मानसिक आजारातून सावरल मी.
मी आता मस्त खूष आहे. बायकोच्या फोटोशी आजपण गप्पा मारतो पण ती गेलीय याची जाणीव ठेऊन. आता ५८ वर्षाचा झालोय. नोकरीतून सुटका झालीय. पण आयुष्य आनंदात घालवतो.
आता खूप काम चालू आहेत. मी ६० वर्षावरील वयस्कर लोकांसाठी एक क्लब सुरु केलय.
आपण कितीही म्हातारे झालो तरी आपल मन तरुणच ठेवायच हा क्लबचा हेतू.

क्लबच नाव  "नवीन सुरवात" ठेवलय.

या क्लब मध्ये फक्त हसायच, खेळायच, व्यायाम करायचा, पुस्तक वाचायची, एकमेकांची मदत करायची, जुने चित्रपट पाहायचे, क्रिकेट पाहायच, पिकनिकला जायाच.

आणि समाजसेवेसाठी जमेल तशे उपक्रम राबवायचे.
झाड लावणे, स्वच्छता राखणे, वयस्करांचा आदर करणे यासाठी रँली काढायच्या, शहरांच्या चौकांत अभिमानाने उभ्या असलेल्या महान माणसांच्या पुतळ्यांना साफ ठेवायच.
जे सरकारला जमत नाही ते आपल्या तरुण मनाने चांगल करायचा प्रयत्न करायचा.
ही सर्व कामे कोणत्या प्रसिध्दीसाठी, राजकारणासाठी न करता लोककल्याणासाठी करायची.
ही सर्व कामे ही वयस्कर मंडळी आनंदाने, श्रमाने करते. आपल्या पुढील पिढीला सुख शांती लाभण्यासाठी प्रयत्न करायचे हाच आमच्या क्लबचा हेतू.
या क्लबच सगळ काम मी सांभाळतो.
माझी वेडी प्रिया अजूनही मनात आहे. मला जगायला प्रेरणा देते. वेडी ती कधी नव्हतीच वेडा मीच तिच्या प्रेमासाठी होतो आहे आणि राहीन.

ही कथा आवडल्यास लाईक , शेअर, कमेंट करा

वाचकांच्या ह्रदयाचा मोफत भाडेकरु

मन एक लेखक


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy